Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 1 / Mantra 21

31 Mantra
1/21
Devata- यज्ञो देवता सर्वस्य Rishi- परमेष्ठी प्रजापतिर्ऋषिः Chhand- गायत्री,निचृत् पङ्क्तिः Swara- पञ्चमः
Mantra with Swara
दे॒वस्य॑ त्वा सवि॒तुः प्र॑स॒वेऽश्विनो॑र्बा॒हुभ्यां॑ पू॒ष्णो हस्ता॑भ्याम्। सं व॑पामि॒ समाप॒ऽओष॑धीभिः॒ समोष॑धयो॒ रसे॑न। सꣳ रे॒वती॒र्जग॑तीभिः पृच्यन्ता॒ सं मधु॑मती॒र्मधु॑मतीभिः पृच्यन्ताम्॥ २१॥

दे॒वस्य॑। त्वा॒। स॒वि॒तुः। प्र॒स॒व इति॑ प्रऽस॒वे। अ॒श्विनोः॑। बा॒हुभ्या॒मिति॑ बा॒हुभ्या॑म्। पू॒ष्णः। हस्ता॑भ्याम्। सम्। व॒पा॒मि॒। सम्। आपः॑। ओष॑धीभिः। सम्। ओष॑धयः। रसे॑न। सम्। रे॒वतीः॑। जग॑तीभिः। पृ॒च्य॒न्ता॒म्। सम्। मधु॑मती॒रिति॒ मधु॑ऽमतीः। मधु॑मतीभि॒रिति॒ मधु॑ऽमतीभिः। पृ॒च्य॒न्ता॒म् ॥२१॥

Mantra without Swara
देवस्य त्वा सवितुः प्रसवेऽश्विनोर्बाहुभ्यां पूष्णो हस्ताभ्याम् । सं वपामि समापऽओषधीभिः समोषधयो रसेन । सँ रेवतीर्जगतीभिः पृच्यन्ताम् सं मधुमतीर्मधुमतीभिः पृच्यन्ताम् ॥

देवस्य। त्वा। सवितुः। प्रसव इति प्रऽसवे। अश्विनोः। बाहुभ्यामिति बाहुभ्याम्। पूष्णः। हस्ताभ्याम्। सम्। वपामि। सम्। आपः। ओषधीभिः। सम्। ओषधयः। रसेन। सम्। रेवतीः। जगतीभिः। पृच्यन्ताम्। सम्। मधुमतीरिति मधुऽमतीः। मधुमतीभिरिति मधुऽमतीभिः। पृच्यन्ताम्॥२१॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे मनुष्यांनो, ज्याप्रमाणे मी (सवितुः) समस्त ऐश्‍वर्य देणार्‍या (देवस्य) परमेश्‍वराने (प्रसवे) उत्पन्न केलेल्या या प्रत्यक्ष असलेल्या जगात (अश्‍विनोः) सूर्याच्या आणि भूमीच्या तेजाने (बाहुभ्यां) दृढतेने (पूष्णः) पुष्टी देणार्‍या वायूच्या (हस्ताभ्यां) प्राण आणि अपान व्यान, प्रकाराद्वारे (त्वा) पूर्वोक्त तीन प्रकारच्या यज्ञाचा (संवपामि) विस्तार करीत आहे, त्याप्रमाणे तुम्हीदेखील विस्तृत रूपाने या यज्ञाचे अनुष्ठान करा. या उत्पन्न जगामधे सूर्याच्या प्रकाशामुळे (ओषधीभिः) यवादी औषधींपासून जल आणि (ओषधयः) ओषधी प्राप्त होतात (रसेन) आनन्ददायी रसाने तसेच (जगतीभिः) उत्तम ओषधीपासून (रेवत्यः) उत्तमजल प्राप्त होतात, (मधुमतीभिः) आणि अत्यंत रस रूप जल प्राप्त होतात, म्हणजे ओषधीपासून आनन्ददायक रस, उत्तम रस आणि मधुर रसाने भरलेले जल प्राप्त होते व हे सर्व जल मिळून वृद्धीस पावतात, त्याप्रमाणे आम्ही सर्वानी देखील ओषधीपासून जल आणि ओषधी, उत्तम जलाने उत्तम ओषधी आणि उत्तम रसयुक्त जलाने अत्युत्तम मधुर रसयुक्त औषधी प्राप्त केली पाहिजे. या सर्व प्रकारच्या ओषधी जल आणि रस या सर्वाचे यथोचित रीतीने व युक्तीने मिश्रण करून वैद्यकशास्त्र व शिल्पशास्त्राची वृद्धी केली पाहिजे. ॥21॥
Essence
भावार्थ - या मंत्रात लुप्तोपमालंकार आहे. विद्वान् लोकांसाठी आवश्यक आहे की ईश्‍वराने उत्पन्न केलेल्या या जगात किंवा सूर्याच्या प्रकाशाने प्रकाशित या संसारात संमिश्रण व संप्रयोग करण्यास योग्य अशा पदार्थांना मिश्रण करावे आणि त्या द्वारे तीन प्रकारच्या यज्ञांचे अनुष्ठान नित्य करावे. या जगात जल आपल्या रसाने औषधींना वाढलेले व त्या उत्तम रसयुक्त जलामुळे ओषधीमधे रोगनाशक शक्तीची उत्पत्ती होऊन त्या सुखदायी होतात. ईश्‍वर कारणापासून कार्याची यथावत् रचना करतो, तसेच सूर्य सर्व जगाला प्रकाशित करतो, रसांचे भेदन करून पृथिवी आदी पदार्थाना आकर्षित करतो. वायु देखील रसाचे धारण करून पृथिवीवरील पदार्थांना पुष्टी देतो. जल, ईश्‍वर, सूर्य आणि वायु या सर्वांप्रमाणे आम्ही देखील यथावत् संस्कारित व संयुक्त पदार्थांद्वारे सर्वांना सुख द्यावे. विद्वानांचा संग करावा, विद्येची उन्नती करावी व होमाद्वारे तसेच शिल्प-क्रिया रूप यज्ञाद्वारे वायु आणि वर्षा-जलाची शुद्धी नेहमी करावी. ॥21॥
Subject
ज्या औषधींपासून अन्नाची निर्मिती होते, त्या ओषधी यज्ञादी कर्मामुळे कशा प्रकारे होतात याविषयीचा उपदेश पुढील मंत्रात केला आहे -