Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 574

733 Mantra
Devata- पवमानः सोमः Rishi- पर्वतनारदौ काण्वौ Chhand- उष्णिक् Swara- ऋषभः Kaand Name- पावमानं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- पावमानं पर्व
Mantra with Swara
गो꣡म꣢न्न इन्दो꣣ अ꣡श्व꣢वत्सु꣣तः꣡ सु꣢दक्ष धनिव । शु꣡चिं꣢ च꣣ व꣢र्ण꣣म꣢धि꣣ गो꣡षु꣢ धारय ॥५७४॥

गो꣡म꣢꣯त् । नः꣣ । इन्दो । अ꣡श्व꣢꣯वत् । सु꣣तः꣢ । सु꣣दक्ष । सु । दक्ष । धनिव । शु꣡चि꣢꣯म् । च꣣ । व꣡र्ण꣢꣯म् । अ꣡धि꣢꣯ । गो꣡षु꣢꣯ । धा꣣रय ॥५७४॥

Mantra without Swara
गोमन्न इन्दो अश्ववत्सुतः सुदक्ष धनिव । शुचिं च वर्णमधि गोषु धारय ॥

गोमत् । नः । इन्दो । अश्ववत् । सुतः । सुदक्ष । सु । दक्ष । धनिव । शुचिम् । च । वर्णम् । अधि । गोषु । धारय ॥५७४॥

Samveda - Mantra Number : 574
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 6; Ardh Prapathak » 2; Dashati » 3;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 5; Khand » 10;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
हे (सुदक्ष) अत्यन्त समृद्ध आणि (इन्दो) चंद्र जसा समुद्राची वृद्धी (भरती) करतो, तद्वत मनुष्यांच्या समृद्धिची वृद्धी करणाऱ्या परमेश्वर, राजा वा हे आचार्य, (सुतः) हृदयात प्रकट झालेले/राष्ट्रात निर्वाचित झालेले/ अथवा आम्हा समित्याणि शिष्यांद्वारे स्वीकृत असे, आपण (नः) आम्हा/उपासकांना/नागरिकांना/शिष्यांसाठी (गोमत्) गौयुक्त/भूमियुक्त/वा वेदवाणीयुक्त ऐश्वर्य की जे (अश्ववत्) अश्व/प्राण/वा भौतिक धनानेदेखील समृद्ध आहे, ते ऐश्वर्य (धमिव) द्या. तसेच (गोषुअधि) राष्ट्र भूमीत (शुचिं वर्णच) पवित्र-हृदयी ब्राह्मणादी वर्ण/पवित्र वाणी/वा पवित्रअक्षर ‘ओम्’ हे सर्व देखील प्राप्त होईल, असे करा.।।९।।
Essence
परमेश्वर, राजा व आचार्य हे स्वयं धन, विद्या आदीनी सुसमृद्ध होऊन (पैकी परमेश्वर नित्यज्ञानी व समृद्धिमय आहे) त्यानी आम्हालाही सद्बुद्धी, धन, विद्या आदेच दान करावे. ज्या राष्ट्रात पवित्र हृदय असणारे ब्राह्मण, क्षत्रिय आदी वर्ण आहेत, तसेच जेथे प्रजेच्या वाणीवर ओंकाररूप अक्षर जप निरंतर विद्यमान आहे, ते राष्ट्र खरोखर धन्य म्हणून कीर्ती पावते.।।९।।
Subject
परमेश्वराला, राजाला व आचार्याला प्रार्थना
Special
या मंत्रात श्लेष अलंकार आहे.।।९।।