Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 678

733 Mantra
Devata- पवमानः सोमः Rishi- उशना काव्यः Chhand- त्रिष्टुप् Swara- धैवतः
Mantra with Swara
स्वा꣣युधः꣡ प꣢वते दे꣣व꣡ इन्दुर꣢꣯शस्ति꣣हा꣢ वृ꣣ज꣢ना꣣ र꣡क्ष꣢माणः । पि꣣ता꣢ दे꣣वा꣡नां꣢ जनि꣣ता꣢ सु꣣द꣡क्षो꣢ विष्ट꣣म्भो꣢ दि꣣वो꣢ ध꣣रु꣡णः꣢ पृथि꣣व्याः꣢ ॥६७८॥

स्वा꣣युधः꣢ । सु꣣ । आयुधः꣢ । प꣣वते । देवः꣡ । इ꣢न्दुः꣢꣯ । अ꣣शस्तिहा꣢ । अ꣣शस्ति । हा꣢ । वृ꣣ज꣡ना꣢ । र꣡क्ष꣢꣯माणः । पि꣣ता꣢ । दे꣣वा꣡ना꣢म् । ज꣣निता꣢ । सु꣣द꣡क्षः꣢ । सु꣣ । द꣡क्षः꣢꣯ । वि꣡ष्टम्भः꣢ । वि꣣ । स्तम्भः꣢ । दि꣣वः꣢ । ध꣣रु꣡णः꣢ । पृ꣣थिव्याः꣢ ॥६७८॥

Mantra without Swara
स्वायुधः पवते देव इन्दुरशस्तिहा वृजना रक्षमाणः । पिता देवानां जनिता सुदक्षो विष्टम्भो दिवो धरुणः पृथिव्याः ॥

स्वायुधः । सु । आयुधः । पवते । देवः । इन्दुः । अशस्तिहा । अशस्ति । हा । वृजना । रक्षमाणः । पिता । देवानाम् । जनिता । सुदक्षः । सु । दक्षः । विष्टम्भः । वि । स्तम्भः । दिवः । धरुणः । पृथिव्याः ॥६७८॥

Samveda - Mantra Number : 678
(Kauthum) उत्तरार्चिकः: » Prapathak » 1; Ardh Prapathak » 1;
(Rananiya) उत्तरार्चिकः: » Adhyay » 1; Khand » 3;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
गुरू कसा असतो अथवा कसा असावा हे सांगत आहेत. तो (स्वायुध:) दण्ड देणारा असावा. पण त्याचा दंड भद्रकारी म्हणजे शिष्याचे हित करणारा असावा. तो देव: सुख दाता व अशस्ति हा अप्रशक्ती म्हणजे निन्दा, दुर्गुणादी नष्ट करणारा तसेच (वृजना) शिष्याच्या बळाचे (रक्षमाण:) रक्षण करणारा असावा. तो (पिता) पित्याप्रमाणे पालक तसेच (देवांजनिवा) विद्वानांना जन्म देणारा म्हणजे शिष्यांना सुसंस्कार देणारा असावा. तो (सुदक्ष:) उत्तम बलशाली आणि (दिव:) विद्यारूप सुर्याला (विष्टम्भ:) आधार देणारा असावा. तसेच तो (पृथिव्या:) राष्ट्रभूमीचा (धरूण:) आधार असावा. असा (इन्दु:) तेजस्वी गुरूच (पवते) शिष्यांना पावित्र्य देवो. (त्यांना उत्तम चारित्र्यवान नागरिक बनवितो ।।२।।
Essence
जे लोक वा जे शिष्य मंत्रात वर्णित गुणांनी समृद्ध असलेल्या गुरूकडून शिक्षण घेतात, ते विद्वान, सदाचारी आणि प्रशस्त कीर्तिमान होतात. ।।२।।
Subject
पुढील मंत्रात हे सांगितले आहे की, गुरू कोणकोणत्या गुणांनी युक्त असावा.