Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 1 / Mantra 19

31 Mantra
1/19
Devata- अग्निर्देवता Rishi- परमेष्ठी प्रजापतिर्ऋषिः Chhand- निचृत् ब्राह्मी त्रिष्टुप्, Swara- धैवतः
Mantra with Swara
शर्मा॒स्यव॑धूत॒ꣳ रक्षोऽव॑धूता॒ऽअरा॑त॒योऽदि॑त्या॒स्त्वग॑सि॒ प्रति॒ त्वादि॑तिर्वेतु। धि॒षणा॑सि पर्व॒ती प्रति॒ त्वादि॑त्या॒स्त्वग्वे॑त्तु दि॒वः स्क॑म्भ॒नीर॑सि धि॒षणा॑सि पार्वते॒यी प्रति॑ त्वा पर्व॒ती वे॑त्तु ॥१९॥

शर्म॑। अ॒सि॒। अव॑धूत॒मित्यव॑ऽधूतम्। रक्षः॑। अव॑धूता॒ इत्यव॑ऽधूताः। अरा॑तयः। अदि॑त्याः। त्वक्। अ॒सि॒। प्रति॑। त्वा॒। अदि॑तिः। वे॒त्तु॒। धि॒षणा॑। अ॒सि॒। प॒र्व॒ती। प्रति॑। त्वा॒। अदि॑त्याः। त्वक्। वे॒त्तु॒। दि॒वः। स्क॒म्भ॒नीः। अ॒सि॒। धिषणा॑। अ॒सि॒। पा॒र्व॒ते॒यी। प्रति॑। त्वा॒। प॒र्व॒ती वे॒त्तु॒ ॥१९॥

Mantra without Swara
शर्मास्यवधूतँ रक्षोऽवधूताऽअरातयोदित्यास्त्वगसि प्रति त्वादितिर्वेत्तु । धिषणासि पर्वती प्रति त्वादित्यास्त्वग्वेत्तु दिवः स्कम्भनीरसि धिषणासि पार्वतेयी प्रति त्वा पर्वती वेत्तु ॥

शर्म। असि। अवधूतमित्यवऽधूतम्। रक्षः। अवधूता इत्यवऽधूताः। अरातयः। अदित्याः। त्वक्। असि। प्रति। त्वा। अदितिः। वेत्तु। धिषणा। असि। पर्वती। प्रति। त्वा। अदित्याः। त्वक्। वेत्तु। दिवः। स्कम्भनीः। असि। धिषणा। असि। पार्वतेयी। प्रति। त्वा। पर्वती वेत्तु॥१९॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे मनुष्यांनो, तुम्ही यज्ञाला जाणा व त्याचे स्वरूप ओळखा. हा यज्ञ (शर्म) सुखकारी आहे (अदितिः) अविनाशी आहे. यज्ञामुळेच (रक्षः) दुख देणारी आणि दुष्ट स्वभावाची माणसे (अवधूतं) विनष्ट होतात आणि (अरातयः) दानादी धर्मापासून दुर असलेली माणसे (अवधूताः) नष्ट (असि) होतात. हा यज्ञ (अदित्याः) अंतरिक्षाच्या अथवा पृथिवीच्या (त्वक्) त्वेचेप्रमाणे (असि) आहे. अशा या यज्ञाचे तुम्ही महत्त्व ओळखा. विद्यारूप यज्ञाचे (पर्वती) अत्यंत ज्ञानयुक्त (दिवः) प्रकाशमान सूर्यादी लोकांना (स्कम्भनीः) रोखून धरणारी तसेच (पार्वतेयी) मेघाची कन्या म्हणजे जी पृथिवी (धिषणा) जी वेदवाणी (आदित्याः) पृथिवीच्या (त्वक्) शरीराप्रमाणे विस्तृतरूपाने प्रसार पावते (त्वा) त्या वेदवाणीला तुम्ही (प्रतिवेत्तु) यथावत् जाणा. तसेच सत्संगतिरूप यज्ञाद्वारे (पार्वती) उत्तमोत्तम ब्रह्मज्ञान देणारी जी (धिषणा) द्यौः म्हणजे प्रकाशरूप बुद्धी आहे, (त्वा) त्यासही (प्रतिवेत्तु) तुम्ही जाणा. ॥19॥
Essence
भावार्थ - माणसांसाठी आवश्यक आहे की त्यानी विज्ञानाद्वारे उत्तम पदार्थांची निवड व संग्रह करून त्या पदार्थांद्वारे यज्ञाचे अनुष्ठान करावे, कारण तो यज्ञ वृष्टी आणि बुद्धी यांची वृद्धी करणारा आहे. अग्नीद्वारे शुद्ध केलेला आणि दोषरहित मनाने केलेला यज्ञ सूर्याच्या प्रकाशास त्वचेप्रमाणे सेवतो (म्हणजे ज्या प्रमाणे त्वचा सूर्य-प्रकाशातून लाभ घेत, तद्वत् यज्ञाद्वारेही सूर्य-प्रकाशापासून लाभ घेता येतात.) ॥19॥
Subject
यानंतर परमेश्‍वराने पुढील मंत्रात यज्ञाचे स्वरूप व त्याचे अंग, याविषयी कथन केले आहे -