Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 90

733 Mantra
Devata- अग्निः Rishi- वामदेवः कश्यपो वा मारीचो मनुर्वा वैवस्वत अभौ वा Chhand- अनुष्टुप् Swara- गान्धारः Kaand Name- आग्नेयं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- आग्नेयं पर्व
Mantra with Swara
जा꣣तः꣡ परे꣢꣯ण꣣ ध꣡र्म꣢णा꣣ य꣢त्स꣣वृ꣡द्भिः꣢ स꣣हा꣡भु꣢वः । पि꣣ता꣢꣫ यत्क꣣श्य꣡प꣢स्या꣣ग्निः꣢ श्र꣣द्धा꣢ मा꣣ता꣡ मनुः꣢꣯ क꣣विः꣢ ॥९०

जा꣣तः꣢ । प꣡रे꣢꣯ण । ध꣡र्म꣢꣯णा । यत् । स꣣वृ꣡द्भिः꣢ । स꣣ । वृ꣡द्भिः꣢꣯ । स꣣ह꣢ । अ꣡भु꣢꣯वः । पि꣣ता꣢ । यत् । क꣣श्य꣡प꣢स्य । अ꣣ग्निः꣢ । श्र꣣द्धा꣢ । श्र꣣त् । धा꣢ । मा꣣ता꣢ । म꣡नुः꣢꣯ । क꣣विः꣢ ॥९०॥

Mantra without Swara
जातः परेण धर्मणा यत्सवृद्भिः सहाभुवः । पिता यत्कश्यपस्याग्निः श्रद्धा माता मनुः कविः ॥९०

जातः । परेण । धर्मणा । यत् । सवृद्भिः । स । वृद्भिः । सह । अभुवः । पिता । यत् । कश्यपस्य । अग्निः । श्रद्धा । श्रत् । धा । माता । मनुः । कविः ॥९०॥

Samveda - Mantra Number : 90
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 1; Ardh Prapathak » 2; Dashati » 4;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 1; Khand » 9;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
हे जीवात्मा, तू (परेण) उत्कृष्ट (धर्मणा) धर्मनाम संस्कारामुळे (जात:) मानव योनीत जन्मला आहेस. (यत्)कारण की तू आतापर्यंत (सवृद्धि सह) सोबत असणाऱ्या सूक्ष्म शरीरस्य पंच प्राणी, पंच ज्ञानेंद्रिये, पंच सूक्ष्मभूत आणि मन, बुद्धी या सतरा तत्त्वांसह (अभुवः) विद्यमान होतास. (यत्) कारण की (कश्यपस्य) तू जो द्रष्टा आहेस त्याचा (पिता) पिता म्हणजे मनुष्य देह देणारा (अग्निः) तो ते ओमय परमात्मा आहे. यामुळे (श्रद्धा) श्रद्धा (माता) तुझ्या मातेप्रमाणे असावी, व्हावी, आणि तू स्वतः (मनु) मननशील आणि (कविः) मेधावी हो. ।। १०।।
Essence
जेव्हा जीवात्मा मृत्युसमयी शरीराहून प्रस्थान करतो त्या वेळी सूक्ष्म शरीर त्याचासह विद्यमान असतो. तसेच सूक्ष्म शरीरात सोबत असणाऱ्या चित्तामध्ये धर्म- अधर्म नाम शुभ - अशुभ कर्मांचे संस्कार आल्यासह जातात. धर्मामुळे त्या जीवास मनुष्य जातो. जीवात्मा ज्ञानग्रहणाने सामर्थ्य असल्यामुळे तो कश्यप म्हणजे द्रष्टा आहे. त्यामुळे त्याने समस्त ज्ञान विज्ञानाचा संचय केला पाहिजे. ज्याअर्थी परमेश्वर त्या आत्म्यास हा शरीर देऊन त्याचा जन्म द्दाता ठरतो, त्याअर्थी आपल्या पित्याच्या महानतेचा विचार करून आल्याने जीवनात श्रद्धेला माता रूपाने मानले पाहिजे आणि स्वतः मननशील व मेघांनी व्हावयास पाहिजे. ।। १०।।
काही लोक म्हणतात की या मंत्रात आलेला कश्यप शब्द एका ऋषीचे नाव असून श्रद्धा देवीचे नाव आहे. तसेच येथे मनु शब्दाने वैवस्वत मनु अपेक्षित आहे, पण त्यांचे हे मत चुकीचे आहे. कारण की वेदामध्य्लौकीक इतिहास नाही.।।
या दशतिमध्ये परमात्म्यास सुयश, तेज, धन, बल आदींची प्रार्थना केली आहे. याशिवाय या दशतीत परमेश्वराच्या प्रभावाचे वर्णन, अतिथीरूप परमेश्वराप्रत हव्य- समर्पण आणि त्याच्या पूजनधि प्रेरणा वर्णित आहे. येथे परमेश्वराला पिता श्रद्धा भावनेला माता म्हणून वर्णन केले असल्यामुळे या विषयांची संगती यापूर्वीच्या दशतीशी आहे, असे जाणावे.।।
प्रथम प्रपाठकातील द्वितीय अर्धाची चतुर्थ दशति समाप्त।
प्रथम अध्यायातील नवम खंड समाप्त.
Subject
पिता यत्कश्यपस्याग्नि: श्रद्धा माता मनु: कवि: ।।१०।।