Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 695

733 Mantra
Devata- पवमानः सोमः Rishi- अग्निश्चाक्षुषः Chhand- उष्णिक् Swara- ऋषभः
Mantra with Swara
अ꣣यं꣡ भरा꣢꣯य सान꣣सि꣡रिन्द्रा꣢꣯य पवते सु꣣तः꣢ । सो꣢मो꣣ जै꣡त्र꣢स्य चेतति꣣ य꣡था꣢ वि꣣दे꣢ ॥६९५॥

अ꣣य꣢म् । भ꣡रा꣢꣯य । सा꣣नसिः꣢ । इ꣡न्द्रा꣢꣯य । प꣣वते । सुतः꣢ । सो꣡मः꣢꣯ । जै꣡त्र꣢स्य । चे॓तति । य꣡था꣢ । वि꣢दे꣢ ॥६९५॥

Mantra without Swara
अयं भराय सानसिरिन्द्राय पवते सुतः । सोमो जैत्रस्य चेतति यथा विदे ॥

अयम् । भराय । सानसिः । इन्द्राय । पवते । सुतः । सोमः । जैत्रस्य । चे॓तति । यथा । विदे ॥६९५॥

Samveda - Mantra Number : 695
(Kauthum) उत्तरार्चिकः: » Prapathak » 1; Ardh Prapathak » 1;
(Rananiya) उत्तरार्चिकः: » Adhyay » 1; Khand » 5;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
(भराय) अंत:करणात सतत होणाऱ्या वाईट आणि चांगल्या वृत्तीचे युद्ध म्हणजेच देव+असुर संग्राम, या संग्रामात विजयी होण्यासाठी (सानसि:) अत्यंत आवश्यक व संभजनीय (अयम्) हा ज्ञान कर्म उपसनारूप रस जो (सुता:) आचार्यांनी शिष्यांकडे प्रेरित केला आहे, तो रस (इन्द्राय) आत्म्याकडे (पवते) प्रवाहित होत आहे (आम्हा साधकांची व शिष्यांची अशी इच्छा आहे की (मेभ:) ज्ञानादींचा हा प्रवाह (जेत्रस्य) विजय चाहणाऱ्या आत्म्याकडे (चेतति) सतत प्रवाहित होत राहो की ज्यामुळे शिष्य वा साधक (विदे) कर्तव्य अकर्तव्यास ओळखत राहील ।।२।।
Essence
प्रथम ज्ञान प्राप्त करणे, नंतर तद्नुकुल आचरण करणे आणि त्यासह परमेश्वराची उपासना करणे, माणसाला संसार रूप समरांगणात विजयी होण्याचा हा एकच मार्ग आहे. ।।२।।
Subject
पुन्हा तोच विषय वर्णित आहे.