Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 592

733 Mantra
Devata- पवमानः सोमः Rishi- अमहीयुराङ्गिरसः Chhand- गायत्री Swara- षड्जः Kaand Name- आरण्यं काण्डम् Gaan- आरण्य गान
Mantra with Swara
स꣢ न꣣ इ꣡न्द्रा꣢य꣣ य꣡ज्य꣢वे꣣ व꣡रु꣢णाय म꣣रु꣡द्भ्यः꣢ । व꣣रिवोवि꣡त्परि꣢꣯स्रव ॥५९२॥

सः꣢ । नः꣣ । इ꣡न्द्रा꣢꣯य । य꣡ज्य꣢꣯वे । व꣡रु꣢꣯णाय । म꣣रु꣡द्भ्यः꣢ । व꣣रिवोवि꣢त् । व꣣रिवः । वि꣢त् । प꣡रि꣢꣯स्र꣣व ॥५९२॥

Mantra without Swara
स न इन्द्राय यज्यवे वरुणाय मरुद्भ्यः । वरिवोवित्परिस्रव ॥

सः । नः । इन्द्राय । यज्यवे । वरुणाय । मरुद्भ्यः । वरिवोवित् । वरिवः । वित् । परिस्रव ॥५९२॥

Samveda - Mantra Number : 592
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 6; Ardh Prapathak » 3; Dashati » 1;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 6; Khand » 1;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
(प्रथम अर्थ) (अध्यात्मपर)- हे पनमान सोम अर्थात सर्वोत्पादक, सन्मल ऐश्वर्याधिपती, रसेश्वर, पवित्रतादायक परमेश्वर, (सः) ते जे आपण (नः) आमच्या (यज्यवे) देहरूप यज्ञाचे संचालक आहात, म्हणून (इन्द्राय) माझ्य जीवात्म्यासाठी, (वरूणाय) श्रेष्ठ व संकल्प करणाऱ्या मनासाठी आणि (सरूद्भ्यः) प्राणांसाठी (वरिरोवित्) बलदायक होऊन माझ्या हृदयात (परिस्रव) संचार करा।।
द्वितीय पक्ष - (राष्ट्रपर)- हे पवमान सोम अचति सर्व राज्याधिकाऱ्यांना आपापल्या कर्तव्य- कर्मांविषयी प्रेरणा देणारे व त्यांच्यातील दोष, चुका दूर करून पावित्र्य देणारे हे राजा, (सः) ते आपण प्रजाजनांद्वारे राजापदावर अभिषिक्त आहात. आपण (नः) आमच्या (यज्यवे) राष्ट्र-यज्ञाच संचालकासाठी (इन्द्राय) सेनाध्यक्षासाठी (वरूणाय) असल्याचरण करणाऱ्यांना बंधनात टाकणारे कारागार अधिकाऱ्यासाठी आणि (मरूद्भ्यः) योद्धा सैनिकांसाठी (वरिवोखित्) दातव्य वेतन देणारे होऊन (परिस्रव) राष्ट्रात सर्वत्र संचार करा.।।७।।
Essence
परमेश्वराने कृपा करून आमच्या आत्मा, मन, प्राण, इंद्रिये आदीसाठी हे शरीर-राज्य संचलित करण्यासाठी आम्हास शक्ती द्यावी आणि राजाने नियुक्त राज्याधिकाऱ्यांना देव वेतनरूप धन द्यावे. जो राजा सेवकांना योग्य व अधिकृत वेतन देत नाही, त्याचे सेवक त्या अन्यायाविरुद्ध बंड करतात.।।७।।
Subject
पुढील दोन मंत्रांची देवता पवमान सोम। परमेश्वराप्रत वा राजाप्रत सांगणे