Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 6

733 Mantra
Devata- अग्निः Rishi- सुदीतिपुरुमीढावाङ्गिरसौ तयोर्वान्यतरः Chhand- गायत्री Swara- षड्जः Kaand Name- आग्नेयं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- आग्नेयं पर्व
Mantra with Swara
त्वं꣡ नो꣢ अग्ने꣣ म꣡हो꣢भिः पा꣣हि꣡ विश्व꣢꣯स्या꣣ अ꣡रा꣢तेः । उ꣣त꣢ द्वि꣣षो꣡ मर्त्य꣢꣯स्य ॥६॥

त्व꣢म् । नः꣢ । अग्ने । म꣡हो꣢꣯भिः । पा꣣हि꣢ । वि꣡श्व꣢꣯स्य । अ꣡रा꣢꣯तेः । अ । रा꣣तेः । उत꣢ । द्वि꣣षः꣢ । म꣡र्त्य꣢꣯स्य ॥६॥

Mantra without Swara
त्वं नो अग्ने महोभिः पाहि विश्वस्या अरातेः । उत द्विषो मर्त्यस्य ॥

त्वम् । नः । अग्ने । महोभिः । पाहि । विश्वस्य । अरातेः । अ । रातेः । उत । द्विषः । मर्त्यस्य ॥६॥

Samveda - Mantra Number : 6
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 1; Ardh Prapathak » 1; Dashati » 1;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 1; Khand » 1;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
हे (अग्ने) सर्वांचे नायक असलेल्या परमेश्वरा, (त्वम्) तू (महोभिः) आपल्या तेजाने (विश्वस्या:) (आमच्या हृदयात नसणाऱ्या) सर्व (अन्दाते:) अदान भावनेपासून (कृपणवृत्तीपासून) आणि शत्रुत्वभावनेनेपासून (आम्हास वाचन) (उत) तसेच (मर्व्यस्थ) मनुष्याशी (द्विषः) द्वेष करण्याच्या आमच्या प्रवृत्तीपासून अथवा कुणी मनुष्य आमच्याशी द्वेष करीत असेल, तर त्या द्वेषापासून (न:) आमची (पाहि) रक्षा कर ||६||
Essence
अदान वृत्तीने ग्रस्त अथवा कृपण वृत्ती व परिग्रहवृत्तीने ग्रासलेला मनुष्य केवळ स्वत:चे पोट भरण्याचा विचार करणारा होऊन पक्का स्वार्थी बनतो. तो कदापि सामाजिक व आध्यात्मिक उन्नती साधू शकत नाही. केवळ दान आणि परोपकार वृत्ती तसेच मैत्रीभावाने पारस्परिक सहकार्य वाढते आणि लक्ष्य साध्य करता येते. यासाठी हे जगदीश्वर, हे राजन् वा हे विद्वान आपण आपल्या तेजाने आपल्या क्षत्रियत्वाच्या प्रभावाने आपल्या विद्या प्रतापाने आमच्या ठिकाणी असलेल्या अदानवृत्ती व शत्रुत्वभावनेपासून आम्हाला वाचवा. तसेच जो माणूस आमच्याशी द्वेष करतो आणि त्या द्वेषभावनेने आमच्या प्रगतीत अडथळे आणतो त्याच्या त्या द्वेषभावनेपासूनही आम्हाला (तुमच्या उपासकांना) वाचवा की ज्यायोगे एका सूत्रात जसे मणी सामंजस्याने ओवलेले असतात तसेच परस्पर सहकार्य करीत आम्ही सर्वांची प्रगती साधावी ॥६॥
Subject
परमात्म्याने आमचे कशापासून रक्षण करावे, हे सांगतात.
Special
श्लेषाद्वारे या मंत्राची राजा परक आणि विद्वानपरक अर्थ योजनाही करता येते. ॥६॥