Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 657

733 Mantra
Devata- पवमानः सोमः Rishi- शतं वैखानसः Chhand- गायत्री Swara- षड्जः
Mantra with Swara
प꣡व꣢मानस्य ते कवे꣣ वा꣢जि꣣न्त्स꣡र्गा꣢ असृक्षत । अ꣡र्व꣢न्तो꣣ न꣡ श्र꣢व꣣स्य꣡वः꣢ ॥६५७॥

प꣡व꣢꣯मानस्य । ते꣣ । कवे । वा꣡जि꣢꣯न् । स꣡र्गाः꣢꣯ । अ꣣सृक्षत । अ꣡र्व꣢꣯न्तः । न । श्र꣣वस्य꣡वः꣢ ॥६५७॥

Mantra without Swara
पवमानस्य ते कवे वाजिन्त्सर्गा असृक्षत । अर्वन्तो न श्रवस्यवः ॥

पवमानस्य । ते । कवे । वाजिन् । सर्गाः । असृक्षत । अर्वन्तः । न । श्रवस्यवः ॥६५७॥

Samveda - Mantra Number : 657
(Kauthum) उत्तरार्चिकः: » Prapathak » 1; Ardh Prapathak » 1;
(Rananiya) उत्तरार्चिकः: » Adhyay » 1; Khand » 1;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
(कवे) हे वेदकाव्याचे रचयिता कवी, हे (रजित्) बलशाल परमेश्वर (पवमानस्य) आम्हांस पवित्र करणाऱ्या अशा तुझ्याकडून (सर्गा:) आनन्दाच्या धारा (श्रवस्थव:) आम्हाला यशस्वी करीत (असृक्षत) तुझ्यापासून आमच्याकडे सतत वाहत आहेत. (न) जसे (अर्वन्त:) घोडे अश्वशालितून मुक्त केल्यानंतर धावत सुटतात. तसेच आनन्दाच्या धारा आम्हा भक्तांच्या हृदयाकडे वेगाने वाहत आहेत. (श्रवस्तत्व:) (दुसरा अर्थ - अश्वशालेतून कुरणाकडे दौडणारे) तात्पर्य असा की त्या दौडणाऱ्या अश्वाप्रमाणे आनन्याच्या धारा तुझ्यापासून निघून आमच्याकडे देताहेत. (तू आनंदाचा स्त्रोत आहेस. आम्ही तो आनन्द स्विकारला पाहिजे. ।।१।।
Essence
परमेश्वराचे उपासक जन परमात्याहून त्यांच्या आत्म्याकडे प्रवाहित होत देणाऱ्या आनंदाच्या निझेराचा प्रवाह स्वत: अनुभव करतात. ।।१।।
Subject
प्रथम मंत्रात परमात्मरूप सोमाच्या रसधातुंचे वर्णन केले आहे.
Special
या मंत्रात उपमा अलंकार आहे. ‘श्रवस्थव:’ शब्दात श्लेष अलंकार आहे. ।।१।।