Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 618

733 Mantra
Devata- पुरुषः Rishi- वामदेवो गौतमः Chhand- अनुष्टुप् Swara- गान्धारः Kaand Name- आरण्यं काण्डम् Gaan- आरण्य गान
Mantra with Swara
त्रि꣣पा꣢दू꣣र्ध्व꣢꣫ उदै꣣त्पु꣡रु꣢षः꣣ पादो꣢ऽस्ये꣣हा꣡भ꣢व꣣त्पु꣡नः꣢ । त꣢था꣣ वि꣢ष्व꣣꣬ङ् व्य꣢꣯क्रामदशनानश꣣ने꣢ अ꣣भि꣢ ॥६१८॥

त्रि꣣पा꣢त् । त्रि꣣ । पा꣢त् । ऊ꣣र्ध्वः꣢ । उत् । ऐ꣣त् । पु꣡रु꣢꣯षः । पा꣡दः꣢꣯ । अ꣣स्य । इह꣢ । अ꣣भवत् । पु꣢न꣣रि꣡ति꣢ । त꣡था꣢꣯ । वि꣡ष्व꣢꣯ङ् । वि । स्व꣣ङ् । वि꣢ । अ꣣क्रामत् । अशनानशने꣢ । अ꣣शन । आनशने꣡इति꣢ । अ꣣भि꣢ ॥६१८॥

Mantra without Swara
त्रिपादूर्ध्व उदैत्पुरुषः पादोऽस्येहाभवत्पुनः । तथा विष्वङ् व्यक्रामदशनानशने अभि ॥

त्रिपात् । त्रि । पात् । ऊर्ध्वः । उत् । ऐत् । पुरुषः । पादः । अस्य । इह । अभवत् । पुनरिति । तथा । विष्वङ् । वि । स्वङ् । वि । अक्रामत् । अशनानशने । अशन । आनशनेइति । अभि ॥६१८॥

Samveda - Mantra Number : 618
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 6; Ardh Prapathak » 3; Dashati » 4;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 6; Khand » 4;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
(त्रिपात्) तीन-चतुर्थांश भाग असलेला (पुरुषः) पूर्ववर्णित परमेश्वर (म्हणजे त्या परिपूर्णाचा तीन चतुर्थांश भाग) (अथर्वः उत् ऐत्) या सृष्टीपेक्षा उंच वा पुढे स्थित आहे (इह पुनः) या जगात तर (अस्य) या पूर्ण परमेश्वराचा (षादः) एक चतुर्थांश भागच (अभवत्) विद्यमान आहे (सृष्टी वा ब्रह्मांड रचनेवरून त्या परिपूर्ण परम पुरुषाच्या केवळ एक चतुर्थांश शक्तीचीच कल्पना येऊ शकते, तीन चतुर्थांश आमच्या बुद्धी सामर्थ्याचा पलीकडे आहे) (तथा) अशाप्रकारे म्हणजे केवळ आपल्या एक-चतुर्थांश सामर्थ्याने तो (वि-स्वङ्) विविध पदार्थात व्याप्त होऊन (अशनानशने अभि) चेतन व अचेतन पदार्थांपर्यंत (व्यक्रामतू) विविध रूपाने कार्य करीत आहे, म्हणजे चेतन मनुष्य प्राण्याच्या प्राण-आदी क्रिया तसेच अग्नी सूर्य, पवन, पर्वत, नदी आदी अचेतन पदार्थांचे व्यापार, स्थिती आदी कार्य करीत आहे.।।४।।
Essence
या संपूर्ण चेतन-अचेतन, जड-जंगम विश्वामधे जे महान अद्भुत कर्तृत्व दिसत आहे, त्यामधे परमेश्वराच्या सामर्थ्यापैकी यत्किंचित अंशच क्रियाशील आहे. वास्तविक पाहता परमेश्वराचे सामर्थ्य व स्वरूप लोकातिक्रांत आहे. (मनुष्याच्या बद्धिसामर्थ्याच्या आवाका पलीकडे आहे.।।४।।
Subject
त्या परमपुरुषाचे वर्णन