Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 74

733 Mantra
Devata- अग्निः Rishi- वत्सप्रिर्भालन्दनः Chhand- त्रिष्टुप् Swara- धैवतः Kaand Name- आग्नेयं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- आग्नेयं पर्व
Mantra with Swara
प्र꣢ भू꣣र्ज꣡य꣢न्तं म꣣हां꣡ वि꣢पो꣣धां꣢ मू꣣रै꣡रमू꣢꣯रं पु꣣रां꣢ द꣣र्मा꣡ण꣢म् । न꣡य꣢न्तं गी꣣र्भि꣢र्व꣣ना꣡ धियं꣢꣯ धा꣣ ह꣡रि꣢श्मश्रुं꣣ न꣡ वर्मणा꣢꣯ धन꣣र्चि꣢म् ॥७४॥

प्र꣢ । भूः꣣ । ज꣡य꣢꣯न्तम् । म꣣हा꣢म् । वि꣣पोधा꣢म् । वि꣣पः । धा꣢म् । मू꣣रैः꣢ । अ꣡मू꣢꣯रम् । अ꣢ । मू꣣रम् । पुरा꣢म् । द꣣र्मा꣡ण꣢म् । न꣡य꣢꣯न्तम् । गी꣣र्भिः꣢ । व꣣ना꣢ । धि꣡य꣢꣯म् । धाः꣢ । ह꣡रि꣢꣯श्मश्रुम् । ह꣡रि꣢꣯ । श्म꣣श्रुम् । न꣢ । व꣡र्म꣢꣯णा । ध꣣नर्चि꣢म् ॥७४॥

Mantra without Swara
प्र भूर्जयन्तं महां विपोधां मूरैरमूरं पुरां दर्माणम् । नयन्तं गीर्भिर्वना धियं धा हरिश्मश्रुं न वर्मणा धनर्चिम् ॥

प्र । भूः । जयन्तम् । महाम् । विपोधाम् । विपः । धाम् । मूरैः । अमूरम् । अ । मूरम् । पुराम् । दर्माणम् । नयन्तम् । गीर्भिः । वना । धियम् । धाः । हरिश्मश्रुम् । हरि । श्मश्रुम् । न । वर्मणा । धनर्चिम् ॥७४॥

Samveda - Mantra Number : 74
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 1; Ardh Prapathak » 2; Dashati » 3;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 1; Khand » 8;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
हे मनुष्या तू (प्र भू:) समर्थ शक्तिमान हो, प्रकृष्ट गुणवान हो. तसेच (जयन्तम्) सदा विजेता (महान) महान (विपोधाम्) बुद्धीमतांचा सहायक आणि (मूरै:) मारणाऱ्याद्वारे जो (अमूरम्) कदापि मारता येत नाही. (त्या परमेश्वराला हृदयात धारण कर.) तो परमात्मा (पुराम्) शत्रुच्या नगरी (दर्माणम्) विदीर्ण करणारा, (गीर्भि:) स्तुतिवाणीद्वारा (वना) भजनीय आहे. (धियम्) प्रज्ञा आणि कर्म यांची (नयन्तम्) प्रेरणा देणारा आहे आणि (हरिश्मश्रुं व) स्वर्णिम किरणांचा जो स्वामी त्या सूर्याप्रमाणे (वर्मणा) आपल्या रक्षण साधनांनी (धवर्चिम्) ज्योतिरूप धनाचा स्वामी आहे, अशा (अग्निम) परमेश्वराला (धा:) आपल्या हृदयात धारण कर. तसेच वर वर्णित गुण धारण करणाऱ्या (अग्निम) वीर पुरुषाला (धा:) राजा पदावर स्थानापन्न कर. ।।२।।
Essence
सर्व प्रजाजनांकरीता हे कर्तव्य आहे की, त्यांनी समर्थ व गुणवंत होऊन आपल्या शत्रूवर विजय मिळवावा, महामहिमामय व्हावे, बुधजनांचे मित्र व्हावे. कोणीही हिंसक वा अत्याचारी व्यक्ती त्यांच्यावर हिंसा वा अत्याचार करू शकू नये, इतके वीर बनावे. शत्रुच्या दुर्गादी तटबंदीच्या विध्वंस करणारे व्हावे. स्तुतिपात्र, ज्ञानप्रदाता, सत्कर्म प्रेरक व्हावे. सूर्यासम ज्योतिष्मान होऊन परमेश्वराचे पूजन करावे. तसेच उपर्युक्त गुण धारण करणाऱ्या वीर पुरुषालाच राजपदावर अधिष्ठित करावे. ।।२।।
Subject
पुढील मंत्रात कसा परमेश्वर उपासनीय आहे आणि कसा मनुष्य राजपदाकरीता नेमावा याविषयी सांगितले आहे. -
Special
या मंत्रात उपमा व अर्धश्लेष अलंकार आहे. ।।२।।