Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 91

733 Mantra
Devata- विश्वेदेवाः Rishi- अग्निस्तापसः Chhand- अनुष्टुप् Swara- गान्धारः Kaand Name- आग्नेयं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- आग्नेयं पर्व
Mantra with Swara
सो꣢म꣣ꣳ रा꣡जा꣢नं꣣ व꣡रु꣢णम꣣ग्नि꣢म꣣न्वा꣡र꣢भामहे । आ꣣दित्यं꣢꣫ विष्णु꣣ꣳ सू꣡र्यं꣢ ब्र꣣ह्मा꣡णं꣢ च꣣ बृ꣢ह꣣स्प꣡ति꣢म् ॥९१॥

सो꣡म꣢꣯म् । रा꣡जा꣢꣯नम् । व꣡रु꣢꣯णम् । अ꣣ग्नि꣢म् । अ꣣न्वा꣡र꣢भामहे । अ꣣नु । आ꣡र꣢꣯भामहे । आ꣣दित्य꣢म् । आ꣣ । दित्य꣢म् । वि꣡ष्णु꣢꣯म् । सू꣡र्य꣢꣯म् । ब्र꣣ह्मा꣡ण꣢म् । च꣣ । बृ꣡हः꣢꣯ । प꣡ति꣢꣯म् ॥९१॥

Mantra without Swara
सोमꣳ राजानं वरुणमग्निमन्वारभामहे । आदित्यं विष्णुꣳ सूर्यं ब्रह्माणं च बृहस्पतिम् ॥

सोमम् । राजानम् । वरुणम् । अग्निम् । अन्वारभामहे । अनु । आरभामहे । आदित्यम् । आ । दित्यम् । विष्णुम् । सूर्यम् । ब्रह्माणम् । च । बृहः । पतिम् ॥९१॥

Samveda - Mantra Number : 91
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 1; Ardh Prapathak » 2; Dashati » 5;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 1; Khand » 10;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
(प्रथम पक्ष) परमात्मपरक आम्ही (उपासकमण) (राजानम्) सर्वांचा जो राजा (पालक व स्वामी), त्या (सोमम्) चंद्रासम आल्हादक व या चराचर जगाचे उत्पादक सोम नाम परमेश्वराचा व (वरुणम्) सर्व शिष्ट, मुमुक्षु- आणि धर्मात्माजन ज्या वरुण नाम परमेश्वराचा (आश्रय घेतो) आम्ही (अग्निम्) सर्वांचा जो नायक, प्रकाश स्वरूप अग्नि नाम परमेश्वराचा व (आदित्यम्) प्रलयकाळी सर्व सृष्टीला आपल्या गर्भात ग्रहण करणाऱ्या, अविनाशी स्वरूप, तसेच सूर्याप्रमाणे सत्य, न्याय व धर्माचा प्रकाशक आदित्य नाम परमेश्वराचा (आश्रय घेतो) तसेच आम्ही (विष्णुम्) चराचर जगी व्यापक असलेल्या विष्णु नाम परमेश्वराचा आणि (ब्रह्माणम्) सर्वांहून जो महान अशा ब्रह्मा नाम परमेश्वराचा तसेच (बृहस्पतिंच) विशाल आकाश आदींचा जो स्वामी, वृद्धिकारक त्या बृहस्पति नाम परमेश्वराचा (अनु आ रमामहे) आश्रय ग्रहण करतो (त्याच्या आश्रमात राहून, त्याला शरण जाऊन आम्ही निर्भय, निश्चित राहतो)।।
द्वितीय पक्ष - (राष्ट्र परक) - मंत्रात वर्णित सर्व देव विभिन्न राज्यमंत्री अथवा राज्याधिकारी आहेत, असे जाणावे. मनूनेदेखील म्हटले आहे की राजाने आपल्या देशाचे मूळ निवासी, वेदादिशास्त्रांचे ज्ञाता, शूरवीर, लक्ष्यवेधी, कुलीन आणि सुपरीक्षित असे सातवा आठ मंत्री नमावेत (मनुस्मृति ७-५४) शब्दार्थ - आम्ही प्रजानन (सोम्) चंद्राममिआणे प्रजानांना आल्हाद देणाऱ्या (राजानम्) राजाचा तसेच (वरुणम्) दंडाधिकाऱ्याचा (अग्निम्) सेनानायक सेवाध्यक्ष्याच्या (आदित्यम्) कर-वसूल करणाऱ्या अधिकाऱ्याचा आश्रय घेतो) आम्ही (विष्णुम्) व्यापकरूपेण प्रजाकार्य सिद्ध करणाऱ्या प्रधान मंत्र्याच्या व (सूर्यम्) सूर्याममिाणे रोगनिवारक आरोग्य मंत्राच्या आणि (ब्रह्माणम्) यज्ञाधिकाऱ्याच्या (बृहस्पतिंच) तसेच शिक्षण मंत्र्याच्या (अनु आ रभामहे) राष्ट्राच्या उत्कर्षासाठी आश्रय घेतो. (या सर्व मंत्र्यांच्या संरक्षणा प्रजानन सुखी, समाधानी राहू शकतात, असा आशय आहे.) ।।१।।
Essence
अग्नी, सोम, वरुण, आदित्य, विष्णु, सूर्य, ब्रह्मा, बृहस्पती आदी अनेक नावांनी वेदांमध्ये ज्या परमेश्वराचे यश गायिले आहे. सर्वांनी त्या एक परमेश्वराचा आश्रय केला पाहिजे. त्याचप्रमाणे राष्ट्रात अनेक मंत्री आणि राज्याधिकारी, यांच्यासह सहकार्य करीत राष्ट्राचे संचालन करणाऱ्या राजाचाही सर्व प्रजाजनांनी आश्रय घेतला पाहिजे तसेच त्याला सहकार्य देत त्याचा सत्कारही केला पाहिजे. ।। १।।
Subject
प्रथम मंत्रात सेज, वरुण आदींचे आवाहन केले आहे -
Special
या मंत्रात श्लेषालंकार आहे. ।।१।।