Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 1 / Mantra 6

31 Mantra
1/6
Devata- प्रजापतिर्देवता Rishi- परमेष्ठी प्रजापतिर्ऋषिः Chhand- आर्ची पङ्क्तिः Swara- पञ्चमः
Mantra with Swara
कस्त्वा॑ युनक्ति॒ स त्वा॑ युनक्ति॒ कस्मै॑ त्वा युनक्ति॒ तस्मै॑ त्वा युनक्ति। कर्म॑णे वां॒ वेषा॑य वाम्॥६॥

कः। त्वा॒। यु॒न॒क्ति॒। सः। त्वा॒। यु॒न॒क्ति॒। कस्मै॑। त्वा॒। यु॒न॒क्ति॒। तस्मै॑। त्वा॒। यु॒न॒क्ति॒। कर्म्म॑णे। वां॒। वेषा॑य। वा॒म् ॥६॥

Mantra without Swara
कस्त्वा युनक्ति स त्वा युनक्ति कस्मै त्वा युनक्ति तस्मै त्वा युनक्ति । कर्मणे वाँवेषाय वाम् ॥

कः। त्वा। युनक्ति। सः। त्वा। युनक्ति। कस्मै। त्वा। युनक्ति। तस्मै। त्वा। युनक्ति। कर्म्मणे। वां। वेषाय। वाम्॥६॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - प्रश्‍नः- (कः) कोण (त्याम्) तुला चांगले, प्रशंसनीय कर्म करण्याची (युनक्ति) आज्ञा देतो? उत्तरः-(सः) तो जगदीश्‍वर (त्वा) तुला तुझ्यातील विद्या आदी शुभ गुणांच्या प्रकटीकरणासाठी, ज्ञानवान होण्यासाठी अथवा विद्यार्थी होण्यासाठी (युनक्ति) आज्ञा देतो. प्रश्‍नः- तो (कस्मै) कोण-कोणत्या प्रयोजनासाठी (त्वा) तुला आणि मलाही (युनक्ति) प्रवृत्त करतो? उत्तरः- (तस्मै) पूर्वी सांगितलेल्या सत्य व्रताचे जे आचरण म्हणजेच यज्ञ, त्यासाठी (त्वा) धर्म-प्रचारासाठी उद्युक्त असलेल्या तुला (युनक्ति) आज्ञा देतो (सः) तोच ईश्‍वर (कर्म्मणे) पूर्वोक्त श्रेष्ठ कर्म करण्यासाठी (वाम्) दोघांना म्हणजे श्रेष्ठ कर्म करणार्‍याला आणि करवून घेणार्‍याला आज्ञा देतो, नियुक्त करतो. तोच ईश्‍वर (वेषाय) शुभ गुरांच्या आणि विद्यांच्या प्रसारासाठी (वां) विद्या शिकणार्‍या आणि शिकविणार्‍या अशा तुम्हां दोघांना प्रेरित करतो. तुम्हांस श्रेष्ठ कर्म करण्याची आज्ञा देतो. ॥6॥
Essence
भावार्थ - या मंत्रात प्रश्‍नोत्तराच्या रूपाने परमेश्‍वराने जीवांना उपदेश केला आहे. उदाहरणार्थ-कोणी कोणाला विचारतो-‘कोण मला सत्कर्म करण्यासाठी प्रवृत्त करतो?’ तेव्हां उत्तर या प्रमाणे द्यावे ‘तो प्रजापति म्हणजे परमेश्‍वरच तुम्हांला वेदाच्या उपदेशाच्या माध्यमातून पुरुषार्थ करण्याची आणि उत्तम चांगले कर्म करण्याची प्रेरणा देतो. त्याचप्रमाणे एक विद्यार्थी कोणा विद्वानास प्रश्‍न विचारतो-‘कोण आहे जो अंतर्यामीरूपाने माझ्या आत्म्यामधे सत्याचा प्रकाश करतो?’ तेव्हां विद्वानांने उत्तर द्यावे ‘सर्वव्यापक जगदीश्‍वर सत्याचा प्रकाश देतो? नंतर प्रश्‍नकर्त्त्याने पुन्हा विचारावे ‘तो परमेश्‍वर आम्हांला कोण-कोणत्या प्रयोजनाासाठी उपदेश करतो आणि आज्ञा देतो?’ त्याचे उत्तर या प्रमाणे द्यावे-‘सुखाच्या प्राप्तीकरिता, सुखस्वरूप परमेश्‍वराच्या प्राप्तीकरीता आणि सत्य-विद्या व सत्य-धर्माच्या प्रसाराकरिता? प्रश्‍नः- तो ईश्‍वर मला आणि तुम्हांला कोणते कर्म करण्यासाठी उपदेश देतो? त्याचे उत्तर परस्पर असे द्यावे की-‘यज्ञ करण्यासाठी.’ प्रश्‍नः- तो कोण-कोणत्या पदार्थांच्या प्राप्तीसाठी आज्ञा करतो? त्याचे उत्तर याप्रमाणे द्यावे की ‘सर्व विद्यांच्या प्रपातीसांठी आणि त्यांच्या प्रचारासाठी.’ - माणसाने दोन उद्दिष्टांकरिता प्रवृत्त व्हावे-एक म्हणजे उत्पन्न पुरुषार्थ करणे व शरीर निरोगी ठेवून चक्रवर्ती राज्यपदाची प्राप्ती करणे. दुसरे उद्दिष्टे म्हणजे सर्व विद्या चांगल्या प्रकारे अवगत करून त्यांचा प्रचार-प्रसार करणें. कोणाही माणसाने पुरुषार्थाचा त्याग करून आलस्याचे ग्रहण कदापी करू नये. ॥6॥
Subject
त्याचे ग्रहण आणि असत्याचा त्याग करण्याची आज्ञा कुणी दिली, पुढील मंत्रात या विषयी कथन केले आहे.