Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 580

733 Mantra
Devata- पवमानः सोमः Rishi- ऋजिश्वा भारद्वाजः Chhand- ककुप् Swara- ऋषभः Kaand Name- पावमानं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- पावमानं पर्व
Mantra with Swara
आ꣡ सो꣢ता꣣ प꣡रि꣢ षिञ्च꣣ता꣢श्वं꣣ न꣡ स्तोम꣢꣯म꣣प्तु꣡र꣢ꣳ रज꣣स्तु꣡र꣢म् । व꣣नप्रक्ष꣡मु꣢द꣣प्रु꣡त꣢म् ॥५८०॥

आ꣢ । सो꣣त । प꣡रि꣢꣯ । सि꣣ञ्चत । अ꣡श्व꣢꣯म् । न । स्तो꣡म꣢꣯म् । अ꣣प्तु꣡र꣢म् । र꣣जस्तु꣡र꣢म् । व꣣नप्रक्ष꣢म् । व꣣न । प्रक्ष꣢म् । उ꣣दप्रु꣡त꣢म् । उ꣣द । प्रु꣡त꣢꣯म् ॥५८०॥

Mantra without Swara
आ सोता परि षिञ्चताश्वं न स्तोममप्तुरꣳ रजस्तुरम् । वनप्रक्षमुदप्रुतम् ॥

आ । सोत । परि । सिञ्चत । अश्वम् । न । स्तोमम् । अप्तुरम् । रजस्तुरम् । वनप्रक्षम् । वन । प्रक्षम् । उदप्रुतम् । उद । प्रुतम् ॥५८०॥

Samveda - Mantra Number : 580
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 6; Ardh Prapathak » 2; Dashati » 4;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 5; Khand » 11;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
मित्रांनो, (स्तोमम्) जो अग्नी समूह रूपात विद्यमान आहे, त्याला (अप्तुरम्) जो नदी, नद, समुद्र यांच्या पाण्यावर वेगाने याच संचालनासाठी साधनभूत आहे, त्या अग्नीला, तसेच (रजस्तुरम्) जो अंतरिक्षात यानांना वेगाने नेण्याचे साधनभूत आहे, त्या अग्नीला (वनप्रक्षम्) वन जाळून टाकणाऱ्या (उदप्रुतम्) जलार्चे बाष्प रूपात रूपांतर करून आकाशात घेऊन जाणाऱ्या अग्नीला (अश्वम्) अग्नी, विद्युत आदी रूपातील अग्नीला (न) ज्याप्रमाणे शिल्पीगण (आ सुन्नन्ति) उत्पन्न करतात व त्याचा उपर्युक्तप्रमाणे उपयोग करतात, तसेच अग्नीला (परि सिज्जन्ति) स्तुतिपात्र (अप्तुरम्) प्राणांचा जो प्रेरक (रजस्तुरम्) पृथ्वी, चंद्र, सूर्य, नक्षत्र आदी लोकांना जो वेगाने संचालन करीत आहे, त्या परमेश्वराला (वनप्रक्षम्) सूर्यकिरणांना वा मेघजलाला भूमिमंडलावर आणणाऱ्या (उदप्रुतम्) शरीरस्य रक्त-जलोदोना वा नद्यांच्या जलाला प्रवाह देण्याऱ्या सोम परमेश्वराला (आ सोत) आपल्या हृदयात प्रकट करा आणि (परि सिज्जत) श्रद्धारसाने त्याला सिंचित करा.।।३।।
Essence
ज्याप्रमाणे शिल्पी, अभियंता वा यांत्रिकगण विद्युत आदीरूप अग्नीचा यानात उपयोग करतात आणि जलाने वा वायूने सिक्त करतात, तद्वत मनुष्यांनी प्राण-प्रेरक, द्यावा पृथ्वीधारक, सूर्यकिरण व मेघजलवर्षक परमेश्वराला हृदयातील श्रद्धारसाने सिंचित केले पाहिजे.।।३।।
Subject
मनुष्यांना परमेश्वराच्या आराधनेसाठी प्रेरणा
Special
या मंत्रात श्लिष्टोपमा अलंकार आहे. आपः, वनम्, उदकम् हे सर्व शब्द निघंटु ग्रंथात (१/१२) जलवाची आहेत. तसेच निरूक्त (१२/७) मधे रजम् शब्ददेखील जलवाची सांगितला आहे. त्यामुळे ‘अजुरम्फ रजस्तुरम् वनसक्षम्, उदप्रुतम्’ हे सर्व शब्द समानार्थी म्हणजे जलवाची वाटतात, पण वर दाखविलेल्या व्याख्येप्रमाणे ते शब्द भिन्न-भिन्न अर्थवाची आहेत, म्हणून येथे पुनरुक्तवदाभास अलंकार आहे. त्,म् या अक्षरांच्या आवृत्तीमुळे वृत्त्यनुप्रास आहे. ‘तुरम्’च्या आवृत्तीमुळे लाटानुप्रास आहे.।।३।।