Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 1 / Mantra 23

31 Mantra
1/23
Devata- अग्निर्देवता Rishi- परमेष्ठी प्रजापतिर्ऋषिः Chhand- बृहती, Swara- मध्यमः
Mantra with Swara
मा भे॒र्मा॒ संवि॑क्था॒ऽअत॑मेरुर्य॒ज्ञोऽत॑मेरु॒र्यज॑मानस्य प्र॒जा भू॑यात् त्रि॒ताय॑ त्वा द्वि॒ताय॑ त्वैक॒ताय॑ त्वा॥२३॥

मा। भेः॒। मा। सम्। वि॒क्थाः॒। अत॑मेरुः। य॒ज्ञः। अत॑मेरुः। यज॑मानस्य। प्र॒जेति॑ प्र॒ऽजा। भू॒या॒त्। त्रि॒ताय॑। त्वा॒। द्वि॒ताय॑। त्वा॒। ए॒क॒ताय॑। त्वा॒ ॥२३॥

Mantra without Swara
मा भेर्मा सँविक्थाऽतमेरुर्यज्ञो तमेरुर्यजमानस्य प्रजा भूयात्त्रिताय त्वा द्विताय त्वैकताय त्वा ॥

मा। भेः। मा। सम्। विक्थाः। अतमेरुः। यज्ञः। अतमेरुः। यजमानस्य। प्रजेति प्रऽजा। भूयात्। त्रिताय। त्वा। द्विताय। त्वा। एकताय। त्वा॥२३॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे विद्यावान मनुष्यांनो, तुम्ही (अतमेरुः) श्रद्धावान होऊन (यजमानस्य) यजमानाद्वारे आयोजित या यज्ञाच्या अनुष्ठानापासून (मा भेः) कोणत्याही प्रकारे भीती बाळगूं नका म्हणजे भय किंवा संकोच मानूं नका. या यज्ञापासून (मा संविक्थाः) विचलित होऊं नका. उक्त प्रकारे, (यज्ञः) यज्ञ करीत गेल्याने तुम्हाला उत्तमोत्तम (अतमेरुः) ग्लानिरहित व श्रद्धावान (प्रजा) संतती (भूयात्) लाभो. मी परमेश्‍वर (त्वा) त्या भौतिक अग्नीला (एकताय) (द्विताय) (त्रिताय) निर्मळ प्राप्ती सुखाकरितां, वायु आणि जल या दोन्हीच्या शुद्धीकरिता आणि तीन प्रकारच्या यज्ञामधे हव्य पदार्थांचा प्राप्तीकरिता (संयौमि) तुमच्याशी संयुक्त करीत आहे अर्थात् यज्ञाकरिता तुम्हांस अग्नी हव्य आदी पदार्थांचे दान करीत आहे. ॥23॥
Essence
भावार्थ - ईश्‍वर सर्व मानवांना आज्ञा व आशीर्वाद देऊन उपदेश करीत आहे की कोणीही विद्याग्रहणापासून भीती मानून दूर राहू नये. तसेच या सत्कार्यांपासून विचलित होऊ नये. कारण की वर्णित यज्ञादी श्रेष्ठकर्मांमुळेच सर्व माणसांना उत्तम संतती प्राप्त होते आणि यज्ञामुळेच शारीरिक, वाचिक मानसिक सुखांची निश्‍चल रुपाने प्राप्ती होणे शक्य आहे. ॥23॥
Subject
सर्वांनी निःशंक होऊन पूर्वोक्त यज्ञ अवश्य करावा, पुढील मंत्रात याविषयी उपदेश केला आहे-