Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 1 / Mantra 20

31 Mantra
1/20
Devata- सविता देवता Rishi- परमेष्ठी प्रजापतिर्ऋषिः Chhand- विराट् ब्राह्मी त्रिष्टुप्, Swara- धैवतः
Mantra with Swara
धा॒न्यमसि धिनु॒हि दे॒वान् प्रा॒णाय॑ त्वोदा॒नाय॑ त्वा व्या॒नाय॑ त्वा। दी॒र्घामनु॒ प्रसि॑ति॒मायु॑षे धां दे॒वो वः॑ सवि॒ता हिर॑ण्यपाणिः॒ प्रति॑गृभ्णा॒त्वच्छि॑द्रेण पा॒णिना॒ चक्षु॑षे त्वा म॒हीनां॒ पयो॑ऽसि॥ २०॥

धा॒न्य᳖म्। अ॒सि॒। धि॒नु॒हि। दे॒वान्। प्रा॒णाय॑। त्वा॒। उ॒दा॒नायेत्यु॑त्ऽआ॒नाय॑। त्वा॒। व्या॒नायेति॑ विऽआ॒नाय॑। त्वा॒। दी॒र्घाम्। अनु॑। प्रसि॑तिमिति॒ प्रऽसि॑तिम्। आयु॑षे। धा॒म्। दे॒वः। वः॒। स॒वि॒ता। हिर॑ण्यपाणि॒रिति॒ हिर॑ण्यऽपाणिः। प्रति॑। गृ॒भ्णा॒तु॒। अच्छि॑द्रेण। पा॒णिना॒। चक्षु॑षे। त्वा॒। म॒हीना॑म्। पयः॑। अ॒सि॒ ॥२०॥

Mantra without Swara
धान्यमसि धिनुहि देवान् प्राणाय त्वोदानाय त्वा व्यानाय त्वा। दीर्घामनु प्रसितिमायुषे धां देवो वः सविता हिरण्यपाणिः प्रति गृभ्णात्वच्छिद्रेण पाणिना चक्षुषे त्वा महीनां पयोऽसि ॥

धान्यम्। असि। धिनुहि। देवान्। प्राणाय। त्वा। उदानायेत्युत्ऽआनाय। त्वा। व्यानायेति विऽआनाय। त्वा। दीर्घाम्। अनु। प्रसितिमिति प्रऽसितिम्। आयुषे। धाम्। देवः। वः। सविता। हिरण्यपाणिरिति हिरण्यऽपाणिः। प्रति। गृभ्णातु। अच्छिद्रेण। पाणिना। चक्षुषे। त्वा। महीनाम्। पयः। असि॥२०॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (धान्यम्) यज्ञाने तांदूळ आदी धान्य, तसेच (पयः) जल उत्तम गुणकारी, सुखदायक आणि रोगनाशक आणि शुद्ध झालेले (असि) असते (देवान्) ते विद्वानांना, प्राण्यांना अथवा इन्द्रियांना (धिनुहि) तृप्त करते. यामुळे हे मनुष्यानो, ज्याप्रमाणे मी परमेश्‍वर (त्वा) धान्य, जलादी वस्तूंना तुमच्या (प्राणाय) जीवनासाठी (त्वा) (उदानाय) तुमच्या स्फुर्ती, शक्ती आणि पराक्रमासाठी तसेच (त्वा) (व्यानाय) सर्व शुभ, गुण, शुभ कर्म अथवा विद्येच्या प्रसारासाठी (दीर्घां) दीर्घकाळापर्यंत (प्रसिंतिं) अत्युत्तमसुखपूर्ण अशा (आयुषे) तुमच्या पूर्ण आयु भोगण्याकरिता (धाम्) देत आहे व धारण करीत आहे, तद्वत तुम्ही देखील वरील उद्दिष्टांकरिता त्या यज्ञाला नित्य धारण करा. तो (हिरण्यपाणिः) मोक्ष देणारा, सर्व जगाचा उत्पादक आणि (सविता) सर्व ऐश्‍वर्यदाता परमेश्‍वर (अच्छिद्रेण) आपल्या व्यापकत्वगुणामुळे आणि उत्तम कार्यामुळे (महिनां) महान् वेदवाणी देऊन (प्रत्यनुभ्णातु) आम्हां विद्वान्) जनांना अनुग्रहीत करतो, त्याप्रमाणे आम्ही देखील ईश्‍वराला (अच्छिद्रेण) निरंतर (पाणिना) त्याची स्तुती, उपासना करून अवश्य ग्रहण करावे. ज्याप्रमाणे (हिरण्यपाणिः) पदार्थांना प्रकाशित करणारा (सविता) सूर्य (महीनां) लोक-लोकान्तरापर्यंत असलेल्या पृथिवी आदी नां पाहण्यासाठी (अ्च्छिद्रेण) निरंतर तीव्र प्रकाश देतो आणि (पयः) जल (प्रतिगृभ्णातु) देऊन अन्न-धान्यादी पदार्थांना पुष्ट करतो, त्याप्रमाणे आम्ही देखील त्या सूर्याला (सूर्यशक्तीला) (अच्छिद्रेण) निरंतर (पाणिना) उपयोगात व व्यवहारात आणून (महीनां) पृथिवीच्या (चक्षुषे) पदार्थांना पाहण्याकरिता त्याचा स्वीकार करतो. ॥20॥
Essence
भावार्थ - या मंत्रात लुप्तोपमालंकार आहे. यज्ञामुळे शुद्ध झालेले अन्न, जल आणि पवन आदी जे पदार्थ आहेत, ते सर्वांची शुद्धी करून बल, पराक्रम उत्पन्न करणारे आणि दृढ, दीर्घ, आयु वाढविण्यात समर्थ असतात. यामुळे सर्व मनुष्यांनी यज्ञकर्माचे अनुष्ठान नित्य करावे. तसेच परमेश्‍वराने प्रकट केलेली जी वेद चतुष्टयी म्हणजे चार वेदांची वाणी आहे, त्याचे ज्ञान प्राप्त करण्यासाठी ईश्‍वराच्या अनुग्रहाची कामना करीत पुरुषार्थ करावा. ज्याप्रमाणे ईश्‍वर परोपकारी मनुष्यांवर कृपा करतो, त्याप्रमाणे आम्ही देखील सर्व प्राण्यांवर नित्य कृपा केली पाहिजे. अथवा ज्याप्रमाणे अंतर्यामी परमेश्‍वर आत्म्यामधे वेदांद्वारे सत्य ज्ञानाचा प्रकाश करतो व सूर्य सर्व मूर्तिमान पदार्थांना प्रकाशित करतो, त्याप्रमाणे आम्ही सर्व जणांनी सर्वांच्या सुखाकरिता सर्वांना ज्ञान देऊन संपूर्ण विद्या द्यावी, शिकवावी. या मार्गाने आम्ही पृथिवीवर चक्रवर्ती राज्याची स्थापना करू शकू. यासाठी आम्ही उत्तमात्तम सुख निर्माण करण्यासाठी निरंतर प्रयत्नशील राहायला हवे. ॥20॥
Subject
कोणत्या प्रयोजनाने यज्ञ करावा, याविषयी पुढील मंत्रात सांगितले आहे-