Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 89

733 Mantra
Devata- अग्निः Rishi- गोपवन आत्रेयः Chhand- अनुष्टुप् Swara- गान्धारः Kaand Name- आग्नेयं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- आग्नेयं पर्व
Mantra with Swara
अ꣡ग꣢न्म वृत्र꣣ह꣡न्त꣢मं꣣ ज्ये꣡ष्ठ꣢म꣣ग्नि꣡मान꣢꣯वम् । य꣡ स्म꣢ श्रु꣣त꣡र्व꣢न्ना꣣र्क्षे꣢ बृ꣣ह꣡द꣢नीक इ꣣ध्य꣡ते꣢ ॥८९॥

अ꣡ग꣢꣯न्म । वृ꣣त्रह꣡न्त꣢मम् । वृ꣣त्र । ह꣡न्त꣢꣯मम् । ज्ये꣡ष्ठ꣢꣯म् । अ꣣ग्नि꣢म् । आ꣡न꣢꣯वम् । यः । स्म꣣ । श्रुत꣡र्व꣢न् । आ꣣र्क्षे꣢ । बृ꣣ह꣡द꣢नीकः । बृ꣣ह꣢त् । अ꣣नीकः । इध्य꣡ते꣢ ॥८९॥

Mantra without Swara
अगन्म वृत्रहन्तमं ज्येष्ठमग्निमानवम् । य स्म श्रुतर्वन्नार्क्षे बृहदनीक इध्यते ॥

अगन्म । वृत्रहन्तमम् । वृत्र । हन्तमम् । ज्येष्ठम् । अग्निम् । आनवम् । यः । स्म । श्रुतर्वन् । आर्क्षे । बृहदनीकः । बृहत् । अनीकः । इध्यते ॥८९॥

Samveda - Mantra Number : 89
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 1; Ardh Prapathak » 2; Dashati » 4;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 1; Khand » 9;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
(वृत्रहन्तमम्) पापांचा संपूर्ण विनाश करणाऱ्या (ज्येष्ठम्) सर्वाधिक प्रशंसनीय आणि महान तसेच (आनवम्) मनुष्यांचा जो हितकारी त्या (अग्निम्) तेजस्वी परमेश्वराला आम्ही (उपासक) (अगन्म) प्राप्त झालो आहोत. (त्याच्या ध्यान उपासनेत मग्न आहोत.) (य:) (स्म) जो (श्रुतर्वन्) किरणे हेच ज्याचे अश्व आहेत अशा ज्योतिर्मय सूर्यात आणि (आर्क्षे) तारापुंजामध्ये (वृहदनीक:) विशाल तेजवान होऊन (इध्यते) भासमान होत आहे. (सूर्यात आणि ग्रह नक्षत्रादीमध्ये त्याचीच ज्योती आहे.) ।।९।।
Essence
प्रचंड तेजोमय सूर्यामध्ये, तारामंडळात, एवढेच नव्हे, समग्र ब्रह्मांडात ज्याचे कर्तृत्व दृष्टिगत होत आहे, सर्व पदार्थात असलेली शक्ती आणि तेज हे त्यानेच दिलेले असून, ती शक्ती व ते तेज त्याचीच दीप्ती आहे, तो पाजसहारक, मानव हितकारी आणि सर्वाधिक पुराण-पुरुष आहे. सर्व लोकांनी त्याचीच वंदना, प्राप्ती आणि उपासना केली पाहिजे. ।।९।।
Subject
आता परमेश्वराच्या गुणांचे वर्णन करीत आहेत. -
Special
या मंत्राची काही लोकांनी जी व्याख्या केली आहे, ती पूर्णरूपेण असंगत आहे त्यांनी म्हटले आहे की श्रुतर्वा नामाचा कोणी राजा झाला होता जो ऋक्षाचा पुत्र होता आणि त्याच्याजवळ नेहमी अग्नी प्रदीप्त असायचा. ही व्याख्या असंगत आहे. कारण की वेदात लौकिक इतिहास नाही. ।।९।।