Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 687

733 Mantra
Devata- इन्द्रः Rishi- कलिः प्रागाथः Chhand- प्रगाथः(विषमा बृहती समा सतोबृहती) Swara- मध्यमः
Mantra with Swara
त꣡रो꣢भिर्वो वि꣣द꣡द्व꣢सु꣣मि꣡न्द्र꣢ꣳ स꣣बा꣡ध꣢ ऊ꣣त꣡ये꣢ । बृ꣣ह꣡द्गाय꣢꣯न्तः सु꣣त꣡सो꣢मे अध्व꣣रे꣢ हु꣣वे꣢꣫ भरं꣣ न꣢ का꣣रि꣡ण꣢म् ॥६८७॥

त꣡रो꣢꣯भिः । वः꣣ । विद꣡द्व꣢सुम् । वि꣣द꣢त् । व꣣सुम् । इ꣡न्द्र꣢꣯म् । स꣡बा꣢꣯धः । स꣣ । बा꣡धः꣢꣯ । ऊ꣡त꣡ये꣢ । बृ꣡ह꣢त् । गा꣡य꣢꣯न्तः । सु꣣त꣡सो꣢मे । सु꣡त꣢ । सो꣣मे । अध्वरे꣢ । हु꣣वे꣢ । भ꣡र꣢꣯म् । न । का꣣रि꣡ण꣢म् ॥६८७॥

Mantra without Swara
तरोभिर्वो विदद्वसुमिन्द्रꣳ सबाध ऊतये । बृहद्गायन्तः सुतसोमे अध्वरे हुवे भरं न कारिणम् ॥

तरोभिः । वः । विदद्वसुम् । विदत् । वसुम् । इन्द्रम् । सबाधः । स । बाधः । ऊतये । बृहत् । गायन्तः । सुतसोमे । सुत । सोमे । अध्वरे । हुवे । भरम् । न । कारिणम् ॥६८७॥

Samveda - Mantra Number : 687
(Kauthum) उत्तरार्चिकः: » Prapathak » 1; Ardh Prapathak » 1;
(Rananiya) उत्तरार्चिकः: » Adhyay » 1; Khand » 4;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
(एक वेदज्ञ विद्वान मनुष्यांना सांगत आहे हे मनुष्यांनो, (सबाध:) जेव्हा तुम्ही अविद्यारूप बाधेने पीडित होता, तेव्हा (व:) तुम्ही (ऊतये) रक्षणासाठी अथवा मार्गदर्शनाद्वारे बाधा दूर करण्याचे उपाय शोधण्यासाठी (तरोभि:) अत्यंत वेगवान व कुशाग्र बुद्धीमान आणि (विददुसुम्) ब्रह्मविद्यारूप धन देणाऱ्या (इन्द्रम्) आचार्याचे (बृहत्) अत्यधिक (गायन्त:) महिमा गान करा (तो तुमची अविद्या बाधा दूर करील) मी (एक वेदज्ञ विद्वान) देखील (सुतसोमे) ज्यात विद्यारसाचे निष्पादन होते, त्या (अध्वरे) विद्या यज्ञात सहभागी होतो आणि प्रज्ञानी आचार्याकडे जातो. कशाप्रकारे ? जसे (भरं न) आपल्या परिवाराचे भरणपोषण पालन करणारा गृहस्वामी पालन कार्यासाठी धावपळ करतो, तसे मीदेखील ब्रह्मज्ञान प्राप्तीसाठी (कारिणम्) कर्मयोगी आचार्यालाच (हुवे) हाक मारतो. त्यांच्याकडे जातो ।।१।।
Essence
ब्रह्म साक्षात्कार प्राप्त करण्यासाठी मनुष्यांनी योग्य गुरुचा आश्रय घेतला पाहिजे. पण तो गुरू स्वत: ब्रह्म साक्षात्कार झालेला असावा, हे महत्त्वाचे आहे. ।।१।।
Subject
या प्रथम ऋचेची व्याख्या पूर्वार्चिक भागात क्र. २३७ वर केली आहे. तिथे परमेश्वरपक्षी अर्थ सांगितला आहे. येथे ब्रह्मविद्येचा उपदेश करणाऱ्या आचार्याला आवाहन केले आहे.
Special
या मंत्रात (भरं न) उपमा अलंकार आहे ।।१।।