Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 93

733 Mantra
Devata- अग्निः Rishi- वामदेव: कश्यप:, असितो देवलो वा Chhand- अनुष्टुप् Swara- गान्धारः Kaand Name- आग्नेयं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- आग्नेयं पर्व
Mantra with Swara
रा꣣ये꣡ अ꣢ग्ने म꣣हे꣢ त्वा꣣ दा꣡ना꣢य꣣ स꣡मि꣢धीमहि । ई꣡डि꣢ष्वा꣣ हि꣢ म꣣हे꣡ वृ꣢ष꣣न् द्या꣡वा꣢ हो꣣त्रा꣡य꣢ पृथि꣣वी꣢ ॥९३

रा꣣ये꣢ । अ꣣ग्ने । महे꣢ । त्वा꣣ । दा꣡ना꣢꣯य । सम् । इ꣣धीमहि । ई꣡डि꣢꣯ष्व । हि । म꣣हे꣢ । वृ꣣षन् । द्या꣡वा꣢꣯ । हो꣣त्रा꣡य꣢ । पृ꣣थिवी꣡इ꣢ति ॥९३॥

Mantra without Swara
राये अग्ने महे त्वा दानाय समिधीमहि । ईडिष्वा हि महे वृषन् द्यावा होत्राय पृथिवी ॥९३

राये । अग्ने । महे । त्वा । दानाय । सम् । इधीमहि । ईडिष्व । हि । महे । वृषन् । द्यावा । होत्राय । पृथिवीइति ॥९३॥

Samveda - Mantra Number : 93
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 1; Ardh Prapathak » 2; Dashati » 5;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 1; Khand » 10;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
हे (अग्ने) शरीरस्य मन, बुद्धी, इंद्रियें आदी देवांत अग्रणी असणाऱ्या हे आमच्या जीवात्मा, आम्ही (शरीरधारी माणसे) (महे) (राये) भरपूर समृद्धीसाठी म्हणजे सोने, चांदी, विद्या, विवेक आदी घनांच्या अर्जनासाठी आणि ते घन (दानाय) इतरांना वाटण्यासाठी (त्वा) तुला (म्हणजे प्रत्येकाने आपल्या आत्म्याला) (सतिधीमहि) प्रदीप्त वा प्रबुद्ध करीत राहू. हे (वृषन्) बली जीवात्मन्, तू (घावापृथिवी) घूलोक आणि पृथ्वी लोकाची (महे होत्राय) महान होम करण्यासाठी (इडिष्व) स्तुती कर, प्रशंसा कर आणि हे घूलोक व पृथ्वी लोक सर्व जगाच्या कल्याणासाठी सृष्टि संचालनरूप यज्ञात आपले सर्वस्व होम करीत आहेत, अशा रूपात त्यांच्या गुणांचे वर्णन क आणि त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन स्वतःदेखील परोपकाराकरिता हे जीवात्मन् तू होम करीत जा, असा मंत्राचा भावार्थ आहे. ।। ३।।
Essence
माणसांचे कर्तव्य आहे की त्यांनी आपल्या आत्म्याला प्रबोधित वा जागृत करून दानशील अशा आकाश व भूमीकडून प्रेरणा घेऊन धनार्जन आणि धनदान कार्यात प्रवृत्त रहावे. ।। ३।।
Subject
आता पुढील मंत्रात अग्नि नावाने जीवात्म्यास संबोधित केले आहे -