Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 1 / Mantra 31

31 Mantra
1/31
Devata- यज्ञो देवता सर्वस्य Rishi- परमेष्ठी प्रजापतिर्ऋषिः Chhand- जगती अनुष्टुप्, Swara- निषादः
Mantra with Swara
स॒वि॒तुस्त्वा॑ प्रस॒वऽउत्पु॑ना॒म्यच्छि॑द्रेण प॒वित्रेण॒ सूर्य्य॑स्य र॒श्मिभिः॑। स॒वि॒तुर्वः॑ प्र॒स॒वऽउत्पु॑ना॒म्यच्छि॑द्रेण प॒वित्रे॑ण॒ सूर्य्य॑स्य र॒श्मिभिः॑। तेजो॑ऽसि शु॒क्रम॑स्य॒मृत॑मसि॒ धाम॒ नामा॑सि प्रि॒यं दे॒वाना॒मना॑धृष्टं देव॒यज॑नमसि॥३१॥

स॒वि॒तुः त्वा॒। प्र॒स॒व इति॑ प्रऽस॒वे। उत्। पु॒ना॒मि॒। अच्छि॑द्रेण। प॒वित्रे॑ण। सूर्य्य॑स्य। र॒श्मिभि॒रिति॑ र॒श्मिऽभिः॑। स॒वि॒तुः। वः॒। प्र॒स॒व इति॑ प्रऽस॒वे। उत्। पु॒ना॒मि॒। अच्छि॑द्रेण। प॒वित्रे॑ण। सूर्य्य॑स्य। र॒श्मिभि॒रिति॑ र॒श्मिभिः॑। ते॑जः। अ॒सि॒। शु॒क्रम्। अ॒सि॒। अ॒मृत॑म्। अ॒सि॒। धाम॑। नाम॑। अ॒सि॒। प्रि॒यम्। दे॒वाना॑म्। अना॑धृष्टम्। दे॒व॒यज॑न॒मिति॑ देव॒ऽयजन॑म्। अ॒सि॒ ॥३१॥

Mantra without Swara
सवितुस्त्वा प्रसवऽउत्पुनाम्यच्छिद्रेण पवित्रेण सूर्यस्य रश्मिभिः । सवितुर्वः प्रसवऽउत्पुनाम्यच्छिद्रेण पवित्रेण सूर्यस्य रश्मिभिः । तेजोसि शुक्रमस्यमृतमसि धाम नामासि प्रियन्देवानामनाधृष्टन्देवयजनमसि ॥

सवितुः त्वा। प्रसव इति प्रऽसवे। उत्। पुनामि। अच्छिद्रेण। पवित्रेण। सूर्य्यस्य। रश्मिभिरिति रश्मिऽभिः। सवितुः। वः। प्रसव इति प्रऽसवे। उत्। पुनामि। अच्छिद्रेण। पवित्रेण। सूर्य्यस्य। रश्मिभिरिति रश्मिभिः। तेजः। असि। शुक्रम्। असि। अमृतम्। असि। धाम। नाम। असि। प्रियम्। देवानाम्। अनाधृष्टम्। देवयजनमिति देवऽयजनम्। असि॥३१॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - जो यज्ञ (अच्छिद्रेण) निरन्तर म्हणजे बाधा अथवा व्यवधानाशिवाय (पवित्रेण) पवित्र (सुर्य्यस्य) प्रकाशवान सूर्याच्या (रश्मिभिः) किरणांशी संयुक्त होऊन सर्व पदार्थांना शुद्ध करतो, (त्वा) मी त्या यज्ञाला अथवा यज्ञकर्त्त्याला (उत्पुनामि) उत्कृष्टरीत्या पवित्र करतो. (सवितुः) परमेश्‍वरानें (प्रसवे) उत्पन्न केलेल्या या संसारात (अच्छिद्रेण) निरंतर (पवित्रेण) शुद्धिकारक (सुर्य्यस्य) ऐश्‍वर्याचा प्रेरक जो प्राण, त्या प्राणाच्या (रश्मिभिः) अंतरात्म्याला प्रकाशित करणार्‍या गुणांनी (वः) तुम्हांला व सर्व पदार्थांना यज्ञाद्वारे (उत्पुनामि) समृद्ध व पवित्र करतो. (यज्ञाने आत्म्यामधे प्राणांच्या प्रेणाशक्तीची आणि सद्गुणांची वृद्दी होते). हे ब्रह्मन्, आपण (तेजोसि) स्वयंप्रकाशवान आहात. (शुक्रमसि) शुद्ध (अमृतमसि) आणि अविनाशी आहात, (धामासि) सर्व पदार्थांना धारण करणारे आहात (नामासि) वंदनीय आहात (देवानां) विद्वज्जनांकरिता (प्रियम्) प्रिय आणि (अनादृष्टम्) कुणापासूनही भयमीत न होणारे आहात (देवयजनमसि) विद्वानांसांठी पूजनीय आहात, म्हणून मी (त्वा) आपल्याच आश्रयाला ग्रहण करतो (तुमच्या आश्रयात राहून निर्भय राहतो) हा या मंत्राचा पहिला अर्थ झाला. हा यज्ञ (तेजोसि) प्रकाश आणि (शुक्रमसि) शुद्धतेचे कारण आहे, (अमृतमसि) मोक्षाचे सुख देणारा तसेच (धामासि) अन्न आदी सर्व पदार्थांना पुष्ट करणारा आहे, (नामासि) वृष्टी आणि जलाचे कारण आहे (देवानां) श्रेष्ठ गुणांविषयी (प्रियम्) प्रीती निर्माण करणारा आहे आणि (अनाधृष्टम्) कोणाद्वारे ही खंडित व बाधित होणारा नाही, म्हणजे उत्कृष्ट आहे, तसेच (देवयजनम्) विद्वज्जनांना परमेश्‍वराची पूजा करण्याकडे नेणारा (असि) आहे. यामुळे मी (सवित्तुः) जगदीश्‍वराचे (प्रसवे) उत्पन्न केलेल्या या जगात (अच्छिद्रेण) निरंतर (पवित्रेण) अत्यंत शुद्ध यज्ञाद्वारे अथवा (सुर्य्यस्य) ऐश्‍वर्य उत्पन्न करणार्‍या परमेश्‍वराच्या दिव्य गुणांना/अथवा ऐश्‍वर्याचा दाता जो सर्व, त्या सूर्याच्या अनुक्रमे (रश्मिभिः) ज्ञान-विज्ञानाद्वारे/किरणांद्वारे (वः) तुम्हां लोकांना/प्रत्यक्ष पदार्थांना (उत्पुनामि) पवित्र करतो. हा दुसरा अर्थ झाला. ॥31॥
Essence
भावार्थ - या मंत्रात श्‍लेषालंकार आहे. यज्ञ-विद्येचे महत्त्व प्रतिपादित करतांना परमेश्‍वराने सांगितले आहे की मनुष्यानो, तुम्ही ज्या यज्ञाचे अनुषंन करीत आहात, तो सूर्याच्या किरणांशी संयुक्त होऊन आपल्या शुद्धगुणांनी सर्व पदार्थांना निरंतर पवित्र करीत असतो. तसेच यज्ञाद्वारे सर्व पदार्थ सूर्याच्या किरणांनी तेजवान होतात, यज्ञ आपल्या शुद्ध रक्षक गुणांनी सर्वांना सुख आणि आनंद देणारे दृढ साधन आहे. यज्ञामुळे यज्ञासाठी आवश्यक पदार्थांची (दान्य, ओषधि वनस्पती आदी) उत्पत्ती होऊन त्यापासून निर्मित भोजन, वस्त्र आदीद्वारे शरीरास पुष्टी, बुद्धी आणि शक्ती प्राप्त होते व अशा शुद्ध गुणांच्या संपादनामुळे सर्व जीव सुखी होतात. ॥31॥
Subject
यज्ञ कशाप्रकारे पवित्र होतो, पुढील मंत्रात याविषयी उपदेश केला आहे -
Footnote
या अध्यायामधे परमेश्‍वराने मनुष्यांना शुद्ध कर्मांच्या अनुष्ठानाची अनुज्ञा केली आहे. दोषापासून निवृत्ती आणि शत्रूंच्या निराकरणाविषयी सांगितले आहे तसेच यज्ञक्रियेच्या लाभांचे ज्ञान मिळविणे, उत्तम प्रकारे पुरुषार्थ करणे, विद्येचा विस्तार करणे, धर्मानुकूल राहून प्रजेचे पालन करणे, धर्माचे अनुष्ठान करताना सर्वथा निर्भय राहणे, सर्वांशी मित्राप्रमाणे वर्तन करणे, वेदांपासून सर्व विद्यांचे ग्रहण करणे आणि करविणे, ज्ञान घेणे आणि परोपकार यांसाठी प्रयत्न करण्याची आज्ञा केली आहे. करिता सर्व मनुष्यासाठी हेच उचित आहे त्यानी वरील सर्व आदेशांप्रमाणे आचरण करावे. ॥ ^इथे प्रथम अध्याय समाप्त होत आहे.