Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 1 / Mantra 14

31 Mantra
1/14
Devata- यज्ञो देवता Rishi- परमेष्ठी प्रजापतिर्ऋषिः Chhand- स्वराट् जगती, Swara- निषादः
Mantra with Swara
शर्मा॒स्यव॑धूत॒ꣳ रक्षोऽव॑धूता॒ऽअरा॑त॒योऽदि॑त्या॒स्त्वग॑सि॒ प्रति॒ त्वादि॑तिर्वेत्तु। अद्रि॑रसि वानस्प॒त्यो ग्रावा॑सि पृ॒थुबु॑ध्नः॒ प्रति॒ त्वादि॑त्या॒स्त्वग्वे॑त्तु॥१४॥

शर्म॑। अ॒सि॒। अव॑धूत॒मित्यव॑ऽधूतम्। रक्षः॑। अव॑धूता॒ इत्यव॑धूताः। अरा॑तयः। अदि॑त्याः। त्वक्। अ॒सि॒। प्रति॑। त्वा॒। अदि॑तिः। वे॒त्तु॒। अद्रिः॑। अ॒सि॒। वा॒न॒स्प॒त्यः। ग्रावा॑। अ॒सि॒। पृ॒थुबु॑ध्न॒ इति॑ पृ॒थुबु॑ध्नः। प्रति॑। त्वा॒। अदि॑त्याः। त्वक्। वे॒त्तु॒ ॥१४॥

Mantra without Swara
शर्मास्यवधूतँ रक्षोवधूताऽअरातयोदित्यास्त्वगसि प्रति त्वादितिर्वेत्तु । अद्रिरसि वानस्पत्यो ग्रावासि पृथुबुध्नः प्रति त्वादित्यास्त्वग्वेत्तु ॥

शर्म। असि। अवधूतमित्यवऽधूतम्। रक्षः। अवधूता इत्यवधूताः। अरातयः। अदित्याः। त्वक्। असि। प्रति। त्वा। अदितिः। वेत्तु। अद्रिः। असि। वानस्पत्यः। ग्रावा। असि। पृथुबुध्न इति पृथुबुध्नः। प्रति। त्वा। अदित्याः। त्वक्। वेत्तु॥१४॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे मनुष्यांनो, तुमचे घर (शर्म) सुखदायक (असि) असावे. त्या घरातुन (रक्षः) दुष्ट स्वभावाच्या प्राण्यांना (अवधूतं) दूर करा (अरातयः) दान व देणारे आणि अधार्मिक असे शत्रूं (अवधूताः) तुमचा घरापासून दूर असावेत. पूर्वोक्त घरें (अदित्याः) पृथिवीच्या (त्वक्) त्वचेप्रमाणे (असि) असावीत. (अदितिः) त्या घरास ज्ञानस्वरूप ईश्‍वर या रूपाने (प्रतिवेत्तु) सर्व माणसांनी ओळखावे. (अर्थात् देवासमान मानावे) (वानस्पत्यः) वनस्पतींच्या जीवनासाठी निर्माण केलेला आणि (पृथुबुध्नः) अति विशाल या अंतरिक्षात राहणारा (ग्रावा) जलाला धारण करणारा असा जो (अद्रिः) मेघ (असि) आहे, त्यास आणि या मेघविद्येस तो (अदितिः) जगदीश्‍वर तुमच्यावर कृपा करून तुमच्याकरिता (वेत्तु) प्रकट करोत. तुम्हांला त्या मेघ विद्येचे ज्ञान देवोत. विद्वज्जन देखील (अदित्याः) पृथिवीची (त्वक्) त्वचा म्हणून (त्वा) पूर्वोक्त घरांना तसे (प्रतिवेत्तु) जाणतील. (तुमच्या घरांना पृथ्वीची शोभा म्हणतील.) ॥14॥
Essence
भावार्थ - ईश्‍वर मनुष्यांना आदेश देत आहे की तुम्ही शुद्ध स्वच्छ आणि विस्तृत जागेवर भरपूर अवकाशयुक्त व सर्व ऋतुमधे सुखदायक अशा घरांचे निर्माण करा आणि त्यात सुखाने राहा. त्या घरात राहणारे मनुष्यादी प्राणी दुष्ट व दुःखभावी असू नयेत. सर्व दोषादीनां दूर करुन त्या घरात सर्व पदार्थांचा दाता, वृष्टीचा जो प्रदाता आहे, म्हणजे यज्ञ, त्या यज्ञाचे आयोजन अनुष्ठान करा की ज्यामुळे नानाविध सुखांची प्राप्ती होईल. कारण असे की अज्ञानामुळेच वायु आणि वृष्टि जलाची शुद्धी होते आणि जगात सर्वत्र सुख नांदते. ॥14॥
Subject
यज्ञाचे स्वरुप काय आहे आणि तो कोणत्या रीतीने करावा, पुढील मंत्रात याविषयी सांगितले आहे -