Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 631

733 Mantra
Devata- सूर्यः Rishi- सार्पराज्ञी Chhand- गायत्री Swara- षड्जः Kaand Name- आरण्यं काण्डम् Gaan- आरण्य गान
Mantra with Swara
अ꣣न्त꣡श्च꣢रति रोच꣣ना꣢꣫स्य प्रा꣣णा꣡द꣢पान꣣ती꣢ । व्य꣢꣯ख्यन्महि꣣षो꣡ दिव꣢꣯म् ॥६३१॥

अ꣣न्त꣡रिति꣢ । च꣣रति । रोचना꣢ । अ꣣स्य꣢ । प्रा꣣णा꣢त् । प्र꣣ । आना꣢त् । अ꣣पानती꣢ । अ꣣प । अनती꣢ । वि । अ꣣ख्यत् । महिषः꣢ । दि꣡व꣢꣯म् ॥६३१॥

Mantra without Swara
अन्तश्चरति रोचनास्य प्राणादपानती । व्यख्यन्महिषो दिवम् ॥

अन्तरिति । चरति । रोचना । अस्य । प्राणात् । प्र । आनात् । अपानती । अप । अनती । वि । अख्यत् । महिषः । दिवम् ॥६३१॥

Samveda - Mantra Number : 631
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 6; Ardh Prapathak » 3; Dashati » 5;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 6; Khand » 5;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
(अस्य) या सूर्याची/परमेश्वराची (रोचना) दीप्ती (प्राणात्) प्राण-व्यापारानंतर (प्राणवावूने आपले कार्य केल्यानंतर) (अपानती) अपान वायूची क्रिया करवीत (अन्त्) भूमीवर/हृदयात (चरति) विचरण करते. हा (महिषः) महान सूर्य/परमेश्वर (दिवम्) आकाश/जीवात्मा (व्यख्यत्) प्रकाशित करतो।।५।।
Essence
हा प्राणवायू प्राण, अपान, ध्यान, उदान समान या पाच रूपाने शरीरात प्राणन, अपानन आदी क्रिया करतो, ते सर्व तो परमेश्वराच्या सामर्थ्यानेच करतो. उषनिषदाच्या कर्ता ऋषीने म्हटले आहेच. ‘‘परमेश्वर प्राणांचाही प्राण आहे (केन.१/२) परमेश्वराने निर्माण केलेला सूर्यदेखील आपल्या किरणांनी प्राण्यांना प्राण देत, प्राण, अपान आदी क्रिया घडण्यात सहाय्यभूत होत असतो. प्रश्नोपनिषदामधे म्हटले आहेच. ‘‘हा सूर्य सर्व प्रजेचा प्राण म्हणून उदित होत आहे’’ (प्रश्न.१/८) परमेश्वरच सूर्याद्वारे आकाशस्थ पिंडाना, ग्रहादींना प्रकाशित करीत आहे.।।५।।
Subject
सूर्याच्या व परमेश्वराच्या तेजाचे वर्णन
Special
या मंत्रात श्लेष अलंकार आहे.।।५।।