Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 1 / Mantra 8

31 Mantra
1/8
Devata- अग्निर्देवता Rishi- परमेष्ठी प्रजापतिर्ऋषिः Chhand- निचृत् अतिजगती, Swara- निषादः
Mantra with Swara
धूर॑सि॒ धूर्व॒ धूर्व॑न्तं॒ धूर्व॒ तं यो॒ऽस्मान् धूर्व॑ति॒ तं धू॑र्व॒ यं व॒यं धूर्वा॑मः। दे॒वाना॑मसि॒ वह्नि॑तम॒ꣳ सस्नि॑तमं॒ पप्रि॑तमं॒ जुष्ट॑तमं देव॒हूत॑मम्॥८॥

धूः। अ॒सि॒। धूर्व॑। धूर्व॑न्तं। धूर्व॑। तं। यः। अ॒स्मान्। धूर्व॑ति। तं। धू॒र्व॒। यं। व॒यं। धूर्वा॑मः। दे॒वाना॑म्। अ॒सि॒। वह्नि॑तम॒मिति॒ वह्नि॑ऽतमम्। सस्नि॑तम॒मिति॒ सस्नि॑ऽतमम्। पप्रि॑तम॒मिति॒ पप्रि॑ऽतमम्। जुष्ट॑तम॒मिति॒ जुष्ट॑ऽतमम्। दे॒व॒हूत॑म॒मिति दे॒व॒हूऽत॑मम् ॥८॥

Mantra without Swara
धूरसि धूर्व धूर्वन्तं धूर्व तँ यो स्मान्धूर्वति तं धूर्व यँ वयन्धूर्वामः । देवानामसि वह्नितमँ सम्नितमं पप्रितमंञ्जुष्टतमन्देवहूतमम् ॥

धूः। असि। धूर्व। धूर्वन्तं। धूर्व। तं। यः। अस्मान्। धूर्वति। तं। धूर्व। यं। वयं। धूर्वामः। देवानाम्। असि। वह्नितमिति वह्निऽतमम्। सस्नितममिति सस्निऽतमम्। पप्रितममिति पप्रिऽतमम्। जुष्टतममिति जुष्टऽतमम्। देवहूतममिति देवहूऽतमम्॥८॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे परमेश्‍वरा, तुच (धूः) सर्व दोषांचा नाश करणारा आणि जगाचे रक्षण करणारा (असि) आहेस. आम्ही तुझ्या विषयी हीच भावना ठेवून असे म्हणतो की तू (देवानाम्) विद्वानांना विद्या, मोक्ष आणि सुख (वह्नितमम्) यथोचित रूपाने पोहचविणारा आहेस. (सम्नितमम्) तूच अत्यंत शुद्धिकरणारा (पप्रितमम्) जगाला सर्व विद्या देऊन आनंदित करणारा (जुष्टतमम्) धार्मिक भक्तजनांद्वारे सेवित होणारा आणि (देवहूतमम्) विद्वज्जनांकडून स्तवनीय आहेस. त्यामुळे आम्ही तुझी नित्य सदा उपासना करतो. (यः) जो कोणी द्वेषी, छली, कपटी, पापी व कामक्रोधादी दोषांनी मलिन असा मनुष्य आहे की जो (अस्मान्) आम्हा धर्मात्मा व सर्वांना सुख देणार्‍या माणसांना (धूर्वति) दुख देतो, आणि (यम्) ज्या पापी माणसाला (वयम्) आम्ही (धूर्वामः) दुख देतो (तम्) त्याला तू (धूर्व) दंडित कर. तसेच जो सर्वा विषयी द्वेषभाव ठेवतो, सर्वांशी द्रोह करतो व सर्वांना दुःख देतो, त्याला देखील तू (धूर्व) ताडन कर. दुसरा अग्नीपरक अर्थ असा - शिल्पविद्या जाणण्याची इच्छा बाळगणार्‍या हे माणसा (वैज्ञानिका) भौतिक अग्नी (धुः) सर्व पदार्थांना भेदणारा, भेदन करणारा आणि अंधकाराचा नाश करणारा (असि) आहे. हा अग्नी कला, यंत्रादीच्या कौशल्यमुळे, चातुर्यामुळे विद्वानांना (वह्नितमम्) सुख देणारा आहे. (सम्नितमम्) शुद्धी करण्याचे साधन किंवा कारण आहे, (पप्रितमम्) शिल्पविद्येचे मुख्य साधन आहे (जुष्टतमम्) कारागीर, किंवा यांत्रिक जर ज्याचा उपयोग करतात तसेच (देवहूतमम्) विद्वज्जनां कडून जो स्तवनीय आहे, त्या अग्नीला (वयम्) आम्ही (धूर्वामः) ताडन करतो. त्याचा शिल्पविद्येत उपयोग करतो. तसेच ज्या अग्नीचा युक्तिपूर्वक उचित रीतीने उपयोग न केल्यास जो (अस्मान्) आम्हांला (धूर्वति) पीडा देणार्‍या अग्नीस तू (धूर्व) यादानीमधे योग्य प्रकारे प्रयुक्त कर. तसेच हे वीर पुरुषा, (यः) जो दुष्ट शत्रु (अस्मान्) आम्हांला (धूर्वति) दुःख देतो (तम्) त्यास तू (धूर्व) नष्ट कर आणि जे कोणी चोर, आदी वंचक आहेत, त्यांचा देखील तूच (धूर्व) नाश कर. ॥8॥
Essence
भावार्थ - समस्त जगास धारण करणारा परमेश्‍वर पापी व दुष्ट जीवांना त्यांनी केलेल्या पापांचे फळ म्हणून उचित दंड देऊन दुःखी करतो आणि धर्मात्मा माणसांना त्यांच्या उत्तम कर्माप्रमाणे फळ देऊन त्यांचे रक्षण व परिपालन करीत असतो. सर्व सुखांच्या प्राप्तीसाठी तसेच आत्म्याच्या शुद्धतेकरिता तोच परमात्मा संपूर्ण विद्या ज्ञान देणारा आहे, विद्वज्जनांद्वारे स्तवनीय आहे, तसेच हृदयात प्रीती आणि इष्ट भावना ठेवून वंदनीय असा ठेवून केवळ परमेश्‍वरच एकमेव आहे, अन्य कोणीही नाही. - त्याच प्रमाणे हा प्रत्यक्ष असलेला भौतिक अग्नी देखील संपूर्ण शिल्पविद्यानी क्रियांची सिद्धी दणारा आहे, शिल्पविद्येच्या पूर्ततेचे मुख्य साधन आहे, पृथिवी आदी पदार्थांना प्रकाशित करणारा आहे. हा त्यांना प्राप्त होऊन पदार्थांना श्रेष्ठ बनवितो. कारण की या भौतिक अग्नी (विद्युत्) द्वारे निर्मित आग्नेय आदि उच्च उत्तम शास्त्रास्त्र विद्येने शत्रूंचा पराजय होतो. यावरून हाच निष्कर्ष निघतो की विद्या, शिल्प आदींनी होमाच्या अनुष्ठानासाठी आणि विमान आदीचे निर्माण करण्यासाठी हा अग्नीच सेवनीय आहे, उपयोग करण्यास योग्य आहे. ॥8॥
Subject
सर्वाधार परमेश्‍वराविषयी तसेच पदार्थ विद्येच्या पूर्णतेचे साधन, भौतिक अग्नी, त्या विषयी पुढील मंत्रात उपदेश केला आहे -