Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 65

733 Mantra
Devata- अग्निः Rishi- बृहदुक्थो वामदेव्यः Chhand- त्रिष्टुप् Swara- धैवतः Kaand Name- आग्नेयं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- आग्नेयं पर्व
Mantra with Swara
इ꣣दं꣢ त꣣ ए꣡कं꣢ प꣣र꣡ उ꣢ त꣣ ए꣡कं꣢ तृ꣣ती꣡ये꣢न꣣ ज्यो꣡ति꣢षा꣣ सं꣡ वि꣢शस्व । सं꣣वे꣡श꣢नस्त꣣न्वे꣢३꣱चा꣡रु꣢रेधि प्रि꣣यो꣢ दे꣣वा꣡नां꣢ पर꣣मे꣢ ज꣣नि꣡त्रे꣢ ॥६५॥

इ꣣द꣢म् । ते꣣ । ए꣡क꣢꣯म् । प꣣रः꣢ । उ꣣ । ते । ए꣡क꣢꣯म् । तृ꣣ती꣡ये꣢न । ज्यो꣡ति꣢꣯षा । सम् । वि꣣शस्व । संवे꣡श꣢नः । स꣣म् । वे꣡श꣢꣯नः । त꣡न्वे꣢꣯ । चा꣡रुः꣢꣯ । ए꣣धि । प्रियः꣢ । दे꣣वा꣡ना꣢म् । प꣣रमे꣢ । ज꣣नि꣡त्रे꣢ ॥६५॥

Mantra without Swara
इदं त एकं पर उ त एकं तृतीयेन ज्योतिषा सं विशस्व । संवेशनस्तन्वे३चारुरेधि प्रियो देवानां परमे जनित्रे ॥

इदम् । ते । एकम् । परः । उ । ते । एकम् । तृतीयेन । ज्योतिषा । सम् । विशस्व । संवेशनः । सम् । वेशनः । तन्वे । चारुः । एधि । प्रियः । देवानाम् । परमे । जनित्रे ॥६५॥

Samveda - Mantra Number : 65
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 1; Ardh Prapathak » 2; Dashati » 2;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 1; Khand » 7;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
प्रथम अर्थ (परमात्मपरक) हे परमात्मन (इदम्) ही माझ्याजवळ पार्थिव अग्नीच्या रूपाने (ते) तुझी (एकम्) एक ज्योती आहे. (उ) आणि (पर:) दूर पलीकडे द्युलोकात विद्यमान सूर्यरूपाचा (एकम्) दुसरी ज्योती आहे. तू त्या दोन ज्योतीहून भिन्न अशा (तृतीयेन ज्योतिषा) तिसऱ्या ज्योतीद्वारे (संविशस्व) माझ्या अंत:करणात प्रविष्ट हो. (परमे) श्रेष्ठ अशा (जमित्रे) अविर्भाव स्थानात म्हणजे माझ्या आत्म्यात (संवेशन:) प्रवेश करणारा तू (तन्ने) आन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आणि आनंदमय कोशांसह शरीरासाठी (चारू:) हितकर तसेच (देवानाम्) इंद्रिये, मन, बुद्धी आदी देवांचा (प्रिय:) प्रिय (एधि) हो.।।
द्वितीय अर्थ : (जीवात्मापरक) हे जीवात्मन् (इदम्) हे चक्षु आदी इंद्रिये (ते) तुझी (एकम्) एक ज्योती आहे. (३) आणि (पर:) त्यापलीकडे मनरूपाची (ते) तुम्ही (,कम्) एक दुसरी ज्योती आहे. तू (तृतीयेन) तिसऱ्या परमात्मरूप (ज्योतिबा) ज्योतीशी (संविशस्व) सगंत हो. (परमे) सर्वोत्कृष्ट (जनित्रे) उत्पादक परमात्म्यात (संवेशक) संगत वा सहवासित होत तू (वन्ने) तुझ्या आश्रयभूत देह समुहासाठी (चारू:) कल्याणकर आणि (देवानाम्) दिव्य गुणांचे (प्रिय:) स्नेहपात्र (एधि) हो. ।।३।।
Essence
भौतिक अग्नी आणि सूर्यरूप अग्नीमध्ये परमात्म्याची ज्योतीच प्रदीप्त होत आहे. म्हटलेही आहे. - अग्नीमध्ये परमेश्वररूप अग्नी प्रविष्ट होऊन विचरण करीत आहे. ऋग्वेद ४।३९।९ आदिव्यात जो पुरुष वास करीत आहे, तो मी परमेश्वरच आहे. यजु. ४०।१७। त्याच्यात तेजाने, ज्योतीने हे सर्व तेजोमय वा चमकत आहेत. कठ. ५।१५। यावरून कळते की, पार्थिव आग आणि सूर्य अग्नी दोन्ही परमात्म्याचाच ज्योती आहेत. पण परमेश्वराची वास्तविक तिसरी ज्योती त्याचा स्वत: स्वाभाविक तेजच आहे. त्या तेजानेच परमेश्वर भक्तांच्या आत्म्यात प्रविष्ट होऊन भक्तांचे कल्याण करीत असतो. आणि भक्तांचे शरीर, प्राण, मन, बुद्धी आदींचे हित संपादन करतो. यामुळे त्याच्या तिसऱ्या ज्योतीच्या प्राप्तर्थ सर्वांनी योगाभ्यासाद्वारे यत्न केले पाहिजेत. मंत्राच्या दुसऱ्या अर्थात जीवात्म्यास उद्देशून कथन केले आहे. - हे जीवात्मन् तुझी एक ज्योती नेत्र, श्रोत्र आदी इंद्रिये आहेत, तुझी दुसरी ज्योती मन आहे. वेदात म्हटले आहेच की प्राण्यात सर्वाधिक वेगवान मनही एक ध्रुव ज्योती दर्शनाकरीता दिलेली वा स्थापित आहे. ऋग्वेद ६।९।५। पण ह्या दोन्ही ज्योती साधन रूप आहेत, साध्य ज्योती तर तिसरी परमात्म ज्योती आहे. म्हणून तिसऱ्या ज्योतीच्या प्राप्तीकरीता हे जीवात्मन् तू प्राणपणाने प्रयत्न कर. ।।३।।
Subject
पुढचा मंत्र परमात्मा आणि जीवात्म्याला उद्देशून म्हटला आहे. -