Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 711

733 Mantra
Devata- इन्द्रः Rishi- नृमेध आङ्गिरसः Chhand- उष्णिक् Swara- ऋषभः
Mantra with Swara
वा꣡र्ण त्वा꣢꣯ य꣣व्या꣢भि꣣र्व꣡र्ध꣢न्ति शूर꣣ ब्र꣡ह्मा꣢णि । वा꣣वृध्वा꣡ꣳसं꣢ चिदद्रिवो दि꣣वे꣡दि꣢वे ॥७११॥

वाः । न । त्वा꣣ । यव्या꣡भिः꣢ । व꣡र्द्ध꣢꣯न्ति । शू꣣र । ब्र꣡ह्मा꣢꣯णि । वा꣣वृध्वा꣡ꣳस꣢म् । चि꣣त् । अद्रिवः । अ । द्रिवः । दि꣡वेदि꣢वे । दि꣣वे꣢ । दि꣣वे ॥७११॥

Mantra without Swara
वार्ण त्वा यव्याभिर्वर्धन्ति शूर ब्रह्माणि । वावृध्वाꣳसं चिदद्रिवो दिवेदिवे ॥

वाः । न । त्वा । यव्याभिः । वर्द्धन्ति । शूर । ब्रह्माणि । वावृध्वाꣳसम् । चित् । अद्रिवः । अ । द्रिवः । दिवेदिवे । दिवे । दिवे ॥७११॥

Samveda - Mantra Number : 711
(Kauthum) उत्तरार्चिकः: » Prapathak » 1; Ardh Prapathak » 1;
(Rananiya) उत्तरार्चिकः: » Adhyay » 1; Khand » 6;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
हे (शूर) वीरवर, आणि (अद्रिव:) ज्याला कोणीही विदारित करू शकत नाही, ज्याला कोणी नष्ट वा पराजित करू शकत नाही; अशा हे अजरामर (इन्द्र प्रभो, जसे लोक (यव्याभि:) कालवा आदी साधनांनी जलजवळ आणतात आणि त्या जलाने (वा:न) सरोवराच्या जलप्रमाण वाढवतात. त्याचप्रमाणे (वावृप्यांसं चित्) जो आधीच वाढलेला आहे, (महान आहे) अशा (त्या) तुला (ब्रह्माणि) उपासकगण आपल्या स्त्रोतांद्वारे (वर्धन्ति) स्वत:च्या हृदयात वाढवतात अथवा समाजात तुझी कीर्ती तुझ्या भक्तीचा महिमा प्रसारित करतात. ।।२।।
Essence
सर्वान्तर्यामी परमेश्वरात ऱ्हास अथवा वृद्धी होत नाही, तरी पण जेव्हा लोक वा समाज त्याला विसरतो अथवा जगात नास्तिकतेचा अधिक प्रसार होतो, तेव्हा परमेश्वराचा जणू ऱ्हास होतो. त्यामुळे भक्तगणांचे कर्तव्य आहे की, त्यांनी ईश्वराच्या स्त्रोतादीच्या गायनाद्वारे त्याचा महिमा वाढवावा. तसेच त्याच्या भक्तीचा प्रसार करावा. ।।२।।
Subject
पुढील मंत्रात परमात्म्याविषयी सांगितले आहे. --
Special
जो पूर्वीच वाढलेला वा महान आहे अशा तुला वाढवितात या कथनात विरोधालंकार आहे. वाढविणे म्हणजे तुझे स्मरण करणे आणि तुझ्या भक्तीचा प्रसार करणे असा अर्थ केल्यानंतर त्या विरूद्ध कथनाचा परिहार होतो. ।।२।।