Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 7

733 Mantra
Devata- अग्निः Rishi- भरद्वाजो बार्हस्पत्यः Chhand- गायत्री Swara- षड्जः Kaand Name- आग्नेयं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- आग्नेयं पर्व
Mantra with Swara
ए꣢ह्यू꣣ षु꣡ ब्रवा꣢꣯णि꣣ ते꣡ऽग्न꣢ इ꣣त्थे꣡त꣢रा꣣ गि꣡रः꣢ । ए꣣भि꣡र्व꣢र्धास꣣ इ꣡न्दु꣢भिः ॥७॥

आ꣢ । इ꣣हि । उ । सु꣢ । ब्र꣡वा꣢꣯णि । ते꣣ । अ꣡ग्ने꣢꣯ । इ꣣त्था꣢ । इ꣡त꣢꣯राः । गि꣡रः꣢꣯ । ए꣣भिः꣢ । व꣣र्धासे । इ꣡न्दु꣢꣯भिः ॥७॥

Mantra without Swara
एह्यू षु ब्रवाणि तेऽग्न इत्थेतरा गिरः । एभिर्वर्धास इन्दुभिः ॥

आ । इहि । उ । सु । ब्रवाणि । ते । अग्ने । इत्था । इतराः । गिरः । एभिः । वर्धासे । इन्दुभिः ॥७॥

Samveda - Mantra Number : 7
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 1; Ardh Prapathak » 1; Dashati » 1;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 1; Khand » 1;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
हे (अग्ने) परमात्मन्, आपण (आ इहि उ) माझ्या हृदय प्रदेशात या. मी (ते) आपणासाठी (इत्था) सत्य भावनेने खऱ्या मनाने (इतरा:) सामान्यापेक्षा वेगळ्या अशा (गिर:) वेदवाणी (सु) सम्यक प्रकारे पूर्ण मनोयोगासह (ब्रवाणि) उच्चाराव्यात. अर्थात वेदवाणीद्वारे आपली स्तुती करावी (वाकरीन) आपण (एभिः) या मी समर्पित केलेल्या (इन्दुभिः) भावपूरित भक्तिरसरूप सोमाने (वर्धासे) वृद्धिंगत व्हा. या मंत्रातील इन्दु शब्दाद्वारे हा आशय ध्वनित होत आहे की जसे चंद्र किरणांनी समुद्र व वनस्पती वाढतात, तद्वत आपण माझ्या स्तुतीद्वारे वृध्दिंगत व्हा. (माझी स्तुती स्विकारा) ||७||
Essence
मनुष्यकृत वाणी सामान्य असते, पण वेदवाणी परमेश्वरकृत असल्यामुळे त्या वाणीपेक्षा विलक्षण आहे. तिचा प्रत्येक शब्द साभिप्राय व विविधार्थ प्रकाशक असतो. जर उपासकगण त्या वाणीद्वारे परमात्म्याचे उपासना करतील आणि त्याच्याप्रत आपल्या हृदयातील भक्तिरसरूप सोमरस प्रवाहित करतील. तर ज्याप्रमाणे चंद्र किरणांनी जसे समुद्र, वनस्पती आदी वाढतात. तसेच उपासकांच्या भक्तिरसाने तृप्त होऊन परमेश्वर उपासकांच्या हृदयात अत्यंत उत्कर्ष भावाने आणि त्यांना कृतकृत्य करतो. ।।७।।
Subject
त्या परमेश्वराची मी वेदमंत्राद्वारे स्तुती करतो.