Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

Samveda Mantra 571

733 Mantra
Devata- पवमानः सोमः Rishi- मनुराप्सवः Chhand- उष्णिक् Swara- ऋषभः Kaand Name- पावमानं काण्डम् Gaan- प्रकृति गान Gaan Parva- पावमानं पर्व
Mantra with Swara
प꣡व꣢स्व दे꣣व꣡वी꣢तय꣣ इ꣢न्दो꣣ धा꣡रा꣢भि꣣रो꣡ज꣢सा । आ꣢ क꣣ल꣢शं꣣ म꣡धु꣢मान्त्सोम नः सदः ॥५७१॥

प꣡व꣢꣯स्व । दे꣣व꣡वी꣢तये । दे꣣व꣢ । वी꣣तये । इ꣡न्दो꣢꣯ । धा꣡रा꣢꣯भिः । ओ꣡ज꣢꣯सा । आ । क꣣ल꣡श꣢म् । म꣡धु꣢꣯मान् । सो꣣म । नः । सदः ॥५७१॥

Mantra without Swara
पवस्व देववीतय इन्दो धाराभिरोजसा । आ कलशं मधुमान्त्सोम नः सदः ॥

पवस्व । देववीतये । देव । वीतये । इन्दो । धाराभिः । ओजसा । आ । कलशम् । मधुमान् । सोम । नः । सदः ॥५७१॥

Samveda - Mantra Number : 571
(Kauthum) पूर्वार्चिकः: » Prapathak » 6; Ardh Prapathak » 2; Dashati » 3;
(Rananiya) पूर्वार्चिकः: » Adhyay » 5; Khand » 10;

Samveda Translation (Vedkumar Vedalankar)

मराठी
Samveda Translation (Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
हे (इन्दो) आनंदरसाने न्हाऊ घालणारे रसागार परमेश्वर, आपण (देववीतये) दिव्य गुणांच्या उत्पत्तीसाठी (धाराभिः) अनेक धारांच्या रूपाने (ओजसा) अत्यंत वेगाने (पवस्व) आमच्या अंतःकरणामधे प्रवाहित व्हा. हे (सोम) जगदीश्वर, (मधुमान्) मधुर आनंदाने परिपूर्णआपण (नः) आमच्या (कलक्षम्) कलापूर्ण आत्म्यात (आ सदः) येऊन स्थित व्हा.।।६।।
Essence
जसे सोम औषधीचा रस धारारूपाने द्रोणकलक्षात येतो, तसेच मधुर ब्रह्मानंदरस माझ्या/उपासकाच्या आत्म्यात यावा.।।६।।
Subject
आनंद-रसाचा निर्झरणासाठी प्रार्थना
Special
या मंत्राचा श्लेषद्वारे सोमपर अर्थदेखील करता येतो. याद्वारे भौतिक सौम औषधी आणि परमेश्वर या दोन्हीमधे उपमान-उपमेयभाव सूचित होत आहे. यामुळे येथे उपमा ध्वनी आहे. ।।६।।