Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 79

733 Mantra
Devata- अग्निः Rishi- विश्वामित्रो गाथिनः Chhand- त्रिष्टुप् Swara- धैवतः Kaand Name- आग्नेयं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- आग्नेयं पर्व
Mantra with Swara
अ꣣र꣢ण्यो꣣र्नि꣡हि꣢तो जा꣣त꣡वे꣢दा꣣ ग꣡र्भ꣢ इ꣣वे꣡त्सुभृ꣢꣯तो ग꣣र्भि꣡णी꣢भिः । दि꣣वे꣡दि꣢व꣣ ई꣡ड्यो꣢ जागृ꣣व꣡द्भि꣢र्ह꣣वि꣡ष्म꣢द्भिर्मनु꣣꣬ष्ये꣢꣯भिर꣣ग्निः꣢ ॥७९॥

अ꣣र꣡ण्योः꣢ । नि꣡हि꣢꣯तः । नि꣡ । हि꣣तः । जा꣣तवे꣢दाः꣢ । जा꣣त꣢ । वे꣣दाः । ग꣡र्भः꣢꣯ । इ꣣व । इ꣢त् । सु꣡भृ꣢꣯तः । सु । भृ꣣तः । गर्भि꣡णी꣢भिः । दि꣣वे꣡दि꣢वे । दि꣣वे꣢ । दि꣣वे । ई꣡ड्यः꣢꣯ । जा꣣गृव꣡द्भिः꣢ । ह꣣वि꣡ष्म꣢द्भिः । म꣣नुष्ये꣢꣯भिः । अ꣣ग्निः꣢ ॥७९॥

Mantra without Swara
अरण्योर्निहितो जातवेदा गर्भ इवेत्सुभृतो गर्भिणीभिः । दिवेदिव ईड्यो जागृवद्भिर्हविष्मद्भिर्मनुष्येभिरग्निः ॥

अरण्योः । निहितः । नि । हितः । जातवेदाः । जात । वेदाः । गर्भः । इव । इत् । सुभृतः । सु । भृतः । गर्भिणीभिः । दिवेदिवे । दिवे । दिवे । ईड्यः । जागृवद्भिः । हविष्मद्भिः । मनुष्येभिः । अग्निः ॥७९॥

Samveda - Mantra Number : 79
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 1; Ardh Prapathak » 2; Dashati » 3;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 1; Khand » 8;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
(जातवेदा:) प्रत्येक उत्पन्न पदाथार्च ज्ञान असणारा परमेश्वर (अरण्यो) अरणी (दोन काष्ठखंड) प्रमाणे विद्यमान आहे. तो जीवात्मा प्रकृतीरूप दोन खंडामध्ये जीवात्मा, शरीर या दोन्हीमध्ये अथवा द्युलोक-पृथ्वीलोक आणि बुद्धी, मन या दोन्हीमध्ये (विहित:) स्थित आहे, व्याप्त आहे. ज्याप्रमाणे (गर्भिणीभि:) गर्भिणी स्त्रियांद्वारे (गर्भ इव) गर्भ धारण केला जात (इत्) त्याप्रमाणे तो (पृभृत) परमेश्वर त्या विविध लोकांद्वारा धारित आहे. (अग्नि:) तो परमेश्वर (हविष्मद्भि:) आपल्या आत्मा, मन, बुद्धी, प्राण आदींना (हवि:) हवि करून परमेश्वराला अर्पित करणाऱ्या (जागृबद्भि:) जागरूक (मनुष्येभि) अध्यात्म माजी मनुष्यांद्वारे (ईह्य:) पूजनीय वंदनीय आहे. ।।७।।
Essence
जसे गर्भिणी स्त्रियांमध्ये गर्भ प्रच्छन्नरूपेण स्थित असतो, तद्वत परमात्मरूप अग्नी सर्व पदार्थात प्रच्छन्नरूपाने विद्यमान असतो. जसे तो गर्भ बाहेर आल्यानंतर सर्व नातेवाईक पुत्र वा पुत्रीचे लालन पालन करतात, तसेच गुह्यरूपाने सर्वत्र स्थित परमात्मरूप अग्नीला आपल्यासमोर प्रकट करून आध्यात्मिक जनांनी महोत्सव साजरा केला पाहिजे. आणि त्या परमात्मअग्नीला आत्मसमर्पणरूप हवि देऊन त्याची पुजा केली पाहिजे. ।।७।।
Subject
जो परमात्म अग्नी अव्यक्तरूपाने सर्वत्र स्थित आहे त्यास हृदयात प्रकाशित केले पाहिजे. याविषयी पुढील मंत्रात सांगितले आहे. -
Special
या मंत्रात उपमा अलंकार आहे. गर्भ-गर्भि यामध्ये छेदानुप्रता आहे. ।।७।।