Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 726

733 Mantra
Devata- इन्द्रः Rishi- इरिम्बिठिः काण्वः Chhand- गायत्री Swara- षड्जः
Mantra with Swara
शा꣡चि꣢गो꣣ शा꣡चि꣢पूजना꣣य꣡ꣳ रणा꣢꣯य ते सु꣣तः꣢ । आ꣡ख꣢ण्डल꣣ प्र꣡ हू꣢यसे ॥७२६॥

शा꣡चि꣢꣯गो । शा꣡चि꣢꣯ । गो꣣ । शा꣡चि꣢꣯पूजन । शा꣡चि꣢꣯ । पू꣣जन । अय꣢म् । र꣡णा꣢꣯य । ते꣣ । सुतः꣢ । आ꣡ख꣢꣯ण्डल । प्र । हू꣡यसे ॥७२६॥

Mantra without Swara
शाचिगो शाचिपूजनायꣳ रणाय ते सुतः । आखण्डल प्र हूयसे ॥

शाचिगो । शाचि । गो । शाचिपूजन । शाचि । पूजन । अयम् । रणाय । ते । सुतः । आखण्डल । प्र । हूयसे ॥७२६॥

Samveda - Mantra Number : 726
(Kauthum) उत्तरार्चिकः: » Prapathak » 1; Ardh Prapathak » 2;
(Rananiya) उत्तरार्चिकः: » Adhyay » 2; Khand » 2;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
(शाचिगो) ज्याची वेदवाणी ज्ञान आणि कर्माविषयी उपदेश करते, अशा हे जगदीश्वरा (शाचिपूजन) ज्ञशनी व पुरुषार्थी लोक ज्याची पुजा करतात अशा हे परमेश्वरा (अयम्) हा पवित्र रस (ते) तुमच्या मध्ये (रणाय) रमण करण्यासाठी आम्ही (सुत:) उत्पन्न केला आहे. आमच्या हृदयात तुमच्या भक्तीचा भाव जागृत केला आहे. (आखण्डल) दु:ख, दुर्गुण, दुर्व्यसन आदींना खण्ड खण्ड करणाऱ्या हे देव, त्या भक्तीरसाचा अधिकाधिक आस्वाद घेण्यासाठी तुम्ही आमच्याकडून आहूत होत आहात. (म्हणजे आम्ही भक्तीभावे तुमचे आवाहन करीत आहोत. आमच्या हृदयातील भक्तीला दृढ-दृढतर-दृढतम करा, ही विनंती. ।।२।।
Essence
ज्ञानाद्वारे आणि पुरुषार्थ केल्यानंतर परमेश्वराची आराधना केल्यानंतर तो उपासकांच्या दु:ख, दारिद्रय, आदींना खंड खंड करून भक्तांना रिद्धी-सिद्धी देऊन सुखी करतो. ।।२।।
Subject
गुरूकडून अध्यात्म विद्या ग्रहण केल्यानंतर शिष्य परमेश्वराचे आवाहन करीत आहेत.