Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 1 / Mantra 25

31 Mantra
1/25
Devata- सविता देवता Rishi- परमेष्ठी प्रजापतिर्ऋषिः Chhand- विराट् ब्राह्मी त्रिष्टुप्, Swara- धैवतः
Mantra with Swara
पृथि॑वि देवयज॒न्योष॑ध्यास्ते॒ मूलं॒ मा हि॑ꣳसिषं व्र॒जं ग॑च्छ गो॒ष्ठानं वर्ष॑तु ते॒ द्यौर्ब॑धा॒न दे॑व सवितः पर॒मस्यां॑ पृथि॒व्या श॒तेन॒ पाशै॒र्योऽस्मान्द्वेष्टि॒ यं च॑ व॒यं द्वि॒ष्मस्तमतो॒ मा मौ॑क्॥२५॥

पृथि॑वि। दे॒व॒य॒ज॒नीति॑ देवऽयजनि। ओष॑ध्याः। ते॒। मूल॑म्। मा। हि॒ꣳसि॒ष॒म्। व्र॒जम्। ग॒च्छ॒। गो॒ष्ठान॑म्। गो॒स्थान॒मिति॑ गो॒ऽस्थान॑म्। वर्ष॑तु। ते॒। द्यौः। ब॒धा॒न। दे॒व॒। स॒वि॒त॒रिति॑ सवितः। प॒र॒म्। अस्या॑म्। पृ॒थि॒व्याम्। श॒तेन॑। पाशैः॑। यः। अ॒स्मान्। द्वेष्टि॑। यम्। च॒। व॒यम्। द्वि॒ष्मः। तम्। अतः॑। मा। मौ॒क् ॥२५॥

Mantra without Swara
पृथिवि देवयजन्योषध्यास्ते मूलम्मा हिँसिषँव्रजङ्गच्छ गोष्ठानँवर्षतु ते द्यौर्बधान देव सवितः परमस्याम्पृथिव्याँ शतेन पाशैर्या स्मान्द्वेष्टि यञ्च वयन्द्विष्मस्तमतो मा मौक् ॥

पृथिवि। देवयजनीति देवऽयजनि। ओषध्याः। ते। मूलम्। मा। हिꣳसिषम्। व्रजम्। गच्छ। गोष्ठानम्। गोस्थानमिति गोऽस्थानम्। वर्षतु। ते। द्यौः। बधान। देव। सवितरिति सवितः। परम्। अस्याम्। पृथिव्याम्। शतेन। पाशैः। यः। अस्मान्। द्वेष्टि। यम्। च। वयम्। द्विष्मः। तम्। अतः। मा। मौक्॥२५॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे (देव) सूर्यादी पदार्थांद्वारे या जगाला प्रकाशित करणार्‍या तसेच (सवितः) राज्य आणि ऐश्‍वर्य दान करणार्‍या हे परमेश्‍वरा, (ते) तुझी अशी कृपा असू दे की (देवयजनि) विद्वज्जनांद्वारे यज्ञ संपन्न करण्याचे जे स्थान आहे (ते) म्हणजे ही ती जी (पृथिवी) भूमी आहे, की जी (ओषध्याः) यवादी ओषधींना उत्पन्न करण्याचे (मूलं) मूल आहे, कारण आहे, त्याचा मी (मा हिंसिषम्) नाश किंवा हानी करूं नये. मी या (पृथिव्यां) अनेक प्रकारे सुख देणार्‍या या भूमीत (यः) या ज्या यज्ञाचे अनुष्ठान करीत आहे, तो यज्ञ (वज्रं) वृष्टिकारक मेघापर्यंत (गच्छ) जावो आणि तिथे जाऊन (गोष्ठानं) सूर्याच्या किरणांच्या प्रभावामुळे (वर्षतु) खाली भूमीवर वृष्टिरूपाने येवो. तसेच (घौः) सूर्याच्या प्रकाशामुळे (वर्षतु) वृष्टी व्हावी. हे वीर पुरुषांनो, तुम्ही (अस्यां) या पृथिवीवर (यः) जे जे म्हणून अधर्मात्मा चोर, दरोडेखोर आहेत की जे (अस्मान्) सर्वांवर उपकार करणार्‍या आम्ही धर्मात्मा सज्जनांचा (द्वेष्टि) विरोध करतात (च) आणि (यं) तशा दुष्ट शत्रूचा (वयं) आम्ही धार्मिक शूरजनांनी (द्विष्मः) विरोध करावा हे विरांनो (त) त्या दुष्ट (पर) शत्रूला (शतेन) अनेक (पाशैः) बन्धनांद्वारे (बधान) बांधा आणि त्याला (अतः) या बंधनापासून कधीही (मा मौक्) सोडूं नका. ॥25॥
Essence
भावार्थ - ईश्‍वर आदेश देत आहे की ज्ञानी मनुष्यांनी पृथिवीचा नाश करूं नये. त्या पृथिवीवर तीन प्रकारचा यज्ञाचा सदा विस्तार करावा आणि पृथिवीवरील ओषधींचा कधीही नाश करूं नये. हा यज्ञ अग्नीत आहुत पदार्थांच्या धूम्रास मेघमंडळापर्यंत नेतो आणि तिथे वृष्टि-जलाची शुद्धी करून अत्यन्त सुखकारी होतो. याकरिता कोणाही मनुष्याने यज्ञाचा त्याग करू नये. तसेच पृथिवीवर जे दुष्ट दुर्जन आहेत, त्याना अनेक बंधनांने बांधावे. सर्वांनी असे करावे की असे दुष्ट कर्मापासून दूर राहतील, यासाठी त्यांना कधीही बंधनातून मुक्त करु नये. सर्वांना हे आवश्यक आहे की आपसात ईर्षा-द्वेषादी उत्पन्न होऊ देऊ नये आणि एकमेकाच्या सर्व प्रकारच्या सुखाकरिता सर्वांनी सदा सतत यत्न करावा. ॥25॥
Subject
या नंतर तो यज्ञ कुठे जाऊन कोणते लाभ देतो, याविषयी पुढील मंत्रात उपदेश केला आहे -