Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 730

733 Mantra
Devata- इन्द्रः Rishi- कुसीदी काण्वः Chhand- गायत्री Swara- षड्जः
Mantra with Swara
न꣡ हि त्वा꣢꣯ शूर दे꣣वा꣡ न मर्ता꣢꣯सो꣣ दि꣡त्स꣢न्तम् । भी꣣मं꣢꣫ न गां वा꣣र꣡य꣢न्ते ॥७३०॥

न । हि । त्वा꣣ । शूर । देवाः꣢ । न । म꣡र्ता꣢꣯सः । दि꣡त्स꣢꣯न्तम् । भी꣣म꣢म् । न । गाम् । वा꣣र꣡य꣢न्ते ॥७३०॥

Mantra without Swara
न हि त्वा शूर देवा न मर्तासो दित्सन्तम् । भीमं न गां वारयन्ते ॥

न । हि । त्वा । शूर । देवाः । न । मर्तासः । दित्सन्तम् । भीमम् । न । गाम् । वारयन्ते ॥७३०॥

Samveda - Mantra Number : 730
(Kauthum) उत्तरार्चिकः: » Prapathak » 1; Ardh Prapathak » 2;
(Rananiya) उत्तरार्चिकः: » Adhyay » 2; Khand » 2;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
हे (शूर) दानशूर परमेश्वरा, (दित्सन्तम) जेव्हा तू कोणाला भौतिक समृद्धी वा दिव्य ऐश्वर्य देऊ इच्छितोस तेव्हा (त्वा) तुला (देवा:) चमकणारे अग्नी, सूर्य, चंद्र, विद्युत आदी अचेतन पदार्थ नहि) रोखू शकत नाहीत. तसेच (मर्तस:) कोणी राजा आदी माणूसदेखील तुला देण्यपासून (न नारयन्ते) रोखू शकत नाही. (उपमा देताना सांगितले आहे, ज्याप्रकारे भयंकर पेटलेल्या अग्नीला वा विद्युतेला कोणी रोखू शकत नाही त्याप्रमाणे हे परमेश्वरा तुलाही तुझ्या कार्यापासानू कोणी परावृत्त करू शकता नाही. ।।३।।
Essence
जो दयाळू परमेश्वर सर्वांना सारखेपणाने सूर्य प्रकाश, पत्र, पुष्प, फळ, वायू, जल आदी भौतिक पदार्थाचे दान करतो तसेच सत्य, न्याय, दया, औदार्य आदी सद्गुण काहीही मोबदला न घेता विनामूल्य देत असतो,सर्वांनी त्या कृपाळू परमेश्वराची वंदना अवश्य केली पाहिजे. ।।३।।
Subject
पुढच्या मंत्रात परमेश्वर देत असलेल्या दानाचे वर्णन केले आहे. -
Special
या मंत्रात उपमा अलंकार आहे. ।।३।।