Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 619

733 Mantra
Devata- पुरुषः Rishi- वामदेवो गौतमः Chhand- अनुष्टुप् Swara- गान्धारः Kaand Name- आरण्यं काण्डम् Gaan- आरण्य गान
Mantra with Swara
पु꣡रु꣢ष ए꣣वे꣢꣫दꣳ सर्वं꣣ य꣢द्भू꣣तं꣢꣫ यच्च꣣ भा꣡व्य꣢म् । पा꣡दो꣢ऽस्य꣣ स꣡र्वा꣢ भू꣣ता꣡नि꣢ त्रि꣣पा꣡द꣢स्या꣣मृ꣡तं꣢ दि꣣वि꣢ ॥६१९॥

पु꣡रु꣢꣯षः । ए꣣व꣢ । इ꣣द꣢म् । स꣡र्व꣢꣯म् । यत् । भू꣣त꣢म् । यत् । च꣣ । भा꣡व्य꣢꣯म् । पा꣡दः꣢꣯ । अ꣣स्य । स꣡र्वा꣢꣯ । भू꣣ता꣡नि꣢ । त्रि꣣पा꣢त् । त्रि꣣ । पा꣢त् । अ꣣स्य । अमृ꣡त꣢म् । अ꣣ । मृ꣡त꣢꣯म् । दि꣣वि꣢ ॥६१९॥

Mantra without Swara
पुरुष एवेदꣳ सर्वं यद्भूतं यच्च भाव्यम् । पादोऽस्य सर्वा भूतानि त्रिपादस्यामृतं दिवि ॥

पुरुषः । एव । इदम् । सर्वम् । यत् । भूतम् । यत् । च । भाव्यम् । पादः । अस्य । सर्वा । भूतानि । त्रिपात् । त्रि । पात् । अस्य । अमृतम् । अ । मृतम् । दिवि ॥६१९॥

Samveda - Mantra Number : 619
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 6; Ardh Prapathak » 3; Dashati » 4;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 6; Khand » 4;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
(पुरुष एवं) तो सर्वत्र परिपूर्ण परमेश्वर (इदम्) या प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष असलेले (सर्वम्) (यद्) हे (सर्वम्) सारे जे (भूतम्) उत्पन्न झालेले आहे आणि (यत् च भाव्यम्) जे जे भविष्यात जन्मणार आहे, त्या सर्व पदार्थांचा अधिष्ठात आहे. (सर्वा) सर्व (भूतानि) उत्पन्न सूर्य, पृथ्वी आदी (अस्य) या पुरुष परमेश्वराच्या महिमेपैसी (पादः) केवळ एक चतुर्थंश भाग आहे (अस्य) या जगनिर्मात्याच्या सामर्थ्याचा वा महिमेचा (त्रिपात्) तीन चतुर्थांश भाग (अमृतम्) विनाशरहित आहे की जो (दिवि) प्रकाशमान मोक्षलोकात मुक्तात्मांद्वारेच अनुभवला जात आहे.।।५।।
Essence
भूतकाळात झालेल्या, विद्यमान असलेल्या आणि भविष्यात होणाऱ्या सर्व पदार्थांचा रचयिता परमेश्वरच आहे आणि तोच या सर्वांचे संचालन, व्यवस्थापन करतो. परमेश्वराचे जे रूप या भौतिक रचनेपेक्षा पुढे आणि तात्त्विक स्वरूपाचे आहे, ते या चर्मचक्षूंनी पाहता येत नाही. ते रूपकेवळ आंतरिक चक्षूंनीच पाहता येते।।५।।
Subject
पुन्हा त्याच परमपुरुषाचे वर्णन