Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 584

733 Mantra
Devata- पवमानः सोमः Rishi- ऊरुराङ्गिरसः Chhand- ककुप् Swara- मध्यमः Kaand Name- पावमानं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- पावमानं पर्व
Mantra with Swara
ए꣣ष꣡ स्य धार꣢꣯या सु꣣तो꣢ऽव्या꣣ वा꣡रे꣢भिः पवते म꣣दि꣡न्त꣢मः । क्री꣡ड꣢न्नू꣣र्मि꣢र꣣पा꣡मि꣢व ॥५८४॥

ए꣣षः । स्यः । धा꣡र꣢꣯या । सु꣣तः꣢ । अ꣡व्याः꣢꣯ । वा꣡रे꣢꣯भिः । प꣣वते । मदि꣡न्त꣢मः । क्रीड꣢न् । ऊ꣣र्मिः꣢ । अ꣣पा꣢म् । इ꣣व ॥५८४॥

Mantra without Swara
एष स्य धारया सुतोऽव्या वारेभिः पवते मदिन्तमः । क्रीडन्नूर्मिरपामिव ॥

एषः । स्यः । धारया । सुतः । अव्याः । वारेभिः । पवते । मदिन्तमः । क्रीडन् । ऊर्मिः । अपाम् । इव ॥५८४॥

Samveda - Mantra Number : 584
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 6; Ardh Prapathak » 2; Dashati » 4;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 5; Khand » 11;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
(प्रथम अर्थ) (सोम औषधीपर) (एषः) हा (स्यः) तो आम्हाद्वारे पर्वतावरून आणलेला (अव्याः वारेभिः) मेंढीच्या लोकरींनी निर्मित दशापवित्रातून (सुतः) गाळलेला (मन्दितमः) अतिशय आनंद देणारा सोमरस (अपाम्) नद्यांच्या (ऊर्मिःइव) लहरीप्रमाणे (क्रीडन्) क्रीडा करीत (सरसर ध्वनी करीत) धारा रूपाने (पवते) द्रोण कलशात जात आहे.।।
द्वितीय अर्थ - (परमात्मपर) (एषः) हा (मी साधक) अनुभवत असलेला (स्यः) तो (अव्याः वारेभिः) मेंढीच्या केसांनी निर्मित दशापवित्रा (गाळणी)प्रमाणे पवित्रताकारक यम, नियम आदी योग-अंगांनी (सुतः) हृदयात प्रकट केलेला (मन्दितमः) अत्यंत आनंद देणारा सोम परमेश्वर (अपाम् अर्मिः इव) नदीच्या तरंगांप्रमाणे (क्रीडन्) क्रीडा करीत (धारया) आनंदाच्या धारांसह (पवते) माझ्या हृदयात पोहचत आहे. ।।७।।
Essence
समाधिस्य उपासकगण परमेश्वराकडून आपल्याकडे वेगाने येच असलेल्या आनंद-धारेला साक्षातवत अनुभव करतात. ।।७।।
Subject
सोमाचा धाराप्रवाह
Special
या मंत्रात श्लेष व उपमा हे दोन अलंकार आहेत. पाण्याच्या तरंगांप्रमाणे कलकल नाद करीत सोम औषधीचा रस ज्याप्रमाणे दशापवित्रातून गाळला जाऊन द्रोणकलशात पोहचतो, तद्वत यम, नियम आदी योग-साधनांनी हृदयात प्रकट होणारा परमात्मरूप सोम आनंदप्रवाहासह योगिजनांच्या आत्म्याला प्राप्त होतो. ।।७।।