Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 75

733 Mantra
Devata- पूषा Rishi- भरद्वाजो बार्हस्पत्यः Chhand- त्रिष्टुप् Swara- धैवतः Kaand Name- आग्नेयं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- आग्नेयं पर्व
Mantra with Swara
शु꣣क्रं ते꣢ अ꣣न्य꣡द्य꣢ज꣣तं꣡ ते꣢ अ꣣न्य꣡द्वि꣢꣯षुरूपे꣣ अ꣡ह꣢नी꣣ द्यौ꣡रि꣢वासि । वि꣢श्वा꣣ हि꣢ मा꣣या꣡ अव꣢꣯सि स्वधावन्भ꣣द्रा꣡ ते꣢ पूषन्नि꣣ह꣢ रा꣣ति꣡र꣢स्तु ॥७५॥

शु꣣क्र꣢म् । ते꣣ । अन्य꣢त् । अ꣣न् । य꣢त् । य꣣जतम् । ते꣣ । अन्य꣢त् । अ꣣न् । य꣢त् । वि꣡षु꣢꣯रूपे । वि꣡षु꣢꣯ । रू꣣पेइ꣡ति꣢ । अ꣡ह꣢꣯नी । अ । ह꣣नीइ꣡ति꣢ । द्यौः । इ꣣व । असि । वि꣡श्वाः꣢꣯ । हि । मा꣣याः꣢ । अ꣡व꣢꣯सि । स्व꣣धावन् । स्व । धावन् । भद्रा꣢ । ते꣣ । पूषन् । इह꣢ । रा꣣तिः । अ꣣स्तु ॥७५॥

Mantra without Swara
शुक्रं ते अन्यद्यजतं ते अन्यद्विषुरूपे अहनी द्यौरिवासि । विश्वा हि माया अवसि स्वधावन्भद्रा ते पूषन्निह रातिरस्तु ॥

शुक्रम् । ते । अन्यत् । अन् । यत् । यजतम् । ते । अन्यत् । अन् । यत् । विषुरूपे । विषु । रूपेइति । अहनी । अ । हनीइति । द्यौः । इव । असि । विश्वाः । हि । मायाः । अवसि । स्वधावन् । स्व । धावन् । भद्रा । ते । पूषन् । इह । रातिः । अस्तु ॥७५॥

Samveda - Mantra Number : 75
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 1; Ardh Prapathak » 2; Dashati » 3;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 1; Khand » 8;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
हे (पूजन्) सर्व दृष्टीने परिपुष्ट तसेच सर्वांना पुष्टी देणाऱ्या परमेश्वरा तुम्ही रचलेला (अन्यत्) एक दिवस (शुक्रम) श्वेत आहे. तर (ते) तुम्ही निर्माण केलेली (अन्यत्) दुसरी म्हणजे रात्र (यजतम्) यज्ञ घूमाप्रमाणे कृष्णवर्णीय आहे. अशाप्रकारे तुम्ही रचलेले हे (अहनी) दिवस रात्र (विषुरूपे) विषमरूपधारी आहेत. पण आपण (द्यौदूव) सूर्याप्रमाणे प्रकाशमान (असि) आहात. हे (स्वधावन्) सर्व भोग्य पदार्थांचे स्वामी (आम्ही ज्या पदार्थांचा भोग उपभोग घेत आहोत, त्याचे स्वामी व दाता) आपणच (विश्वा: हि) सर्व (माया:) बुद्धी कौशल्याने भरलेल्या या जगत् प्रपंचाची (अवसि) रक्षा करीत आहात. आपले हे असे (भद्रा) कल्याणकारी (राति:) दान (इह) आमच्या या जीवनात (अस्तु) आम्हास प्राप्त व्हावे होत राहावेत. ।।३।।
Essence
ज्या परमेश्वराने दिवस रात्र या सारख्या विलक्षण वस्तुंची निर्मिती केली आहे आणि जो या साऱ्या जगप्रपंचाचा रक्षक आहे, आम्ही त्याच्या या उपकारांचे सदैव स्मरण केले पाहिजे. ।।३।।
Subject
पुढच्या मंत्रशची देवता पूषा आहे. पूषा या नावाने परमेश्वराच्या महतीचे वर्णन करीत त्याला प्रार्थना केली आहे. -
Special
स्वत: सूर्यासम भास्वर असूनही परमेश्वर श्वेत व कृष्ण अशा दोन्ही रूपे असलेल्या सृष्टीची रचना करतो. यामुळे कारण आणि कार्य यांच्या गुणांमध्ये आंशिक विरोध वर्णित असल्यामुळे या मंत्रात विषम अलंकार आहे. ।।३।।