Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 1 / Mantra 9

31 Mantra
1/9
Devata- विष्णुर्देवता Rishi- परमेष्ठी प्रजापतिर्ऋषिः Chhand- निचृत् त्रिष्टुप्, Swara- धैवतः
Mantra with Swara
अह्रु॑तमसि हवि॒र्धानं॒ दृꣳह॑स्व॒ मा ह्वा॒र्मा ते॑ य॒ज्ञप॑तिर्ह्वार्षीत्। विष्णु॑स्त्वा क्रमतामु॒रु वाता॒याप॑हत॒ꣳरक्षो॒ यच्छ॑न्तां॒ पञ्च॑॥९॥

अह्रु॑तम्। अ॒सि॒। ह॒वि॒र्धान॒मिति॑ हविः॒ऽधान॑म्। दृꣳह॑स्व। मा। ह्वाः॒। मा। ते॒। य॒ज्ञप॑ति॒रिति॑ य॒ज्ञऽप॑तिः। ह्वा॒र्षी॒त्। विष्णुः॑। त्वा॒। क्र॒म॒तां॒। उ॒रु। वाता॒य। अप॑हत॒मित्यप॑ऽहतम्। रक्षः॑। यच्छ॑न्ताम्। पञ्च॑ ॥९॥

Mantra without Swara
अह्रुतमसि हविर्धानं दृँहस्व मा ह्वार्मा यज्ञपतिर्ह्वार्षीत् । विष्णुस्त्वा क्रमतामुरु वातायापहतँ रक्षो यच्छन्तांम्पञ्च ॥

अह्रुतम्। असि। हविर्धानमिति हविःऽधानम्। दृꣳहस्व। मा। ह्वाः। मा। ते। यज्ञपतिरिति यज्ञऽपतिः। ह्वार्षीत्। विष्णुः। त्वा। क्रमतां। उरु। वाताय। अपहतमित्यपऽहतम्। रक्षः। यच्छन्ताम्। पञ्च॥९॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - ऋत्विक् जनहो, तुम्ही वृद्धी पावलेल्या अशा यज्ञाग्नीत (अह्रुतम्) कुटिलतारहित, स्वच्छ (हविर्धानम्) होम करण्यास योग्य असे पदार्थ टाकून त्यांचे गुण (दृंहस्व) अधिक वाढवा. कधीही (माह्वाः) या हवनीय पदार्थांचा त्याग करूं नका. तसेच (ते) तुमच्या (यज्ञपतिः) यजमानाने देखील यज्ञाच्या अनुष्ठान-कार्याचा (मा ह्वार्षीत) केव्हांही त्याग करूं नये. (ऋत्विक् व यजमान यांनी सदैव होम करावा) या प्रकारच्या कर्मांनी हवन करण्यास योग्य अशा द्रव्यांची अग्नीत आहुति देत जावी. ते पाच कर्म म्हणजे - (उत्क्षेपणम्, अवक्षेपणम्, आकुंचनम्, प्रसारणम्, गमनम्) वा उचलणें, चलणें-फिरणे, या पाच क्रियांद्वारे हवनीय पदार्थ यमाग्नीत (यच्छन्ताम्) सोडावेत. (विष्णुः) व्यापनशील सूर्य (त्वा) त्या हवनीय द्रव्यातील दुर्गन्धादि दोषांचा नाश करीत (उरुवाताय) आत्यंतिक वायु-शुद्धीकरिता आणि सुखाच्या वृद्धि करितो (क्रमताम्) त्या हव्य पदार्थांना उन्नती करतो म्हणजे त्यांचे गुण वाढवितो. ॥9॥
Essence
भावार्थ - जेव्हां माणसें परस्पर प्रेमभाव वाढवीत, कुटिलतेचा त्याग करतात, शिक्षण-विद्या देणार्‍याचे शिष्य होऊन विशेष ज्ञान आणि क्रियाद्वारे भौतिक अग्नीच्या महत्त्वास जाणून घेतात आणि त्याप्रमाणे अनुष्ठान करतात, तेव्हांच शिल्पविद्येची प्रगती/प्राप्ती होते. सर्व शत्रू, दारिद्य्र आणि दुःखांपासून युक्ती आणि सर्व सुखांची प्राप्ती होते. विष्णूने म्हणजे व्यापक परमेश्‍वराने सर्व मनुष्यांकरिता ही आज्ञा केली आहे. या आज्ञेचे पालन करणें सर्वांना उचित आहे, हितकारी आहे. ॥9॥
Subject
आतां यजमानाच्या कर्त्तव्याविषयी आणि भौतिक अग्नीविषयी पुढील मंत्रात कथन केले आहे.