Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 677

733 Mantra
Devata- पवमानः सोमः Rishi- उशना काव्यः Chhand- त्रिष्टुप् Swara- धैवतः
Mantra with Swara
प्र꣡ तु द्र꣢꣯व꣣ प꣢रि꣣ को꣢शं꣣ नि꣡ षी꣢द꣣ नृ꣡भिः꣢ पुना꣣नो꣢ अ꣣भि꣡ वाज꣢꣯मर्ष । अ꣢श्वं꣣ न꣡ त्वा꣢ वा꣣जि꣡नं꣢ म꣣र्ज꣢य꣣न्तो꣡ऽच्छा꣢ ब꣣र्ही꣡ र꣢श꣣ना꣡भि꣢र्नयन्ति ॥६७७॥

प्र꣢ । तु । द्र꣣व । प꣡रि꣢꣯ । कोशम् । नि । सी꣣द । नृ꣡भिः꣢꣯ । पु꣡नानः꣢ । अ꣣भि꣢ । वा꣡ज꣢꣯म् । अ꣣र्ष । अ꣡श्व꣢꣯म् । न । त्वा꣣ । वाजि꣡न꣢म् । म꣣र्ज꣡य꣢न्तः । अ꣡च्छ꣢꣯ । ब꣣र्हिः꣡ । र꣣शना꣡भिः꣢ । न꣣यन्ति ॥६७७॥

Mantra without Swara
प्र तु द्रव परि कोशं नि षीद नृभिः पुनानो अभि वाजमर्ष । अश्वं न त्वा वाजिनं मर्जयन्तोऽच्छा बर्ही रशनाभिर्नयन्ति ॥

प्र । तु । द्रव । परि । कोशम् । नि । सीद । नृभिः । पुनानः । अभि । वाजम् । अर्ष । अश्वम् । न । त्वा । वाजिनम् । मर्जयन्तः । अच्छ । बर्हिः । रशनाभिः । नयन्ति ॥६७७॥

Samveda - Mantra Number : 677
(Kauthum) उत्तरार्चिकः: » Prapathak » 1; Ardh Prapathak » 1;
(Rananiya) उत्तरार्चिकः: » Adhyay » 1; Khand » 3;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
हे शिष्य, तू (तु) लवकरात लवकर (प्र द्रव) उन्नत वा सुसंस्कारीत, विद्याज्ञान होण्यासाठी प्रयत्न कर. यासाठी कौशम ज्ञानाचा जो भांडार त्या गुरूजवळ परि निषीद) जाऊन बैस. (नृभि:) समाजातील नेता प्रमुख लोकांनी (पुनान:) तुला पवित्र वा प्रशंसित केले आहे. (वाजम्) तू शारीरिक आणि आत्मिक बळ (अभ्यर्ष) प्राप्त कर. हे गुरूजन (वाजिनम्) शक्तिमान ग्रहणशील अशा (त्वा) तुला (मर्जयन्त:) शुद्द करीत करीत (म्हणजे ज्ञानाने पवित्र करीत) (रशनाभि:) अनेक आवश्यक नियमांत वा मर्यादेत ठेवीत (बर्हि: अच्छ) ज्ञानकांडाकडे व कर्मकांडाकडे नयन्ति प्रेरित करतील. कशाप्रकारे? की (न) जसे (वजिनम् अश्वे) बलवान अश्वाला योद्धे (रशनाभि:) लगामाद्वारे नियंत्रित करीत (बर्हि:अच्छ) युद्धक्षेत्राकडे (नयन्ति) घेऊन जातात. ।।१।।
Essence
गुरूजनांचे आम्हा सर्वांवर थोर उपकार आहेत. कारण त्यांच्या प्रेरणा व मार्गदर्शनामुळे आम्ही प्रबोधजन विद्यावान होऊ शकतो. तपस्वी तसेच पवित्राचरणवान होऊन आपली उन्नती साध्य करतो वा करू शकतो. ।।१।।
Subject
प्रथम ऋचेची व्याख्या पूर्वार्चिक भागात क्र. ५२३ वर केलेली आहे. तिथे या ऋचेचा अर्थ जीवात्म्यास उद्बोधन या रूपात केला आहे. इथे शिष्याला उद्देशून म्हटले आहे.
Special
या मंत्रात श्लिष्येपमा अलंकार आहे.