Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 589

733 Mantra
Devata- वरुणः Rishi- शुनःशेप आजीगर्तिः कृत्रिमो देवरातो वैश्वामित्रो वा Chhand- त्रिष्टुप् Swara- धैवतः Kaand Name- आरण्यं काण्डम् Gaan- आरण्य गान
Mantra with Swara
उ꣡दु꣢त्त꣣मं꣡ व꣢रुण꣣ पा꣡श꣢म꣣स्म꣡दवा꣢꣯ध꣣मं꣡ वि꣢꣯ मध्य꣣म꣡ꣳ श्र꣢थाय । अ꣡था꣢दित्य व्र꣣ते꣢ व꣣यं꣡ तवा꣢꣯ना꣣ग꣢सो꣣ अ꣡दि꣢तये स्याम ॥५८९॥

उ꣢त् । उ꣣त्तम꣢म् । व꣣रुण । पा꣡श꣢꣯म् । अ꣣स्म꣢त् । अ꣡व꣢꣯ । अ꣣धम꣢म् । वि । म꣣ध्यम꣢म् । श्र꣣थाय । अ꣡थ꣢꣯ । आ꣣दित्य । आ । दित्य । व्रते꣢ । व꣣य꣢म् । त꣡व꣢꣯ । अ꣣नाग꣡सः꣢ । अ꣣न् । आग꣡सः꣢ । अ꣡दि꣢꣯तये । अ । दि꣣तये । स्याम ॥५८९॥

Mantra without Swara
उदुत्तमं वरुण पाशमस्मदवाधमं वि मध्यमꣳ श्रथाय । अथादित्य व्रते वयं तवानागसो अदितये स्याम ॥

उत् । उत्तमम् । वरुण । पाशम् । अस्मत् । अव । अधमम् । वि । मध्यमम् । श्रथाय । अथ । आदित्य । आ । दित्य । व्रते । वयम् । तव । अनागसः । अन् । आगसः । अदितये । अ । दितये । स्याम ॥५८९॥

Samveda - Mantra Number : 589
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 6; Ardh Prapathak » 3; Dashati » 1;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 6; Khand » 1;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
(वरूण) मोक्षप्राप्तीकरिता सर्व मनुष्य ज्याचे वरण करतात. अशा हे परमेश्वरा, तू आमच्या (उत्तमं पाशं) उत्तम कर्माचे बंधनरूप उत्तम पाशापासून (अस्मत्) आम्हाला (उत्) उत्तम फळ देऊन सोडव (उत्तम कर्मांचे उत्तम फळ मिळाल्यानंतर आम्ही कर्मपाशातून मुक्त होऊ व आम्हास मोक्ष मिळेल.) (अधमम्) आमच्या हातून होणाऱ्या निकृष्ट कर्मांच्या बंधनापासून (त्यांचे योग्य ते वाईट फळ देऊन) आम्हाला (अव) रक्षण दे (कर्म भोग संपल्यानंतर मोक्ष मिळेल) (मध्यमम्) मध्यम कर्मांच्या बंधनरूप पाशापासून (विक्षयाय) मुक्त करण्यासाठी त्यांचे विविध फळ देऊन आम्हाला मोक्ष दे (अथ) यानंतर हे (आदित्य) नित्यमुक्त, अविनाशी, आदित्यवत प्रकाशमान, सर्व प्रकाशक परमेश्वरा, (तव) तुझ्या (व्रते) निष्काम कर्म करीत (वयम्) आम्ही ( अनागसः) निष्पाप होत (अदितये) मोक्षाचे अधिकारी (स्थाम) होऊ, (अशी कृपा कर)।।
याचा दुसरा अर्थ असाही घेता येतो की आत्म्याच्या ज्ञानग्रहण मार्गात जे बोधक आहेत, त्यांचे दुर्गुणांचे बंधन म्हणजे पहिला पाश, मध्यम पाश म्हणजे मनाच्या श्रेष्ठ संकल्पात बाधक असणारे विचारांचे बंधन, अधम पाश म्हणजे शरीराच्या व्यापारात बाधक अशश रोगायीचे बंधन. परमेश्वराचे या वा योगिजनांनी पाशापासून आम्हांस मुक्त करून सुखी करावे.।।४।।
Essence
माणासाला सर्व सकाम सकर्मांचे फळ भोगावे लागते. जे लोक निष्काम कर्म करीत परमेश्वराच्या व्रतात राहून निष्पाप जीवन व्यतीत करतात, ते अवश्य मोक्षाचे अधिकारी होतात. ।।४।।
Subject
वरूण देवता। परमेश्वेराला प्रार्थना
Special
या मंत्राचा काही व्याख्याकारांनी तिसरा अर्थही केला है। शरीराचा उत्तम भाग म्हणजे मस्तिष्क, यात ज्ञानाविषयी अहंकार असणे हे उत्तम पाश, मध्यम भागातील हृदय त्यातील माया-मोह-लोभ आदी दुर्विचार रूप पाश अतीव अधम भागातील जंथा. पाय आदी भागातील आळस, निष्क्रिमत्व हा तिसरा अधम पाश. हे परमेश्वर, आम्हाला या तिन्ही पाशापासून सोडव.।।४।।