Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 587

733 Mantra
Devata- इन्द्रः Rishi- वसिष्ठो मैत्रावरुणिः Chhand- त्रिष्टुप् Swara- धैवतः Kaand Name- आरण्यं काण्डम् Gaan- आरण्य गान
Mantra with Swara
इ꣢न्द्रो꣣ रा꣢जा꣣ ज꣡ग꣢तश्चर्षणी꣣ना꣢꣯मधि꣢꣫क्ष꣣मा꣢ वि꣣श्व꣡रू꣢पं꣣ य꣡द꣢स्य । त꣡तो꣢ ददाति दा꣣शु꣢षे꣣ व꣡सू꣢नि꣣ चोद꣢꣫द्राध꣣ उ꣡प꣢स्तुतं चि꣣दर्वा꣢क् ॥५८७॥

इ꣡न्द्रः꣢꣯ । रा꣡जा꣢꣯ । ज꣡ग꣢꣯तः । च꣣र्षणीना꣢म् । अ꣡धि꣢꣯ । क्ष꣣मा꣢ । वि꣣श्व꣡रू꣢पम् । वि꣣श्व꣢ । रू꣣पम् । य꣢त् । अ꣣स्य । त꣡तः꣢꣯ । द꣣दाति । दाशु꣡षे꣢ । व꣡सू꣢꣯नि । चो꣣द꣢त् । रा꣡धः꣢꣯ । उ꣡प꣢꣯स्तुतम् । उ꣡प꣢꣯ । स्तु꣣तम् । चित् । अर्वा꣢क् ॥५८७॥

Mantra without Swara
इन्द्रो राजा जगतश्चर्षणीनामधिक्षमा विश्वरूपं यदस्य । ततो ददाति दाशुषे वसूनि चोदद्राध उपस्तुतं चिदर्वाक् ॥

इन्द्रः । राजा । जगतः । चर्षणीनाम् । अधि । क्षमा । विश्वरूपम् । विश्व । रूपम् । यत् । अस्य । ततः । ददाति । दाशुषे । वसूनि । चोदत् । राधः । उपस्तुतम् । उप । स्तुतम् । चित् । अर्वाक् ॥५८७॥

Samveda - Mantra Number : 587
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 6; Ardh Prapathak » 3; Dashati » 1;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 6; Khand » 1;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
(प्रथम अर्थ) (परमात्मपर)-(इन्द्रः) परमैश्वर्यवान परमात्मा (जगतः) जगाच्या (चर्षणीनाम्) सर्व मनुष्यांचा (राजा) राजा आहे. (अधि क्षमा) व या पृथ्वीवर (यत्) जो (विश्वरूपम्) सर्वप्रकारचे धन आहे. ते सर्व (अस्य) या इन्द्राचेच आहे. (ततः) व्याद्य धनातून तो (दाशुषे) दानी मनुष्याला (वसूनि) धन (ददाति) देतो. त्याने (अर्वाक्) आमच्याकडे देखील (उपस्तुतं चित्) प्रशंसित (सद्यः) भौतिक संपत्ती आणि योगारूप ऐश्वर्य (चोदत्) पाठवावे (वा दानी लोकांच्या मनात इतरांना धन देण्याची प्रेरणा करावी)।।
द्वितीय अर्थ - (राजा परा) (इन्द्रः) शत्रूंचा विदारक, याज्ञिकांचा आदरकर्ता, समस्त सद्गुणरूप संपत्तीचा स्वामी मनुष्यच (जगतः) राष्ट्राच्या (चर्षणीनाम्) लोकांचा (राजा) राजा होण्यास योग्य आहे. (अधि क्षमा)राष्ट्रभूमीवर (यत्) जो (विश्वरूपम्) सर्व प्रकारच्या धनाचा भांडार आहे, तो (अस्य) याचाच आहे त्याने (राष्ट्राध्यक्षाने) (दाशुषे) राजस्व आदी कर भरणाऱ्या नागरिकांसाठी (वसूनि) (व्यवसाय उद्योग आदीसाठी) धन (ददाति) द्यावे. त्याने (राष्ट्राध्यक्षाने) (उपस्तुतम्) प्रशंसित (दुराचाराद्वारे न मिळविलेले) (सद्यः) धन (अर्वाक्) समाजातील निम्न वर्गातील निर्धनजनांना (चोदत्) द्यावे. ।।२।।
Essence
जसे राजराजेश्वर परमेश्वर, दानी मनुष्याला धन देतो, तसेच मानवी राजानेदेखील करू देणाऱ्या प्रजाजनांना सुखसमृद्ध करावे. राजाने यासाठीही प्रयत्न करावेत की प्रजेच्या विविध वर्गामधे धनाच्या दृष्टीने अधिक वैषम्य असू नये. ।।२।।
Subject
परमात्माच सर्वांचा राजा असून राष्ट्रामधे राजाने काय केले पाहिजे, याविषयी. -