Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 685

733 Mantra
Devata- इन्द्रः Rishi- नोधा गौतमः Chhand- प्रगाथः(विषमा बृहती समा सतोबृहती) Swara- मध्यमः
Mantra with Swara
तं꣡ वो꣢ द꣣स्म꣡मृ꣢ती꣣ष꣢हं꣣ व꣡सो꣢र्मन्दा꣣न꣡मन्ध꣢꣯सः । अ꣣भि꣢ व꣣त्सं꣡ न स्वस꣢꣯रेषु धे꣣न꣢व꣣ इ꣡न्द्रं꣢ गी꣣र्भि꣡र्न꣢वामहे ॥६८५॥

त꣢म् । वः꣣ । दस्म꣢म् । ऋ꣣तीष꣡ह꣢म् । ऋ꣣ती । स꣡ह꣢꣯म् । व꣡सोः꣢꣯ । म꣣न्दान꣢म् । अ꣡न्ध꣢꣯सः । अ꣣भि꣢ । व꣣त्स꣢म् । न । स्व꣡स꣢꣯रेषु । धे꣣न꣡वः꣢ । इ꣡न्द्र꣢꣯म् । गी꣣र्भिः꣢ । न꣣वामहे ॥६८५॥

Mantra without Swara
तं वो दस्ममृतीषहं वसोर्मन्दानमन्धसः । अभि वत्सं न स्वसरेषु धेनव इन्द्रं गीर्भिर्नवामहे ॥

तम् । वः । दस्मम् । ऋतीषहम् । ऋती । सहम् । वसोः । मन्दानम् । अन्धसः । अभि । वत्सम् । न । स्वसरेषु । धेनवः । इन्द्रम् । गीर्भिः । नवामहे ॥६८५॥

Samveda - Mantra Number : 685
(Kauthum) उत्तरार्चिकः: » Prapathak » 1; Ardh Prapathak » 1;
(Rananiya) उत्तरार्चिकः: » Adhyay » 1; Khand » 4;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
(आपल्या मनाला, इंद्रियांना आणि प्राणादी शक्तींना उद्देशून साधकगण म्हणत आहेत) हे मना, हे इंद्रियांनो, आम्ही (साधकगण) (व:) तुमच्या (दस्त्रम्) दोषांना नष्ट करणाऱ्या (ऋतीषहम्) आक्रमक काम, क्रोधादी शत्रूंना परास्त करणाऱ्या (वसो:) निवासक म्हणजे स्थिरता, दृढता देणाऱ्या (अन्धस:) आनंदरसाने (मन्दानम्) मदमत्त करणाऱ्या या (इन्द्रम्) आपल्या अंतराम्याला (अभि) उद्देशून (स्वसरेषु) दिवस उगवत असताना (गीर्भि:) उद्बोधक वाणीद्वारे (नवामहे) गुण वर्णनरूप स्तुतीद्वारे उद्बुद्ध व जागृत करीत आहोत. कशाप्रकारे ? की जसे (स्वसरेषु) गोशाळेत (धेनवा)गायीवकम्भि) आपल्या नवजात वासराकडे धावत जातात. त्याप्रमाणे आम्ही साधक आपल्या आत्म्याकडे त्याला उद्बुद्ध करण्यासाठी धावत आहोत. त्याला जागृत वा प्रोत्साहीत करीत आहोत. ।।१।।
Essence
स्वत:च्या आत्म्याला उद्बोधन देऊन मनातील दोष दूर करून आणि सद्गुणांचा स्वीकार करून आम्ही वा प्रत्येक माणूस जीवनात परम यशस्वी होऊ शकतो ।।१।।
Subject
या मंत्राचा अर्थ पूर्वार्चिक भागात क्र. २३६ वर परमात्म्याविषयी दिला आहे. येथे जीवात्मपर अर्थ देत आहोत.
Special
या मंत्रात श्लिष्टोषमा अलंकार आहे. ।।१।।