Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 94

733 Mantra
Devata- अग्निः Rishi- सोमाहुतिर्भार्गवः Chhand- अनुष्टुप् Swara- गान्धारः Kaand Name- आग्नेयं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- आग्नेयं पर्व
Mantra with Swara
द꣣धन्वे꣢ वा꣣ य꣢दी꣣म꣢नु꣣ वो꣢च꣣द्ब्र꣢꣫ह्मेति꣣ वे꣢रु꣣ त꣢त् । प꣢रि꣣ वि꣡श्वा꣢नि꣣ का꣡व्या꣢ ने꣣मि꣢श्च꣣क्र꣡मि꣢वाभुवत् ॥९४॥

द꣣धन्वे꣢ । वा꣣ । य꣢त् । ई꣣म् । अ꣡नु꣢꣯ । वो꣡च꣢꣯त् । ब्र꣡ह्म꣢꣯ । इ꣡ति꣢꣯ । वेः । उ꣣ । त꣢त् । प꣡रि꣢꣯ । वि꣡श्वा꣢꣯नि꣣ । का꣡व्या꣢꣯ । ने꣣मिः꣢ । च꣣क्र꣢म् इ꣣व । अभुवत् ॥९४॥

Mantra without Swara
दधन्वे वा यदीमनु वोचद्ब्रह्मेति वेरु तत् । परि विश्वानि काव्या नेमिश्चक्रमिवाभुवत् ॥

दधन्वे । वा । यत् । ईम् । अनु । वोचत् । ब्रह्म । इति । वेः । उ । तत् । परि । विश्वानि । काव्या । नेमिः । चक्रम् इव । अभुवत् ॥९४॥

Samveda - Mantra Number : 94
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 1; Ardh Prapathak » 2; Dashati » 5;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 1; Khand » 10;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
(यत्) जेव्हा उपासक (ईम्) या परमात्मरूप अग्नीला (अनु दधन्वे) अनुकूलतेने आपल्या हृदयात धारण करतो (वा) आणि (ब्रह्म इति) हाच साक्षात वा सत्य ब्रह्म आहे, असे (वोनत्) म्हणण्यास समर्थ होतो (त् उ) तेव्हाच तो त्याला (वेः) जाणतो (असे समजावे) तो परमात्म रूप अग्नी (विश्वानि) सर्व (काव्या) वेदकाव्याला अथवा या सृष्टिरूप - काव्याला (परि अभुवत्) चारही बाजूने म्हणजे सर्वतः व्याप्त करून विद्यमान आहे. जसे (नेमिः रथाच्या चक्राची परिधि (चक्रम् हव) रथाच्या चाकाला सर्व बाजूंनी व्यापून असते, दव्दत परमेश्वर या सृष्टीला व्यापून सर्वत्र आहे. ।। ४।।
Essence
परमेश्वराचे ध्यान करीत जेव्हा योगी त्याला धारणा, ध्यान आणि समाधीच्या मार्गाने आपल्या हृदयात योग्य प्रकारे धारण करतो आणि हस्तामलकवत् त्याची अनुभूती करीत असे म्हणण्यास समर्थ होतो की ङ्गमी आता ज्याचा साक्षात्कार करीत आहे, तोच ब्रह्म आहेफ तेव्हा समजावे की त्याने खरोखरीच ब्रह्माला जाणले आहे.।।४।।
Subject
पुढील मंत्रात कोण परमेश्वराला जाणतो, याविषयी वर्णन केले आहे.
Special
या मंत्रात ‘नेमिश्चक्रमिव’ या शब्दात उपमा अलंकार आहे. ।। ४।।