Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 680

733 Mantra
Devata- इन्द्रः Rishi- वसिष्ठो मैत्रावरुणिः Chhand- प्रगाथः(विषमा बृहती समा सतोबृहती) Swara- मध्यमः
Mantra with Swara
अ꣣भि꣡ त्वा꣢ शूर नोनु꣣मो꣡ऽदु꣢ग्धा इव धे꣣न꣡वः꣢ । ई꣡शा꣢न꣣म꣡स्य जग꣢꣯तः स्व꣣र्दृ꣢श꣣मी꣡शा꣢नमिन्द्र त꣣स्थु꣡षः꣢ ॥६८०॥

अ꣣भि꣢ । त्वा꣣ । शूर । ना꣡नु꣢꣯मः । अ꣡दु꣢꣯ग्धाः । अ । दु꣣ग्धाः । इव । धे꣡न꣢वः । ई꣡शा꣢꣯नम् । अ꣣स्य꣢ । ज꣡ग꣢꣯तः । स्व꣣र्दृ꣡श꣢म् । स्वः꣣ । दृ꣡श꣢꣯म् । ई꣡शा꣢꣯नम् । इ꣣न्द्र । तस्थु꣡षः꣢ ॥६८०॥

Mantra without Swara
अभि त्वा शूर नोनुमोऽदुग्धा इव धेनवः । ईशानमस्य जगतः स्वर्दृशमीशानमिन्द्र तस्थुषः ॥

अभि । त्वा । शूर । नानुमः । अदुग्धाः । अ । दुग्धाः । इव । धेनवः । ईशानम् । अस्य । जगतः । स्वर्दृशम् । स्वः । दृशम् । ईशानम् । इन्द्र । तस्थुषः ॥६८०॥

Samveda - Mantra Number : 680
(Kauthum) उत्तरार्चिकः: » Prapathak » 1; Ardh Prapathak » 1;
(Rananiya) उत्तरार्चिकः: » Adhyay » 1; Khand » 4;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
(शूर इन्द्र) शूरवीर असलेल्या आमच्या हे आत्मा आम्ही साधकगण (त्वा अभि) तुला उद्देशून (नोनुमा) वारंवार म्हणत आहोत, तुझी स्तुती करीत आहोत. कशाप्रकारे ? (अदुग्धा:) ज्यांचे अजून दोहन केले नाही अर्थात अजून ज्यांची धार काढली नाही अशा (धेनष: इव) गायी ज्याप्रमाणे दोहनासाठी उत्कंठीत होऊन वारंवार हंबरत राहतात, त्याचप्रमाणे आम्ही हे आत्मा आम्ही वारंवार आग्रहाने तुझ्यासाठी स्तुतिपरक शब्द उच्चारीत आहोत. तू कसा आहेत? तर उत्तर : तू (अस्त) या (जगत) जगाच्या म्हणजे दूर दूर जाणाऱ्या मनाचा (ईशनम्) स्वामी आहेस. तू (सर्वदृशम्) आनन्द द्रष्टा आहेस आणि (तस्थुष:) आमच्या शरीरात स्थिर वा अजंगम रूपेण असणाऱ्या शारीरिक अंग प्रत्यंगांचा (ईशानम्) स्वामी आहेस. म्हणून आम्ही (नोनुम:) वारंवार तुझ्या गुणांचे वा सामर्थ्याचे वर्णन करीत आहोत. तुला प्रोत्साहित करीत आहोत ।।१।।
Essence
माणसाच्या आत्म्यात अनेक महान शक्ती प्रसुप्तरूपेण असतात. समस्त शरीर चक्राचा जो अधिष्ठाता म्हणजे आत्मा या आत्म्यास जागृत वा उद्बोधित करून सर्व लौकिक आणि आध्यात्मिक सिद्धी प्राप्त करता येतात. ।।१।।
Subject
या ऋचेची व्याख्या पूर्वार्चिक भागात क्र. २३३ वर केलेली आहे. तिथे त्याचा अर्थ जगदीश्वरपर सांगितला आहे. इथे स्वत:च्या आत्म्यास संबोधून काही म्हटले आहे.
Special
या मंत्रात उपमा अलंकार आहे ।।१।।