Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 611

733 Mantra
Devata- लिंगोक्ताः Rishi- वामदेवो गौतमः Chhand- महा पङ्क्तिः Swara- पञ्चमः Kaand Name- आरण्यं काण्डम् Gaan- आरण्य गान
Mantra with Swara
य꣡शो꣢ मा꣣ द्या꣡वा꣢पृथि꣢वी꣢꣯ यशो꣢꣯ मेन्द्रबृहस्प꣣ती꣢ । य꣢शो꣣ भ꣡ग꣢स्य विन्दतु꣣ य꣡शो꣢ मा꣣ प्र꣡ति꣢मुच्यताम् । य꣣शसा꣢३स्याः꣢ स꣣ꣳ स꣢दो꣣ऽहं꣡ प्र꣢वदि꣣ता꣡ स्या꣢म् ॥६११॥

य꣡शः꣢꣯ । मा꣣ । द्या꣡वा꣢꣯ । पृ꣣थिवी꣡इति꣢ । य꣡शः꣢꣯ । मा꣣ । इन्द्रबृहस्पती꣢ । इ꣣न्द्र । बृहस्पती꣡इति꣢ । य꣡शः꣢꣯ । भ꣡ग꣢꣯स्य । वि꣣न्दतु । य꣡शः꣢꣯ । मा꣣ । प्र꣡ति꣢꣯ । मु꣣च्यताम् । यशस्वी꣢ । अ꣣स्याः꣢ । सं꣣ऽस꣡दः꣢ । स꣣म् । स꣡दः꣢ । अ꣣ह꣢म् । प्र꣣वदिता꣢ । प्र꣣ । वदिता꣢ । स्या꣣म् ॥६११॥

Mantra without Swara
यशो मा द्यावापृथिवी यशो मेन्द्रबृहस्पती । यशो भगस्य विन्दतु यशो मा प्रतिमुच्यताम् । यशसा३स्याः सꣳ सदोऽहं प्रवदिता स्याम् ॥

यशः । मा । द्यावा । पृथिवीइति । यशः । मा । इन्द्रबृहस्पती । इन्द्र । बृहस्पतीइति । यशः । भगस्य । विन्दतु । यशः । मा । प्रति । मुच्यताम् । यशस्वी । अस्याः । संऽसदः । सम् । सदः । अहम् । प्रवदिता । प्र । वदिता । स्याम् ॥६११॥

Samveda - Mantra Number : 611
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 6; Ardh Prapathak » 3; Dashati » 3;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 6; Khand » 3;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
(एक उपासक अथवा ध्येयप्राप्तीसाठी झटणारा कर्मवीर म्हणत आहे) (द्यावापृथिवी) सूर्य-भूमी, प्राण-अपान, माता-पिता, सभा-समिती (हे सर्व युगल) (मा) मला (यशः) कीर्ती वा कार्यात यश देवोत (इन्द्रबृहस्पती) विद्युत-वायू, परमात्मा-जीवाला, क्षत्रिय-ब्राह्मण या सर्वांनी (मा) मला कीर्ती व कार्यात (यशः) यश द्यावे. (भगस्य) रौप्य-सुवर्ण-मणी-मोती या रूपाचे अथवा सत्य-अहिंसा-अस्तेय-ज्ञान-वैरावट या रूपाने अथवा सुराज्य-चक्रवर्ती राज्य वा रूपाचे धत्र (यशः) व यश मला (विन्दतु) प्राप्त व्हावे (यशः) जीवनात सर्व प्रकारची कीर्ती (मा) मला (प्रतिमुच्चताम्) मिळावी (अहम्) मी (अस्याः) या (संसदः) संसदेचा (यशस्वी) सफल वा यशस्वी (प्रवदिता) रस्ता (स्थाम्) व्हावे (अशी मनीषा वा महत्त्वाकांक्षा मी मनात बाळगत आहे) ।।१०।।
Essence
जसे ब्रह्मांडात सूर्य-भूमी, शरीरात प्राण-अपान, समाजात आई-वडील आणि राष्ट्रात सभा-समिती आपापल्या कीर्तीने भासित आहेत (त्यांचे अनन्य साधारण महत्त्व आहे) आणि जसे परमात्मा-जीवात्मा विद्युत-वायू आणि ब्राह्मण-क्षत्रिय यांचे यश सर्वत्र प्रसृत आहे, त्याचप्रमाणे आम्हीदेखील धन, धान्य, ज्ञान, स्वास्थ्य, दीर्घायू, चक्रवर्ती राज्य, अध्यात्म योग आयीरूप संपत्ती प्राप्त करून कीर्तीमान व्हावे आणि विविध सभांमधे यशस्वी वक्ता म्हणून स्वतःस सिद्ध करावे.।।१०।।
Subject
मंत्रात म्हटलेल्या द्यावा पृथिनी आदी देवल। त्यांच्याकडून कीर्तीची कामना
Special
या मंत्रातील ङ्गयशःफ शब्दाचा अनेकवेळा आवृत्ती केली असल्यामुळे येथे यशाविषयी अत्यंत घनिष्ठ कामना सूचित होत आहे. ङ्गयशोफची चारवेला आणि ङ्गयशो माफ ची दोनवेळा आवृत्ती असल्यामुळे लाटानुप्रास अलंकार आहे.।।१०।।