Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 1 / Mantra 17

31 Mantra
1/17
Devata- अग्निर्देवता Rishi- परमेष्ठी प्रजापतिर्ऋषिः Chhand- निचृत् ब्राह्मी पङ्क्ति, Swara- पञ्चमः
Mantra with Swara
धृष्टि॑र॒स्यपा॑ऽग्नेऽअ॒ग्निमा॒मादं॑ जहि॒ निष्क्र॒व्याद॑ꣳ से॒धा दे॑व॒यजं॑ वह। ध्रु॒वम॑सि पृथि॒वीं दृ॑ꣳह ब्रह्म॒वनि॑ त्वा क्षत्र॒वनि॑ सजात॒वन्युप॑दधामि॒ भ्रातृ॑व्यस्य व॒धाय॑॥१७॥

धृष्टिः। अ॒सि। अप॑। अ॒ग्ने॒। अ॒ग्निम्। आ॒माद॒मित्या॑मऽअद॑म्। ज॒हि॒। निष्क्र॒व्याद॒मिति निष्क्रव्य॒ऽअद॑म्। सेध॒। आ। दे॒व॒यज॒मिति। देव॒ऽयज॑म्। व॒ह॒। ध्रु॒वम्। अ॒सि॒। पृ॒थिवी॑म्। दृ॒ꣳह॒। ब्र॒ह्म॒वनीति ब्रह्म॒ऽवनि॑। त्वा॒। क्ष॒त्र॒वनीति॑ क्षत्र॒ऽवनि॑। स॒जा॒त॒वनीति॑ सजात॒ऽवनि॑। उप॑ऽद॒धा॒मि॒। भ्रातृ॑व्यस्य व॒धाय॑ ॥१७॥

Mantra without Swara
धृष्टिरस्यपाग्नेऽअग्निमामादञ्जहि निष्क्रव्यादँ सेधा आ देवयजँ वह । धु्रवमसि पृथिवीन्दृँह ब्रह्मवनि त्वा क्षत्रवनि सजातवन्युप दधामि भ्रातृव्यस्य बधाय ॥

धृष्टिः। असि। अप। अग्ने। अग्निम्। आमादमित्यामऽअदम्। जहि। निष्क्रव्यादमिति निष्क्रव्यऽअदम्। सेध। आ। देवयजमिति। देवऽयजम्। वह। ध्रुवम्। असि। पृथिवीम्। दृꣳह। ब्रह्मवनीति ब्रह्मऽवनि। त्वा। क्षत्रवनीति क्षत्रऽवनि। सजातवनीति सजातऽवनि। उपऽदधामि। भ्रातृव्यस्य वधाय॥१७॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे (अग्ने) परमेश्‍वरा, तू (धृष्टिः) प्रगल्भ म्हणजे निर्भय (असि) आहेस (निष्क्रव्यादं) भस्म आदी ज्या पक्व वस्तू आहेत, त्यांच्या व्यतिरिक्त (आमादं) जे कच्चे पदार्थ आहेत, त्यांना जाळणारा जो भौतिक अग्नी अथवा विद्युत अग्नी आहे, त्याला तू सामर्थ्यशाली कर. कारण तो अग्नी (देवयजं) विद्वान् जनांना लाभकारी आहे तसेच श्रेष्ठ गुणांची प्राप्ती करून देणारा आहे. अशा भौतिक अग्नीला अथवा विद्युत रूप अग्नीला तू आम्हांसाठी तत्पर कर. तसेच आमचे कल्याण व्हावे यांसाठी व उत्तमोत्तम सुखांच्या प्राप्तीसाठी तंत्र व शास्त्राचे ज्ञान देऊन आमच्या दुःखांना (अपजहि) निश्‍चल सुख देणारा (असि) आहेस. याकरिता (पृथिवीं) या विशाल भूमीला किंवा त्या भूमीवर निवास करणार्‍या माणसांना (दृंह) उत्तम गुणांनी समृद्ध कर. हे (अग्ने) जगदीश्‍वरा, तु प्रशंसनीय व वंदनीय आहेस, म्हणून मी (भ्रातृव्यस्य दुष्टांच्या व शत्रूंच्या (वधाय) विनाशासाठी (ब्रह्मवनिं) (क्षत्रवनिं) (सजातवनिं) ब्राह्मण, क्षत्रिय व प्राणिमात्राला सुख अथवा दुःख देणार्‍या (त्वा) तुला (उपदधामि) हृदयात धारण करतो. - हा या मंत्राचा पहिला अर्थ झाला. ^दुसरा अर्थ असा - हे विद्वान् यजमान, हा (अग्ने) भौतिक अग्नी (धृष्टिः) अति तीव्र (असि) आहे निकृष्ट व व्यर्थ पदार्थांना नष्ट करून उत्तम पदार्थांची प्राप्ती करून देणारा आहे, (देवयजं) तसेच विद्वानांना दिव्यगुणांची प्राप्ती करून देणारा जो यज्ञ आहे, हा अग्नी त्या यज्ञाची प्राप्ती करून देणारे साधक आहे. यामुळे तुम्ही (निष्क्रव्यादं) पक्व अशा भस्म आदी वस्तूंचा त्याग करून (आमादं) कच्चे पदार्थांना जाळण्या किंवा शिजविण्याकरिता या अग्नीस प्राप्त करा. तसेच (देवयजं) विद्वानांची व दिव्य गुणांची प्राप्ती देणार्‍या (अग्नीं) समोर प्रत्यक्ष दिसत असलेल्या या अग्नीस अप्रत्यक्ष विद्युतरूप अग्नीस (आवह) प्राप्त करा. (त्याची माहिती घेऊन त्यापासून लाभ घ्या) तसेच अग्नीचे ज्ञान व तंत्राचा शोध करण्याची इच्छा आसणार्‍यांना शास्त्रांचे (विज्ञानाचे) उत्तमोत्तम शिक्षण देऊन त्यांना सर्वज्ञान (सेद) सांगा व शिकवा. त्या शास्त्राच्या अनुष्ठानात जे दोष असतील, त्यांचा (अपजहि) नाश करा. हा अग्नी सूर्याच्या रूपाने (ध्रवं) स्तिर म्हणजे अस्तिवात (असि) आहे. आकर्षणशक्ती द्वारे (पृथिवीं) विस्तृत भूमीला व त्यावर राहणार्‍या प्राण्यांना (दृंह) करणारा आहे. यामुळे मी त्या (ब्रह्मवनिं) (क्षत्रवनिं) (सजातवनिं) ब्राह्मण, क्षत्रिय व जीवमात्राच्या सुखाचे कारण व दुःखाचे निवारण करणार्‍या भौतिक अग्नीला (भ्रातृव्यस्य) दुष्टांच्या आणि शत्रूंच्या (वधाय) विनाशासाठी होम-वेदीमधे व विमान आदी यानामधे (उपदधामि) स्थापित करतो. हा दुसरा अर्थ झाला. ॥17॥
Essence
भावार्थ - या मंत्रात श्‍लेषालंकार वापरला आहे. सर्वशक्तिमान परमेश्‍वराने या भौतिक अग्नीचे निर्माण केले आहे. तो अपक्व पदार्थांना जाळणारा किंवा शिजविणारा असा केला आहे. त्यामुले तो भस्मरूप पदार्थांना असमर्थ आहे. या अग्नीद्वारे माणसे कच्च्या पदार्थंना शिजवून खातात. या अग्नी मुळेच प्राण्यांनी खाल्लेले अन्नाचे पाचन होते व याद्वारेच माणसे मृत शरीराला जाळतात. या करिता अग्नीला क्रव्यात् म्हटले जाते. ज्याने दिव्य लाभांची प्राप्ती करून देणार्‍या विद्युतचे निर्माण केले आहे. ज्याने पृथिवीला धारण आकर्षित करणार्‍या सूर्याची उत्पत्ती केली आहे. वेदवित् ब्राह्मण, धनुर्वेद विशारद क्षत्रियगण व सगळे प्राणी ज्यापासून लाभ व प्रेरणा घेतात, व जो सर्व सांसारिक पदार्थांमधे विद्यमान आहे, असा तो परमेश्‍वरच सर्व माणसांसाठी उपास्य असा एकमेव देव आहे. त्याचप्रमाणे सर्व क्रियांच्या पूर्ततेससाठी आवश्यक असा जो भौतिक अग्नी आहे, तो देखील यथायोग्य कार्यांद्वारे सेवनीय किंवा उपभोग्य आहे. ॥17॥
Subject
आता ‘अग्नि’ या शब्दाने कोणकोणत्या अर्थाचा बोध होतो आणि अग्नीमुळे कोणकोणते कार्य होतात, या वियी पुढील मंत्रात सांगितले आहे.