Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 1 / Mantra 24

31 Mantra
1/24
Devata- द्योविद्युतौ देवते Rishi- परमेष्ठी प्रजापतिर्ऋषिः Chhand- स्वराट् ब्राह्मी पङ्क्ति, Swara- पञ्चमः
Mantra with Swara
दे॒वस्य॑ त्वा सवि॒तुः प्र॑स॒वेऽश्विनो॑र्बा॒हुभ्यां॑ पू॒ष्णो हस्ता॑भ्याम्। आद॑देऽध्वर॒कृतं॑ दे॒वेभ्य॒ऽइन्द्र॑स्य बा॒हुर॑सि॒ दक्षि॑णः स॒हस्र॑भृष्टिः श॒तते॑जा वा॒युर॑सि ति॒ग्मते॑जा द्विष॒तो व॒धः॥२४॥

दे॒वस्य॑। त्वा॒। स॒वि॒तुः। प्र॒स॒व इति॑ प्रऽस॒वे। अ॒श्विनोः॑। बा॒हुभ्या॒मिति॑ बा॒हुऽभ्या॑म्। पू॒ष्णः। हस्ता॑भ्याम्। आ। द॒दे॒। अ॒ध्व॒र॒कृत॒मित्य॑ध्वर॒ऽकृत॑म् दे॒वेभ्यः॑। इन्द्र॑स्य। बा॒हुः। अ॒सि॒। दक्षि॑णः। स॒हस्र॑भृष्टि॒रिति॑ स॒हस्र॑ऽभृष्टिः। श॒तते॑जा॒ इति श॒तऽते॑जाः। वा॒युः। अ॒सि॒। ति॒ग्मते॑जा॒ इति॑ ति॒ग्मऽते॑जाः। द्वि॒ष॒तः। व॒धः ॥२४॥

Mantra without Swara
देवस्य त्वा सवितुः प्रसवेश्विनोर्बाहुभ्याम्पूष्णो हस्ताभ्याम् । आददेध्वरकृतन्देवेभ्यऽइन्द्रस्य बाहुरसि दक्षिणः सहस्रभृष्टिः शततेजा वायुरसि तिग्मतेजा द्विषतो बधः ॥

देवस्य। त्वा। सवितुः। प्रसव इति प्रऽसवे। अश्विनोः। बाहुभ्यामिति बाहुऽभ्याम्। पूष्णः। हस्ताभ्याम्। आ। ददे। अध्वरकृतमित्यध्वरऽकृतम् देवेभ्यः। इन्द्रस्य। बाहुः। असि। दक्षिणः। सहस्रभृष्टिरिति सहस्रऽभृष्टिः। शततेजा इति शतऽतेजाः। वायुः। असि। तिग्मतेजा इति तिग्मऽतेजाः। द्विषतः। वधः॥२४॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (सवितुः) अंतर्यामी आणि सर्वांना प्रेरणा देणार्‍या आणि (देवस्य) सर्वांना आनन्द देणार्‍या परमेश्‍वराकडून (प्रसवे) प्रेरणा घेऊन (अश्‍विनोः) सूर्य, चन्द्र आणि अध्वर्यूंच्या शक्ती आणि तेजापासून लाभ घेऊन (पूष्णः) पुष्टिकारक वायूच्या (हस्ताभ्यां) ग्रहण आणि त्याग यांचे कारण असलेल्या उदान आणि अपान या प्रकारच्या साहाय्याने (देवेभ्यः) विद्वज्जनांचा सुखाकरता किंवा दिव्य सुखांच्या प्राप्तीकरिता (अध्वरकृतं) यज्ञीय पदार्थ व यज्ञ समान सुखकारक कर्माचा मी (आददे) उत्तम प्रकारे स्वीकार करीत आहे. हे यम (इन्द्रस्य) सूर्याचा (सहस्रभृष्टिः) अनेक पदार्थांचे पाचन करण्याची शक्ती असलेल्या (शततेजाः) अनेक प्रकारच्या तेजांना (दक्षिणः) धारण किंवा प्राप्त करणारा (बाहुः) किरणसमूह आहे (इन्द्रस्य) सूर्याच्या अथवा मेघमंडळाचा (तिग्मतेजाः) तीक्ष्ण तेज वेग असलेला (वायुः) वायू कारण (असि) आहे, त्या वायूमुळे आणि यज्ञामुळे आम्ही अनेक प्रकारचे सुख मिळविले पाहिजेत आणि (द्विषतः) शत्रुंचा (वधः) नाश केला पाहिजे. ॥24॥
Essence
भावार्थ - परमेश्‍वर आज्ञा देत आहे की, मनुष्यांनी चांगल्या प्रकारे सिद्ध केलेला यज्ञ करावा. सिद्ध केलेल्या अशा यमात भौतिक अग्नीमधे आहुत केलेले हव्य पदार्थ वर जाऊन सूर्याच्या किरयांत स्थिर होतात, वायू त्या पदार्थांना धारण करतो किंवा त्याचे वहन करून सर्वांचा उपकारक आणि सर्वांच्या सुखदायक ठरतो, तसेच दुःखांचा विनाश करणारा होतो. ॥24॥
Subject
पुनश्‍च तो वर्णित यज्ञ कसा आहे व त्याचे अनुष्ठान का करावे, पुढील मंत्रात याविषयी सांगितलेले आहे-