Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 641

733 Mantra
Devata- इन्द्रः Rishi- प्रजापतिः Chhand- विराडनुष्टुप् Swara- गान्धारः
Mantra with Swara
वि꣣दा꣡ म꣢घवन् वि꣣दा꣢ गा꣣तु꣢꣯मनु꣢꣯शꣳसिषो꣣ दि꣡शः꣢ । शि꣡क्षा꣢ शचीनां पते पूर्वी꣣णां꣡ पुरू꣢वसो ॥६४१

वि꣣दाः꣢ । म꣣घवन् । विदाः꣢ । गा꣣तु꣢म् । अ꣡नु꣢꣯ । शँ꣣सिषः । दि꣡शः꣢꣯ । शि꣡क्षा꣢꣯ । श꣣चीनाम् । पते । पूर्वीणा꣢म् । पु꣣रूवसो । पुरु । वसो ॥६४१॥

Mantra without Swara
विदा मघवन् विदा गातुमनुशꣳसिषो दिशः । शिक्षा शचीनां पते पूर्वीणां पुरूवसो ॥६४१

विदाः । मघवन् । विदाः । गातुम् । अनु । शँसिषः । दिशः । शिक्षा । शचीनाम् । पते । पूर्वीणाम् । पुरूवसो । पुरु । वसो ॥६४१॥

Samveda - Mantra Number : 641

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
हे (मघवन्) ज्ञानरूप धनाचे स्वामी परमेश्वर, तुम्ही (विदाः) आम्हाला (उपासकांना) जाणून घ्या (गातुम्) आमच्या आचरणाला (विदाः) जाणून घ्या (अमाचे मनोगत ओळखा व आमच्या वागणुकीवर नजर ठेवा) आम्हाला (दिशः) गंतव्य दिशांविषयी (अनुशंसिषः) उपदेश करा (उत्तमचे मार्गदर्शन करा, वा काय करावे, काय न करावे, याविषयी ज्ञान द्या) हे (शघीनांपते) ज्ञानाचे व कर्माचे स्वामी, तुम्ही आम्हाला (शिक्ष) ज्ञानप्राप्ती व कर्म करण्याची प्रेरणा द्या. हे (पुरुवस्ये) प्रचुर धनवान प्रभो, तुम्ही (पूर्वीणाम्) श्रेष्ठ दानाचे स्वामी आहात (योग्य व्यक्तींना योग्य ते दान देता) आम्हालाही त्या दानासाठी पात्र होऊ द्या.।।१।।
Essence
सर्वांनी परमेश्वराकडून कर्तव्य-ज्ञान व कर्म प्रेरणा प्राप्त करून तसेच पुरुषार्थ-परिश्रमाद्वारे संपत्ती अर्जित करून सदाचाराच्या मार्गावर चालत चालत समृद्धिशाली व्हायला हवे.।।१।।
Subject
प्रथम मंत्रात मार्गदर्शनाकरिता परमेश्वराची प्रार्थना-
Special
या मंत्रात अनेक क्रियांचा एकच कारक वा कर्ता असल्यामुळे येथे दीपक अलंकार आहे. ‘विदा’च्या आवृत्तीमुळे लाटानुप्रास आहे. ‘पूर्वी’, पुरुव’मधे छेकानुप्रास आहे.।।१।।