Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 692

733 Mantra
Devata- पवमानः सोमः Rishi- गौरिवीतिः शाक्त्यः Chhand- काकुभः प्रगाथः (विषमा ककुप्, समा सतोबृहती) Swara- ऋषभः
Mantra with Swara
प꣡व꣢स्व꣣ म꣡धु꣢मत्तम꣣ इ꣡न्द्रा꣢य सोम क्रतु꣣वि꣡त्त꣢मो꣣ म꣡दः꣢ । म꣡हि꣢ द्यु꣣क्ष꣡त꣢मो꣣ म꣡दः꣢ ॥६९२॥

प꣡वस्व꣢꣯ । म꣡धु꣢꣯मत्तमः । इ꣡न्द्रा꣢꣯य । सो꣣म । क्रतुवि꣡त्त꣢मः । क्र꣣तु । वि꣡त्त꣢꣯मः । म꣡दः꣢꣯ । म꣡हि꣢꣯ । द्यु꣣क्ष꣡त꣢मः । द्यु꣣ । क्ष꣡त꣢꣯मः । म꣡दः꣢꣯ ॥६९२॥

Mantra without Swara
पवस्व मधुमत्तम इन्द्राय सोम क्रतुवित्तमो मदः । महि द्युक्षतमो मदः ॥

पवस्व । मधुमत्तमः । इन्द्राय । सोम । क्रतुवित्तमः । क्रतु । वित्तमः । मदः । महि । द्युक्षतमः । द्यु । क्षतमः । मदः ॥६९२॥

Samveda - Mantra Number : 692
(Kauthum) उत्तरार्चिकः: » Prapathak » 1; Ardh Prapathak » 1;
(Rananiya) उत्तरार्चिकः: » Adhyay » 1; Khand » 5;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
(साधक/उपासक म्हणत आहेत) हे (सोम) ब्रह्मज्ञान रस तू (मधुमत्तम:) सर्वांहून मधुर असून, आम्हा साधकांना (परस्व) पवित्र कर. तुझ्याकडून मिळणारा (मद:) आनंद (इन्द्राय) माझ्या आत्म्यासाठी (क्रतुवित्रम:) प्रज्ञा आणि कर्म देणारा होतो. तसेच तुझ्याकडून मिळणारा (मद:) आनंद (महि) अत्यधिक (व्युक्षतम्:) माझ्या आत्म्यात तेज भरणारा आहे (म्हणून तू आचार्याकडून मला नेहमी प्राप्त होत राहा.) ।।१।।
Essence
शिष्याने अथवा माणसाने आचार्याकडून ब्रह्मज्ञान प्राप्त करीत करीत ब्रह्माच्या गुण कर्म स्वभावाचे ध्यान करीत असावे. आणि याप्रकारे आपले जीवन पवित्र करीत राहावे. ।।१।।
Subject
प्रथम ऋचेची व्याख्या पूर्वार्चिक भागात क्र. ५७८ वर केलेली असून, तेथे त्याचा अर्थ परमेश्वराकडून प्राप्त होणाऱ्या आनंदरसाविषयी केला आहे. येथे आचार्याकडून प्राप्त होणाऱ्या ज्ञानरसाविषयीचा अर्थ सांगितला आहे.