Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 77

733 Mantra
Devata- अग्निः Rishi- वत्सप्रिर्भालन्दनः Chhand- त्रिष्टुप् Swara- धैवतः Kaand Name- आग्नेयं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- आग्नेयं पर्व
Mantra with Swara
प्र꣡ होता꣢꣯ जा꣣तो꣢ म꣣हा꣡न्न꣢भो꣣वि꣢न्नृ꣣ष꣡द्मा꣢ सीदद꣣पां꣡ वि꣢व꣣र्ते꣢ । द꣢ध꣣द्यो꣢ धा꣣यी꣢ सु꣣ते꣡ वया꣢꣯ꣳसि य꣣न्ता꣡ वसू꣢꣯नि विध꣣ते꣡ त꣢नू꣣पाः꣢ ॥७७॥

प्र꣢ । हो꣡ता꣢꣯ । जा꣣तः꣢ । म꣣हा꣢न् । न꣣भोवि꣢त् । न꣣भः । वि꣢त् । नृ꣣ष꣡द्मा꣢ । नृ꣣ । स꣡द्मा꣢꣯ । सी꣣दत् । अपा꣢म् । वि꣣वर्ते꣢ । वि꣣ । वर्त्ते꣢ । द꣡ध꣢꣯त् । यः । धा꣣यी꣢ । सु꣣ते꣢ । व꣡याँ꣢꣯सि । य꣣न्ता꣢ । व꣡सू꣢꣯नि । वि꣣धते꣢ । त꣣नूपाः꣢ । त꣣नू । पाः꣢ ॥७७॥

Mantra without Swara
प्र होता जातो महान्नभोविन्नृषद्मा सीददपां विवर्ते । दधद्यो धायी सुते वयाꣳसि यन्ता वसूनि विधते तनूपाः ॥

प्र । होता । जातः । महान् । नभोवित् । नभः । वित् । नृषद्मा । नृ । सद्मा । सीदत् । अपाम् । विवर्ते । वि । वर्त्ते । दधत् । यः । धायी । सुते । वयाँसि । यन्ता । वसूनि । विधते । तनूपाः । तनू । पाः ॥७७॥

Samveda - Mantra Number : 77
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 1; Ardh Prapathak » 2; Dashati » 3;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 1; Khand » 8;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
तो (महान) महान (स्वभोवित्) द्युलोक, सूर्य आणि अंतरिक्षात विद्यमान परमात्मरूप आग्नी (होता) आमच्यासाठी सर्व सुख देरारा (प्रजात:) आहे. (वृषद्मा) मनुष्यात निवास करणारा म्हणजे व्याप्त आणि (अपाम्) नद्यांच्या (विवर्ते) भोवऱ्यात देखील तो (सीदत्) स्थित वा व्याप्त आहे. (धायी) सृष्टीला धारण करणारा (य:) जो परमात्मरूप अग्नी (सुते) या उत्पन्न जगामध्ये (वयांसि) सर्व भोग्य पदार्थ स्थापित करतो, तसेच जो (वसूनि) नक्षत्र, ग्रह, उपग्रह आदी लोक लोकान्तरांना (यन्ता) नियमात ठेवणारा, नियंत्रण करणारा आहे, तोच परमात्मा (विधते) पूजा करणाऱ्या मनुष्यांचा (तनूपा:) स्थूल, सूक्ष्म आणि कारण शरीरांचा रक्षकदेखील आहे. ।।५।।
Essence
परमेश्वर गगनात, भूमीत, मनुष्यात, पशु पक्षी आदींमध्ये मेघ, सूर्यकिरणे, पर्वत, नद्या, नक्षत्र, ग्रह-उपग्रह आदींमध्ये देखील किंवा सर्वत्र विद्यमान असून तोच या सृष्टीचे संचालन करीत आहे. ।।५।।
Subject
परमेश्वर करत आहे, हे पुढच्या मंत्रात वर्णित आहे. -
Special
या मंत्रातील आकाशात विद्यमान असूनही मनुष्यात विद्यमान आहे. मनुष्यात विद्यमान असूनही नद्यांच्या भोवऱ्यात विद्यमान आहे. या कथनात विरोध अलंकार ध्वनित आहे. परमेश्वर हा अग्नी आहे असा अर्थ केल्याने विरोधाचा परिहार होत आहे. ।।५।।