Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 585

733 Mantra
Devata- पवमानः सोमः Rishi- ऋजिश्वा भारद्वाजः Chhand- ककुप् Swara- मध्यमः Kaand Name- पावमानं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- पावमानं पर्व
Mantra with Swara
य꣢ उ꣣स्रि꣢या꣣ अ꣢पि꣣ या꣢ अ꣣न्त꣡रश्म꣢꣯नि꣣ नि꣡र्गा अकृ꣢꣯न्त꣣दो꣡ज꣢सा । अ꣣भि꣢ व्र꣣जं꣡ त꣢त्निषे꣣ ग꣢व्य꣣म꣡श्व्यं꣢ व꣣र्मी꣡व꣢ धृष्ण꣣वा꣡ रु꣢ज । ओ꣡३म् व꣣र्मी꣡व꣢ धृष्ण꣣वा꣡ रु꣢ज ॥५८५॥

यः꣢ । उ꣣स्रि꣡याः꣢ । उ꣣ । स्रि꣡याः꣢꣯ । अ꣡पि꣢꣯ । याः । अ꣣न्तः꣢ । अ꣡श्म꣢꣯नि । निः । गाः । अ꣡कृ꣢꣯न्तत् । ओ꣡ज꣢꣯सा । अ꣢भि꣣ । व्र꣣ज꣢म् । त꣣त्निषे । ग꣡व्य꣢꣯म् । अ꣡श्व्य꣢꣯म् । व꣣र्मी꣢ । इ꣣व । धृष्णो । आ꣢ । रु꣣ज । ओ꣢३म् । व꣣र्मी꣡व꣢धृष्ण꣣वा꣡रु꣢ज ॥५८५॥

Mantra without Swara
य उस्रिया अपि या अन्तरश्मनि निर्गा अकृन्तदोजसा । अभि व्रजं तत्निषे गव्यमश्व्यं वर्मीव धृष्णवा रुज । ओ३म् वर्मीव धृष्णवा रुज ॥

यः । उस्रियाः । उ । स्रियाः । अपि । याः । अन्तः । अश्मनि । निः । गाः । अकृन्तत् । ओजसा । अभि । व्रजम् । तत्निषे । गव्यम् । अश्व्यम् । वर्मी । इव । धृष्णो । आ । रुज । ओ३म् । वर्मीवधृष्णवारुज ॥५८५॥

Samveda - Mantra Number : 585
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 6; Ardh Prapathak » 2; Dashati » 4;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 5; Khand » 11;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
(उस्रियाः अपि) बाहर निघण्याची पात्रता वा सामर्थ्य असूनही (याः) ज्या सूर्य-किरणें (अश्मनि अन्तः) मेघमंडळात थांबून राहतात, त्या (गा.) सूर्य-किरणांना (यः) जो स्वतःच्या (ओजसा) प्रतापाने (निर् अकृन्ठम्) मेघाच्या बाहेर काढतो, असे आपण (गव्यम्) भूमिविषयी आणि (अश्वयम्) सूर्याविषयी (व्रजम्) मंडळाला (अभितलिषे) सर्व बाजूंनी विस्तृत करता हे (धृष्णो) संकटांचे चूर्ण करणारे परमेश्वर, आपण (वर्मी इव) कवचधारी योद्धाप्रमाणे (आरूज) आमच्यावरील विपत्तीना व आमच्या शत्रूंना भग्न करा. ।।८।।
Essence
ज्याप्रमाणे परमेश्वर मध्यस्थित मेघांचा अवरोध दूर करून सूर्यकिरणे भूमीवर पाठवितो आणि फैलावतो. तद्वत जीवात्मा योगमार्गातील सर्व विघ्नांचे निराकरण करून यश संपादित करतो. ।।८।।
या दशतीत सोम या नावाने परमेश्वराचे आणि त्यापासून मिळणाऱ्या आनंदरसाचे वर्णन केले आहे. त्यामुळे या दशतीतील विषयांशी मागील दशतीच्या विषयांची संगती आहे, असा जाणावे.।।
षष्ठ प्रपाठकातील द्वितीय अर्धाची चतुर्य दशती समाप्त।
पंचम अध्यायातील एकादश खंड समाप्त
Subject
सोम परमेश्वराचे वर्णन
Special
या मंत्रात उपमा अलंकार आहे. ‘उस्रियाः अपि याः अन्तरश्मनि’ या वाक्याचा जर असा अर्थ केला की ‘जी वाहत असूनही दगडामधे थांबलेली आहे’ तर या कथनात विरोध वाटतो, पण ‘वाहण्याचे सामर्थ्य असूनही जी मेघांनी रोखून धरली आहे’ असा अर्थ केल्यास त्या विरोधाचा परिहार होतो. म्हणून येथे विरोधाभास अलंकार आहे. ।।८।।