Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 741

733 Mantra
Devata- इन्द्रः Rishi- मधुच्छन्दा वैश्वामित्रः Chhand- गायत्री Swara- षड्जः
Mantra with Swara
पु꣣रूत꣡मं꣢ पु꣣रूणा꣡मीशा꣢꣯नं꣣ वा꣡र्या꣢णाम् । इ꣢न्द्र꣣ꣳ सो꣢मे꣣ स꣡चा꣢ सु꣣ते꣢ ॥७४१॥

पु꣣रूत꣡म꣢म् । पु꣣रूणा꣢म् । ई꣡शा꣢꣯नम् । वा꣡र्या꣢꣯णाम् । इ꣡न्द्र꣢꣯म् । सो꣡मे꣢꣯ । स꣡चा꣢꣯ । सु꣣ते꣢ ॥७४१॥

Mantra without Swara
पुरूतमं पुरूणामीशानं वार्याणाम् । इन्द्रꣳ सोमे सचा सुते ॥

पुरूतमम् । पुरूणाम् । ईशानम् । वार्याणाम् । इन्द्रम् । सोमे । सचा । सुते ॥७४१॥

Samveda - Mantra Number : 741
(Kauthum) उत्तरार्चिकः: » Prapathak » 1; Ardh Prapathak » 2;
(Rananiya) उत्तरार्चिकः: » Adhyay » 2; Khand » 3;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
हे सहकाऱ्यांनो, मित्रांनो (पुरुणाम्) पूर्ण असलेल्या तसेच सर्वांचे पालन करणाऱ्या लोकांमध्ये (राजा, महाराजा आदी लोकांपेक्षाही) जो (पुरुतमम्) पूर्णतम आहे आणि सर्वश्रेष्ठ पालक आहे. तसेच जो (वार्याणाम्) वरणीय गुणांचा (ईशानम्) अधीश्वर आहे अशा त्या (इन्द्रम्) परमेश्वराविषयी (सुते) जेव्हा तुमच्या हृदयात श्रद्धारूप रस उत्पन्न होईल तेव्हा (सचा) सर्व जण मिळून (प्रगायत) त्या परमेश्वराचे स्तुति गीत गा ।। (या मंत्रात प्रत्यक्ष प गायत शब्द नाही. हा शब्द पूर्वीच्या मंत्रातून संदर्भाची आवश्यकता म्हणून घेतला गेला आहे, असे जाणावे ।।२।।
Essence
जो स्वत: संपूर्ण असून, अन्यांना पूर्ण व पालन करणारा आहे, तसेच जो सर्व सद्गुणांनी विभूषित आहे सर्वांनी मिळून त्या परमेश्वराची मनी श्रद्धाभाव ठेवून उपासना केली पाहिजे. ।।२।।
Subject
आत्म्याला उद्बोधन केल्यानंतर आता परमात्म्याविषयी सांगत आहेत.