Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 713

733 Mantra
Devata- इन्द्रः Rishi- श्रुतकक्षः सुकक्षो वा आङ्गिरसः Chhand- अनुष्टुप् Swara- गान्धारः
Mantra with Swara
पा꣢न्त꣣मा꣢ वो꣣ अ꣡न्ध꣢स꣣ इ꣡न्द्र꣢म꣣भि꣡ प्र गा꣢꣯यत । वि꣣श्वासा꣡ह꣢ꣳ श꣣त꣡क्र꣢तुं꣣ म꣡ꣳहि꣢ष्ठं चर्षणी꣣ना꣢म् ॥७१३॥

पा꣡न्त꣢꣯म् । आ । वः꣣ । अ꣡न्ध꣢꣯सः । इ꣡न्द्र꣢꣯म् । अ꣣भि꣢ । प्र । गा꣣यत । विश्वासा꣡ह꣢म् । वि꣣श्वा । सा꣡ह꣢꣯म् । श꣣त꣡क्र꣢तुम् । श꣣त꣢ । क्र꣣तुम् । म꣡ꣳहि꣢꣯ष्ठम् । च꣣र्षणीना꣢म् ॥७१३॥

Mantra without Swara
पान्तमा वो अन्धस इन्द्रमभि प्र गायत । विश्वासाहꣳ शतक्रतुं मꣳहिष्ठं चर्षणीनाम् ॥

पान्तम् । आ । वः । अन्धसः । इन्द्रम् । अभि । प्र । गायत । विश्वासाहम् । विश्वा । साहम् । शतक्रतुम् । शत । क्रतुम् । मꣳहिष्ठम् । चर्षणीनाम् ॥७१३॥

Samveda - Mantra Number : 713
(Kauthum) उत्तरार्चिकः: » Prapathak » 1; Ardh Prapathak » 2;
(Rananiya) उत्तरार्चिकः: » Adhyay » 2; Khand » 1;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शिष्यांनो, (व:) तुम्ही सर्वजण (इन्द्रम् अभि) अगाध ज्ञानाचा जो भंडार ज्ञानरूप ऐश्वर्याचा स्वामी त्या शोभायमान आचार्याला उद्देशून (प्र गायत) उत्तम प्रकारे स्तुतिगान करा. तो कसा आहे? तो आचार्य (अन्धस:) विद्यारूप रसाचे (पाठम्) रक्षण करणारा आहे. तो (विशसाहम्) काम, क्रोध, अज्ञान आलस्य आदी शत्रूंना पराजित करणारा आहे. (शतक्रतम्) अति बुद्धिमंत आणि अति कर्मण्य आहे जो (चर्षणीनाम्) पुरुषार्थी विद्यार्थ्यांना (मंहिष्ठम्) विद्या व सदाचाराचे दान करणारा आहे. अशा ज्ञान सागर आचार्याची तुम्ही नेहमी स्तुती करीत जा (म्हणजे तो प्रसन्न होऊन तुम्हाला विद्या प्रदान करीन. ।।१।।
Essence
जे शिष्य विद्या-सागर अध्यापन कुशल, सदाचारी आणि ब्रह्मज्ञानी गुरुची श्रद्धा भावनेने सेवा करतात ते विद्वान, सदाचारी व ब्रह्मज्ञानी होऊन सर्वदृष्ट्या उत्कर्ष प्राप्त करतात. ।।१।।
Subject
प्रथम ऋचेची व्याख्या पूर्वार्चिक भागाच्या क्र. १५५ वर केली असून, तिथे त्याचा अर्थ परमेश्वर आणि राजा यांविषयी केली आहे. इथे गुरु शिष्याविषयी सांगत आहेत.